Lokmat Sakhi >Fashion > सलवार- कुर्ता घातल्यावर उंची आणखीनच कमी दिसते? लक्षात ठेवा ५ टिप्स- दिसाल उंच- स्मार्ट 

सलवार- कुर्ता घातल्यावर उंची आणखीनच कमी दिसते? लक्षात ठेवा ५ टिप्स- दिसाल उंच- स्मार्ट 

Styling Tips If You Have Short Height: सलवार कुर्ता किंवा पंजाबी सूट घालताना लक्षात ठेवा काही खास टिप्स, तुम्ही आहात त्यापेक्षा नक्कीच जास्त उंच दिसाल.. ( dressing tips for how to look tall and slim in kurti)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 03:04 PM2024-09-30T15:04:39+5:302024-09-30T15:05:32+5:30

Styling Tips If You Have Short Height: सलवार कुर्ता किंवा पंजाबी सूट घालताना लक्षात ठेवा काही खास टिप्स, तुम्ही आहात त्यापेक्षा नक्कीच जास्त उंच दिसाल.. ( dressing tips for how to look tall and slim in kurti)

Fashion tips for how to look tall and slim in kurti, how to dress up if you are short in height | सलवार- कुर्ता घातल्यावर उंची आणखीनच कमी दिसते? लक्षात ठेवा ५ टिप्स- दिसाल उंच- स्मार्ट 

सलवार- कुर्ता घातल्यावर उंची आणखीनच कमी दिसते? लक्षात ठेवा ५ टिप्स- दिसाल उंच- स्मार्ट 

Highlightsसध्या कुर्त्यांमध्ये आलिया कट हा पॅटर्न खूप ट्रेंडिंग आहे. या प्रकारच्या कुर्त्यांचा गळा V शेपचा असून बस्ट लाईनच्या खाली एक आडवी लेस असते.

ज्या मुलींची उंची थोडी कमी असते किंवा ज्या मुली बुटक्या, ठेंगण्या असतात, त्या सलवार- कुर्ता घातल्यावर आणखीनच कमी उंचीच्या दिसू लागतात. अशावेळी त्यांनी उंच टाचेच्या चपला घातल्या तरी त्यांच्या उंचीत खूपसा फरक पडलेला दिसत नाही. म्हणूनच सलवार कुर्ता किंवा पंजाबी सूट अशा पेहरावाची निवड करताना या काही टिप्स उंचीने कमी असणाऱ्या तरुणींनी, महिलांनी आवर्जून लक्षात ठेवाव्या. आता तर नवरात्री, दिवाळी यानिमित्ताने पारंपरिक कपडे जास्त प्रमाणात घातले जातात (dressing tips for how to look tall and slim in kurti). त्यामुळेच या सिझनमध्ये या काही ड्रेसिंग टिप्स तुमच्या नक्कीच कामाला येतील. (Styling Tips If You Have Short Height)

 

उंचीने कमी असणाऱ्या मुलींनी सलवार- कुर्त्यांची निवड कशी करावी?

उंची कमी असणाऱ्या ज्या महिला किंवा तरुणी आहेत, त्यांनी आपण आहोत त्यापेक्षा जास्त उंचीच्या  दिसण्यासाठी कशा पद्धतीने कपडे घालावेत, याविषयी माहिती सांगणारा एक छोटासा व्हिडिओ anupriyaa_srivastavaa anlovedrama या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगितलेल्या काही टिप्स पुढीलप्रमाणे..

नवरात्रीसाठी घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणाऱ्या शुद्ध तुपातल्या फुलवाती- पाहा सोपी पद्धत

१. सध्या कुर्त्यांमध्ये आलिया कट हा पॅटर्न खूप ट्रेंडिंग आहे. या प्रकारच्या कुर्त्यांचा गळा V शेपचा असून बस्ट लाईनच्या खाली एक आडवी लेस असते. या पॅटर्नचे ड्रेस उंची कमी असणाऱ्या मुलींनी निवडावे. कारण समाेरचा गळा V शेप असल्यामुळे चेहरा आणि गळा, छातीचा भाग निमुळता भासतो.

 

२. उंची कमी असणाऱ्या मुलींनी स्लिट म्हणजेच कट असणारे ड्रेस घालण्यास प्राधान्य द्यावे. समोरच्या बाजुने मधोमध उभा कट असेल किंवा दोन्ही मांड्यांवर मधोमध उभा कट येत असेल, अशा पद्धतीचे कुर्ते निवडा. यामुळे तुम्ही नक्कीच आहे त्यापेक्षा जास्त उंचीचे दिसू शकाल.

लाकडी फर्निचर कधीच जुनं दिसणार नाही- वर्षांनुवर्षे चमकेल नव्यासारखं, बघा १ सोपा उपाय

३. अनारकलीसारखे घेरदार कुर्ते घालणं ठेंगण्या मुलींनी घालणं टाळलं पाहिजे. यामुळे त्या आहे त्यापेक्षा जास्त कमी उंचीच्या आणि स्थूल दिसतात.

४. खूप घेरदार सलवार निवडू नका. प्लाझो प्रकारातली सलवार निवडण्यापेक्षा लेगिन्स, स्ट्रेटफिट पँट किंवा चुडीदार घालण्यास प्राधान्य द्या.

घटस्थापनेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या ७ वस्तू! तुमच्या घरी आहेत का? एकदा तपासून घ्या..

५. उंची कमी असणाऱ्या मुलींनी गडद रंगाचे, आडवे पट्ट असणारे तसेच मोठमोठे प्रिंट असणारे कपडे घालू नयेत. त्याऐवजी फिक्या किंवा पेस्टल रंगाचे, उभे पट्ट असणारे आणि बारीक प्रिंटचे कपडे घालावे. 


 

Web Title: Fashion tips for how to look tall and slim in kurti, how to dress up if you are short in height

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.