Lokmat Sakhi >Fashion > सिंपल-क्लासी लूकसाठी लक्षात ठेवा फक्त ५ गोष्टी, नेहमी प्रेझेंटेबल-सुंदर दिसायचं तर...

सिंपल-क्लासी लूकसाठी लक्षात ठेवा फक्त ५ गोष्टी, नेहमी प्रेझेंटेबल-सुंदर दिसायचं तर...

Fashion Tips For Simple and Classy Look : सगळ्यांमध्ये आपण उठून-वेगळं दिसावं असं वाटत असेल तर फॅशनच्या बाबतीतल्या या टिप्स अवश्य लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2023 12:25 PM2023-01-27T12:25:43+5:302023-01-27T12:52:35+5:30

Fashion Tips For Simple and Classy Look : सगळ्यांमध्ये आपण उठून-वेगळं दिसावं असं वाटत असेल तर फॅशनच्या बाबतीतल्या या टिप्स अवश्य लक्षात ठेवा

Fashion Tips For Simple and Classy Look : Just 5 things to remember for a simple-classy look, to always look presentable-beautiful... | सिंपल-क्लासी लूकसाठी लक्षात ठेवा फक्त ५ गोष्टी, नेहमी प्रेझेंटेबल-सुंदर दिसायचं तर...

सिंपल-क्लासी लूकसाठी लक्षात ठेवा फक्त ५ गोष्टी, नेहमी प्रेझेंटेबल-सुंदर दिसायचं तर...

Highlightsसिंपल आणि सोबर दिसायचं असेल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यातसुंदर दिसण्यासाठी खूप मेकअप किंवा खूप महागड्या गोष्टींची आवश्यकता नसते

आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावं असं आपल्याला कायम वाटतं. यासाठी आपण आपल्याला आवडतील, अमुक एका प्रसंगाला शोभून दिसतील असे चांगले कपडे घालतो. विशिष्ट कपड्यांवर त्या पद्धतीच्या दागिन्यांची निवड करतो आणि थोडा मेकअपही करतो. आपण मनातून खूश असलो की नकळत तो आनंद आपल्या चेहऱ्यावर उमटतो आणि आपण सुंदर दिसतो. हे जरी खरं असलं तरी ऑफीसमध्ये, एखाद्या मिटींगला जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण प्रेझेंटेबल असायला हवं हे नक्की (Fashion Tips For Simple and Classy Look). 

मग कशाप्रकारच्या कपड्यांवर कसे दागिने घालावेत इथपासून कोणती हेअरस्टाइल चांगली दिसेल, पायात काय घालावं, पर्स कशी घ्यावी असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी यासाठीच आपल्याला काही सोप्या पण अतिशय महत्त्वाच्या टिप्स देतात. ज्या आपला सिंपल पण क्लासी लूक करण्यात अतिशय उपयुक्त ठरतील आणि आपण सगळ्यांमध्ये उठून दिसू शकतो. पाहूयात आपला लूक खुलवण्यासाठी उपयुक्त अशा सोप्या टिप्स...

(Image : Google)
(Image : Google)

१. सिंपल आणि एलिगंट लूकसाठी खूप गडद कपडे न घालता पेस्टल शेडमधले कपडे केव्हाही चांगले दिसतात. यामध्ये खूप कॉम्बिनेशन नसेल आणि सलवार कमीज आणि ओढणी एकाच रंगात असेल तरीही चांगले दिसते. 

२. आपल्या कपड्यांवर ज्याप्रकारचे वर्क आहे त्या प्रकारची ज्वेलरी घालती तर आपला लूक आणखी उठून दिसतो. मोत्याचे वर्क असेल तर मोत्याचे दागिने, खड्याचे वर्क असेल तर खड्याचे सोबर दागिने उठून दिसतात. 

३. हेअरस्टाईल हा आपल्या लूकमधील एक महत्त्वाचा घटक असतो. केस मोकळे सोडावेत किंवा केसांचा डोक्यावर एक छानसा बन बांधावा. यामुळे आपण छान क्लासी दिसण्यास मदत होते

४. पायात काय घालावं असा प्रश्न अनेकींना कायम पडतो पण क्लासी लूकसाठी पायात सिंपल एखादे बूट चांगले दिसतात. 

५. हातात एखादी छानशी छोटी पर्स घेतली तरी आपला लूक पूर्ण होण्यास मदत होते. उगाचच खूप मोठी पर्स, सॅक असे काही न घेता छोटीशी लेदर बॅग हातात घेतल्यास ती अतिशय डिसेंट दिसते. 

Web Title: Fashion Tips For Simple and Classy Look : Just 5 things to remember for a simple-classy look, to always look presentable-beautiful...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.