आपण छान उंच असावे असे प्रत्येकाला वाटते. उंचीमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी छाप पडते. हे जरी खरे असले तरी तरी आपल्याला जन्मत:च उंची मिळालेली असल्याने ती एका प्रमाणाच्या पुढे वाढत नाही. वयाच्या साधारण १६ ते १८ वर्षापर्यंत उंची वाढते. साधारणपणे अनुवंशिकतेनुसार आपली उंची ठरते. काही व्यायामप्रकार केल्याने ती काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असली तरी ठराविक वयानंतर उंचीची वाढ थांबते (Fashion Tips For How To Look Tall).
कमी उंची असूनही तुम्हाला थोडं उंच दिसायचं असेल तर कपड्यांची निवड करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. यामुळे आपण आहोत त्यापेक्षा काही प्रमाणात नक्कीच उंच दिसायला मदत होऊ शकते. कपडे खरेदी करताना आपण या गोष्टी लक्षात घेतोच असे नाही, मात्र त्याकडे आवर्जून लक्ष दिल्यास व्यक्तिमत्त्व खुलायला मदत होते. प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात, पाहूया त्या कोणत्या...
१. टॉप, कुर्ता आणि पँट किंवा लेगिन्स हे एकाच रंगाचे घातले तरी आपली उंची थोडी जास्त दिसू शकते. दोन वेगळे रंग असल्यास उंची विभागली जाते, मात्र एकच रंग असेल तर एकसलग दिसत असल्याने उंची वाढल्यासारखे दिसते.
२. स्कीन फिट असा टॉप घालून त्याखाली मोठ्या बॉटमची पँट घालावी. त्यामुळेही उंची थोडी जास्त दिसण्यास मदत होते.
३. आपण घालत असलेले शूज किंवा चप्पल शक्यतो आपल्या पँटला मॅचिंग असावी. त्यामुळे नकळत उंची जास्त दिसण्यास मदत होते.
४. ढगळे कपडे न घालता शरीराला फिट बसतील असे एकाच रंगातील कपड्यांची शक्यतो निवड करावी.
५. गळा व्ही आकाराचा असेल तर उंची जास्त दिसण्यास मदत होते. तसेच बाह्या थ्री फोर्थ किंवा पूर्ण असाव्यात.
६. घट्ट जीन्स आणि पायापर्यंत पूर्ण श्रग घालावे. यामुळेही उंची जास्त दिसण्यास मदत होते.