Join us  

सुटलेलं पोट, कंबरेचा घेर दिसू नये म्हणून कसे कपडे घालावे- ५ टिप्स, लठ्ठपणा जाणवणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2024 1:20 PM

Fashion Tips: सुटलेलं पोट, वाढलेला मागचा भाग तसेच कंबरेचा घेर लपविण्यासाठी कसे कपडे घालावे, याच्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहून घ्या... (tricks to choose clothes for hiding your belly fat and heavy chest)

ठळक मुद्देज्या महिलांचा छातीचा भाग जरा जास्त आहे, पोट सुटलेलं आहे अशा महिलांनी कशा पद्धतीचे कपडे घालावे आणि कोणते कपडे टाळावे?

काही जणींचा ड्रेसिंग सेन्स खरोखरच खूप जबरदस्त असतो. त्यामुळे त्या जाड असल्या तरी त्यांचा लठ्ठपणा कपड्यांमधून जाणवत नाहीत. उलट त्या अधिक आकर्षक दिसतात. पण कपड्यांचा चॉईस जर चुकला तर मात्र आपले शरीर उगाच बेढब दिसू लागते. म्हणूनच ज्या महिलांचा छातीचा भाग जरा जास्त आहे, पोट सुटलेलं आहे, सीट आणि कंबरेचा घेर वाढलेला आहे, अशा महिलांनी कशा पद्धतीचे कपडे घालावे आणि कोणते कपडे टाळावे, हे एकदा पाहून घ्या. (how to wear clothes for hiding your belly fat and heavy chest)

सुटलेलं पोट, कंबर लपविण्यासाठी कसे कपडे घालावे?

 

कपड्यांमधून शरीराचा लठ्ठपणा, बेढबपणा जाणवू नये आणि अधिक आकर्षक स्लिम दिसावं यासाठी कपड्यांची निवड कशी करावी, याविषयीची माहिती ishitasalujaimageconsultancy या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

जास्वंद असो किंवा गुलाब, मोगरा... सगळीच फुलझाडं फुलांनी बहरून जातील- बघा ३ सोपे उपाय

१. कपडे घालताना दोन्ही बाजुंनी कट असणारे जास्त शॉर्ट कुर्ते निवडू नका. त्यातून तुमच्या कंबरेचा भाग जास्त जाणवतो.

२. तसेच कट नसणारे बॉक्सी किंवा फ्रॉक स्टाईलचे शॉर्ट कुर्तेही घालू नका. कारण या कपड्यांच्या घेरदार, फुगीर स्टाईलमुळे आणि कमी उंचीमुळे त्यात तुम्ही आहात त्यापेक्षा जास्तच हेल्दी दिसता.

 

३. सुटलेलं पाेट, कंबर झाकून टाकण्यासाठी सुळसुळीत कपडा असणारे सॉलिड कलरचे आणि लांब कुर्त्यांची निवड करा. यातून तुमचा लठ्ठपणा दिसणार नाही.

रोज रात्री 'हा' पांढरा पदार्थ कणभर खा, ॲसिडिटी- पायांतले क्रॅम्प्स असे बरेच त्रास होतील छुमंतर...

४. लांब, घेरदार अनारकली ड्रेसही तुम्हाला छान दिसतील. तसेच लेयर्स किंवा प्लेट्स असणारा लाँग कुर्ताही छान दिसेल. यात तुम्ही स्लिम- स्मार्ट दिसाल.

५. व्हर्टिकल डिझाईन्स असणारा मोनोक्रोमॅटिक कुर्ता घातल्यानंतरही आपण आहोत त्यापेक्षा जास्त स्लिम आणि उंच दिसतो. 

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्समहिला