अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा बजेट सादर करतात, तेव्हा देशाच्या तिजोरीच्या चाव्या एका महिलेच्या सक्षम हातात आहेत, हे पुन्हा एकदा दरवर्षी नव्याने सिद्ध होत जाते. ते पाहूनच भारतातल्या तमाम स्त्रियांची छाती अभिमानाने फुलून येते. आजचा दिवसही काहीसा तसाच आहे. दरवेळी बजेट सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी कोणत्या साडीची निवड केली आहे, याकडे अनेकांचे आणि विशेषकरून महिलांचे लक्ष खिळलेले असते. यंदाही तसेच असून यावेळी अर्थमंत्र्यांनी निळसर रंगाची टसर सिल्क साडी नेसली असून त्या साडीवर सुंदर कांथावर्क करण्यात आलेले आहे. (Finance minister Nirmala Sitaraman wear tussar silk saree having kantha work for presenting interim budget 2024)
भारतीय हातमागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्मला सीतारामन यांचा नेहमीच प्रयत्न असतो. अनेकदा बजेटमधूनी त्यांनी तशी आर्थिक तरतूद केलेली दिसून येते. vocal for local अशी त्यांची भुमिकाही नेहमीच असते.
घरातली धूळ- दुर्गंधी कमी करणारी ३ रोपं, घर नेहमीच वाटेल फ्रेश- पॉझिटिव्ह, लावून तर पाहा
त्यानुसारच त्या दरवेळी अशा एखाद्या खास सिल्कच्या साडीची निवड करत असतात. निर्मला सीतरामन यांनी जी साडी नेसलेली आहे, त्या साडीचा रंग दक्षिण भारतात ‘Ramar blue’ या नावाने ओळखला जातो. या रंगाचा थेट संबंध नुकत्याच झालेल्या अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशीही जोडण्यात येत आहे.
कांथा वर्क म्हणजे काय?
काही भागात या कलेला कांता किंवा कंथा असेही म्हणतात. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओडिशा अशा भारताच्या पुर्वेकडील प्रदेशांमध्ये कांथा वर्क प्रामुख्याने केले जाते. एम्ब्रॉयडरीचा हा एक अतिशय जुना प्रकार म्हणून ओळखला जातो.
कमाल.... २ आठवड्याच्या लेकीला घेऊन मिसेस वर्ल्ड स्पर्धेत गेलेली हन्ना आहे ८ मुलांची सुपरमॉम
कांथा वर्क या प्रकारात ७ वेगवेगळ्या प्रकारांनी विणकाम केले जाते. साडी, पंजाबी ड्रेस, ओढणी, कुर्ता, लुंगी अशा कपड्यांवर प्रामुख्याने कांथा वर्क केले जाते. सिल्क आणि कॉटनच्या कपड्यांवर खासकरून कांथा वर्क आढळून येते.