Join us  

प्रेग्नन्सीतही आलिया भट करतेय रोज व्यायाम, पाहा जिमला जातानाचे हटके लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2022 4:47 PM

Alia Bhat New Pregnancy Look While going to Gym : काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत असल्याचे आपण पाहू शकतो.

ठळक मुद्देबाळंतपणाची प्रक्रियाही सुलभ होण्यास व्यायामाचा चांगला उपयोग होतो. प्रेग्नन्सीमधला आलियाचा फॅशन सेन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट ही अनेकांची लाडकी अभिनेत्री आहे. अतिशय ताकदवान अभिनय आणि तितकीच बबली म्हणून इमेज असलेली आलिया लवकरच आई होणार आहे. रणबीर कपूर यांनी एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यानंतर नव्यानेच झालेले लग्न, संसार, करिअर हे सगळे थोडे कुठे सेट होते न होते तोच या दोघांनी आपल्याला मूल होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले. लग्नाला अवघे दोन महिनेच झाले असताना त्यांनी मूल होण्याचा निर्णय घेतला म्हणून त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. सध्या आलियाचे प्रेग्नन्सीमधील अनेक लूक्स आपल्यासमोर येत असून आलियाची प्रेग्नन्सी फॅशन सध्या चर्चेत आहे. नुकताच आलियाचा आणखी एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला असून यात काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत असल्याचे आपण पाहू शकतो (Alia Bhat New Pregnancy Look While going to Gym). 

(Image : Google)

गर्भधारणा म्हणजे शरीराची, मनाची, आहाराची आणि सर्वच गोष्टींची काळजी घेण्याचा काळ. अभिनेत्रींचे शेड्यूल हे चित्रपटाचे चित्रिकरण, त्याचे प्रमोशन आणि इतरही अनेक गोष्टींमुळे काहीसे हेक्टीक असते. अशातही आपले कुटुंब, आरोग्य, सौंदर्य यांकडे लक्ष देणे त्यांना भाग असते. आलिया भट प्रेग्नंट असल्यापासून तिचे फोटो आणि फॅशन सेन्सची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत कधी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तर कधी आणखी कोणत्या निमित्ताने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिचा असाच एक लूक पुन्हा व्हायरल झाला असून यामध्ये आलिया जीमला जाताना दिसत आहे.

 

बॉलिवूड शादीज डॉट कॉम यांनी आलियाचा हा लूक आपल्या कॅमेरात कैद केला असून काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आलिया कारमधून खाली उतरताना दिसते. तिने काळ्या रंगाच्या पँटवर काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर काळे जॅकेट घातल्याचे दिसते. प्रेग्नन्सीमध्येही आलिया आपले फिटनेस रुटीन फॉलो करताना दिसत आहे अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला असून बऱ्याच जणांनी तिचे अशाप्रकारे प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करत असल्याबद्दल कौतुकही केले आहे. प्रेग्नन्सीमध्ये नियमित व्यायाम केल्यास मातेचे आणि होणाऱ्या बाळाचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच बाळंतपणाची प्रक्रियाही सुलभ होण्यास व्यायामाचा चांगला उपयोग होतो. 

टॅग्स :फॅशनआलिया भटप्रेग्नंसीफिटनेस टिप्स