कपडे कसे अगदी अंगाला चापून चोपून बसायला हवेत.. परफेक्ट फिटिंगचे हवेत.. असं काही कपड्यांच्या बाबतीत असतं.. पण उन्हाळ्यात कसं जरा मोकळेढाकळे सैलसर कपडे बरे वाटतात. त्यामुळे टीशर्ट, सैलसर टॉप उन्हाळ्यात जास्त घातले जातात. आता तुम्ही जे टी शर्ट नेहमी घातला, त्याच्या पेक्षा एक- दोन साईज मोठे टीशर्ट असतील तरी ते बिंधास्त वापरायला काढू शकता.. कारण आता असे ओव्हरसाईज शर्ट, टीशर्ट (trend of oversized shirt) घालण्याचा जबरदस्त समर ट्रेण्ड आला आहे.
नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकलेली आलिया भट देखील अशाच ओव्हरसाईज शर्टमध्ये दिसून आली. ८- १० दिवसांपुर्वी आलिया भट (Alia Bhat) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचं लग्न झालं. आता आलियाने पुन्हा एकदा कामावर फोकस केलं असून तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी घराबाहेर पडताना तिने अशा पद्धतीचं ड्रेसिंग केलं होतं. तिचा हा शर्ट तिच्या साईजपेक्षा नक्कीच २ ते ३ नंबर मोठा असावा. शर्ट अतिशय ढगळ तर आहेच, पण चांगलाच लांबदेखील आहे. डार्क ब्लू रंगाच्या शॉर्ट्ससोबत आलियाने तो शर्ट मॅच केला आहे. लग्नानंतर नवऱ्याचे कपडे घालू लागली का, असं म्हणून तिला ट्रोलही करण्यात येत आहे.
करिना कपूर, मलायका अरोरा या ही अनेकदा अशा ओव्हरसाईज कपड्यांमध्ये दिसून येतात. या ट्रॅण्डमुळे काही अभिनेत्रींनी तर चक्क नवऱ्याचे टी- शर्ट, शर्ट घातले आहेत आणि असं त्यांनी साेशल मिडियावरही उघडपणे सांगितलं आहे. आता तुम्हाला जर अशी कुल समर फॅशन करायची असेल तर ती परफेक्ट कॅरी करता यावी. नाहीतर ढगळ कपडे घातले, मापाचे कपडे नाहीत का, असे टोमणेही ऐकावे लागू शकतात. त्यासाठीच तर बघा या काही खास टिप्स.
ओव्हरसाईज कपड्यांची कशी करायची स्टाईल?- ओव्हरसाईज शर्ट घालणार असाल तर आता एखादे टँक टॉप घाला आणि त्यावर बटन न लावता ओव्हरसाईज शर्ट घाला. शॉर्ट किंवा जीन्स असं काहीही त्यासोबत मॅच होईल.- ओव्हरसाईज टी शर्ट आणि सैलसर कॉटन जीन्स असाही ट्रेण्ड सध्या इन आहे.- ओव्हरसाईज् शर्ट आणि डेनिम शॉर्ट्स विथ शुज अशी स्टाईलही उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. - ओव्हरसाईज शर्ट, टी शर्टवर कधीही टाईट जीन्स घालू नका. कारण सैलसर कॉटन पॅन्टवर ते अधिक खुलून दिसतील.- ओव्हरसाईज शर्ट, टी- शर्ट इन केले तर आणखी चांगला लूक येईल.