Lokmat Sakhi >Fashion > बॅकलेस ब्लाऊज घालताय? ५ टिप्स, बोल्ड -स्टायलिश लूक मिळेल-दिसेलही सुंदर आणि ग्लॅमरस...

बॅकलेस ब्लाऊज घालताय? ५ टिप्स, बोल्ड -स्टायलिश लूक मिळेल-दिसेलही सुंदर आणि ग्लॅमरस...

Fashion Tips For Wearing Backless Blouse With Saree Or Lehenga : Easy Styling Tips To Look The Best In A Backless Dress And Carry It Off Well : बॅकलेस ब्लाऊज घालून तुमची सुंदर, हटके स्टाईल दाखवायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2025 15:18 IST2025-03-25T15:01:01+5:302025-03-25T15:18:52+5:30

Fashion Tips For Wearing Backless Blouse With Saree Or Lehenga : Easy Styling Tips To Look The Best In A Backless Dress And Carry It Off Well : बॅकलेस ब्लाऊज घालून तुमची सुंदर, हटके स्टाईल दाखवायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा...

Fashion Tips For Wearing Backless Blouse With Saree Or Lehenga Easy Styling Tips To Look The Best In A Backless Dress And Carry It Off Well | बॅकलेस ब्लाऊज घालताय? ५ टिप्स, बोल्ड -स्टायलिश लूक मिळेल-दिसेलही सुंदर आणि ग्लॅमरस...

बॅकलेस ब्लाऊज घालताय? ५ टिप्स, बोल्ड -स्टायलिश लूक मिळेल-दिसेलही सुंदर आणि ग्लॅमरस...

साडीवर एकदम हटके आणि ट्रेंडी फॅशनचा ब्लाऊज घालायला प्रत्येकीला आवडते. आपण ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे वेगवेगळे पॅटर्न देखील मोठ्या हौसेने शिवून घेतो. ब्लाऊजच्या गळ्याचा (Fashion Tips For Wearing Backless Blouse With Saree Or Lehenga) सगळ्यात हटके, ट्रेंडी आणि कधीही आऊट ऑफ द फॅशन न जाणारा प्रकार म्हणजे 'बॅकलेस'. आपल्यापैकी अनेकींना बॅकलेस पॅटर्नचे ब्लाऊज घालायला फार आवडतात. बॅकलेस पॅटर्नचे ब्लाऊज घालणे आवडत जरी असले तरीही ते कॅरी (Easy Styling Tips To Look The Best In A Backless Dress And Carry It Off Well) करणे वाटते तितके सोपे काम नसते.

बॅकलेस पॅटर्नचे ब्लाऊज घालायचे असेल तर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, कारण यात मागच्या बाजूने आपली पाठ उघडी दिसते. यासाठीच बॅकलेस पॅटर्नचे ब्लाऊज घालण्यापूर्वी नेमकी कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी ते पाहूयात. जर तुम्ही बॅकलेस पॅटर्नचे ब्लाऊज घालण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर तुम्ही हे ब्लाऊज अगदी न लाजता घालून मिरवू शकता. खरंतर, ज्याप्रमाणे बॅकलेस ब्लाऊज तुम्हाला ग्लॅमरस, बोल्ड आणि क्लासी लूक देऊ शकतो, त्याचप्रमाणे तो तुमचा लूक देखील खराब करू शकतो. यासाठीच जर तुम्ही बॅकलेस ब्लाऊज घालत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. 

बॅकलेस पॅटर्नचे ब्लाऊज घालण्यापूर्वी लक्षात ठेवा... 

१. पाठ स्वच्छ असावी :- कोणत्याही प्रकारचा बॅकलेस ब्लाऊज किंवा आऊटफिट्स घालण्यापूर्वी आपली पाठ स्वच्छ आहे की नाही ते पाहा. बॅकलेस पॅटर्नच्या ब्लाऊजमधून आपल्या पाठीचा भाग जास्त प्रमाणात दिसून येतो. जर पाठीचा भाग स्वच्छ नसेल तर तो भाग बॅकलेसमधून विचित्र दिसतो. म्हणून, बॅकलेस आऊटफिट्स घालण्यापूर्वी तुमची पाठ पूर्णपणे स्वच्छ करा. यासाठी तुम्ही कोणत्याही घरगुती स्क्रबचा वापर करु शकता.  

पारंपरिक पैठणीचा मॉडर्न थाट ! आता फ्रॉक - जंपसूट आणि को - ऑर्ड सेटपण पैठणीचे...

 उकाड्यामुळे साडी नेसणं नको वाटतं? 'या' ५ फॅब्रिक्सच्या साड्या नेसा, कम्फर्टेबल-स्टायलिश आणि उकडणारही नाही...

२. योग्य अंडर गारमेंट्सची निवड :- बॅकलेस ब्लाऊज घालताना महिला अनेकदा ही चूक करतात. योग्य अंडरगारमेंट्स न निवडल्याने बॅकलेसचा लूक खराब दिसू शकतो. बॅकलेस घालताना तुम्ही नेहमीच योग्य पद्धतीचे इनरवेअर निवडले पाहिजेत. ब्लाऊजच्या बाहेर दिसणाऱ्या ब्रा स्ट्रिप्स तुमचा संपूर्ण लूक खराब करतील. यासाठीच बॅकलेस ब्लाऊजनुसार नेहमी परफेक्ट इनरवेअर निवडा. 

३. ब्लाऊजची फिटिंग योग्य असली पाहिजे :- जर बॅकलेस ब्लाऊजची फिटिंग योग्य नसेल तर असा बॅकलेस ब्लाऊज कॅरी करणे अवघड होऊ शकते. बॅकलेस  ब्लाऊज शिवताना त्याच्या फिटिंगची विशेष काळजी घ्या. बॅकलेस ब्लाऊजची फिटिंग अधिक जास्त घट्ट किंवा सैल नसावी.  ब्लाऊज फार टाईट किंवा लूज असेल तर ते कॅरी करताना तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. यासाठीच, नेहमी असा ब्लाऊज घ्या ज्याचे फिटिंग परिपूर्ण असेल. 

४. ब्लाऊज शक्यतो पॅडेड शिवा :- जर तुम्हाला बॅकलेस ब्लाऊजच्या आत कोणत्याही प्रकारचे अंडर गारमेंट्स घालायचे नसेल तर ब्लाऊज शिवतानाच पॅडेड शिवा. बॅकलेस ब्लाऊज जर पॅडेड असेल तर ते तुम्हाला कॅरी करणे अधिक सोपे जाईल. बॅकलेस पॅडेड ब्लाऊज बनवताना, पॅडचा आकार योग्य असावा हे लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हाला ते कॅरी करताना गोंधळ उडू शकतो. बॅकलेस ब्लाऊज घातल्यावर मागून ब्रेसियरच्या स्ट्रिप्स दिसू शकतात हे टाळण्यासाठी बॅकलेस ब्लाऊज शक्यतो पॅडेड शिवून घ्या. 

साडीचे मोठे काठ वापरुन ब्लाऊजला द्या नवा लूक, नेहमीचे ब्लाऊज दिसतील सुंदर आणि आकर्षक...

५. हेअरस्टाईल योग्य असावी :- बॅकलेस ब्लाऊज घालताना, पाठीमागून या ब्लाऊजचा पॅटर्न दिसणे आवश्यक असते. यासाठी, लांब केस असतील तर पोनीटेल घाला किंवा तुम्ही मेसी बन देखील घालू शकता. या दोन्ही हेअर स्टाईलमध्ये तुमच्या बॅकलेस ब्लाऊजचे पॅटर्न अगदी उठून दिसेल.

नाजूक आरी वर्क केलेले महागडे ब्लाऊज कपाटांत ठेवताना लक्षात ठेवा ५ टिप्स - चमक राहील कायम, खराब होणार नाहीत...

Web Title: Fashion Tips For Wearing Backless Blouse With Saree Or Lehenga Easy Styling Tips To Look The Best In A Backless Dress And Carry It Off Well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.