Join us  

पंजाबी ड्रेसमध्ये तुमची उंची खूप कमी दिसते ? ४ सोपे उपाय, पंजाबी ड्रेस घालून दिसा उंच आणि आकर्षक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 1:34 PM

4 Useful Tips to Select Salwar Kameez If You’re Short : सलवार सूटचा योग्य रंग, प्रिंट आणि योग्य हाईटची बॉटम कशी निवडायची, ते जमलं तर पंजाबी ड्रेसही दिसेल ग्लॅमरस...

जेव्हा महिलांच्या आऊटफिट्सचा विचार येतो तेव्हा त्यांना खूप चॉइसेस उपलब्ध असतात. जीन्स पॅण्ट - टॉप, साडी, फॉर्मल्स, वन पीस गाऊन, पंजाबी ड्रेस असे अनेक पर्याय महिलांसाठी असतात. यापैकी सलवार - सूट हा अतिशय आरामदायक भारतीय आऊटफिट आहे. काही महिला रोज ऑफिसला जाताना किंवा काही खास सणवार, विशेष प्रसंग असला की सलवार सूट आवडीने घालणे पसंत करतात. एकापाठोपाठ एक सण आणि लग्ने असल्याने अनेकदा काय परिधान करावे असा विचार येतो. या विचाराने आपण गोंधळून जातो. अशावेळी बहुतेक लोक भारतीय पोशाख परिधान करणे पसंत करतात. साडी हाताळणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. तर दुसरीकडे, लेहेंगा तुम्हाला काही प्रसंगी थोडा जास्त स्टाईलिश दिसू शकतो. अशावेळी काही फंक्शन्ससाठी सूट हा एक उत्तम पर्याय असतो आणि ते कॅरी करायलाही सोपे असते(How to look more attractive & tall in a salwar kameez)

सलवार - सूट हा कित्येक महिलांच्या अत्यंत आवडीचा व आरामदायक पोशाख आहे. असे असले तरीही उंचीने कमी असणाऱ्या महिलांना हे आऊटफिट परिधान करताना संकोच वाटतो. काही महिलांची उंची कमी असल्याने त्या सलवार - सूट घातल्यावर आणखीनच (How To Look Slim and Tall in Salwar Suits?) उंचीने कमी दिसतात. सलवार - सूट घातल्याने आपण त्यात उंचीने फारच कमी दिसतो अशी कित्येकजणींची तक्रार असते. फक्त या एका छोट्याशा समस्येमुळे काही महिलांना सलवार - सूट(Fashion Tips:-Short height girls should wear Salwar Kameez to look taller)मनापासून आवडूनही तो घालणे त्या टाळतात. यासाठीच आपण काही सोप्या फॅशन टिप्स वापरुन नेहमीच्या त्याच सलवार - सूटमध्ये कसे उंच व आकर्षक दिसू शकतो, हे पाहूयात(Follow These Tips If You Want To Look Taller While Wearing A Salwar-suit).

नेहमीच्या त्याच सलवार - सूटमध्ये उंच व आकर्षक दिसण्यासाठी टिप्स... 

१. सलवार - सूट गडद रंगाचा निवडा :- जर आपली उंची कमी असेल तर उंच दिसण्यासाठी सलवार - सूटमध्ये नेहमी गडद रंगाचे कुर्ते घालावेत. गडद रंग एक प्रकारचा भ्रम निर्माण करतात, ज्यामुळे उंची कमी असली तरी आपण त्यात उंच दिसतो. आपल्या त्वचेच्या टोननुसार हिरवा, निळा, जांभळा, काळा आणि मरून अशा शेड्सची निवड करावी.

महागड्या सिक्विन साडीची काळजी घेण्याच्या ६ टिप्स, नाहीतर चमचमती साडी पडेल काळी...

२. सलवार - सूटवरील प्रिंटची योग्य निवड :- सलवार - सूट खरेदी करताना आपण जसे त्याचा रंग पहातो, तितकेच त्याच्या प्रिंटकडे देखील लक्ष देणे गरजेचे असते. योग्य रंगासोबतच अचूक प्रिंट असणारा सलवार - सूट खरेदी करणे देखील तितकेच महत्वाचे असते. सलवार - सूट घातल्यानंतर आपली उंची त्यात कशी दिसते, हे त्याच्यावर असणाऱ्या प्रिंटवर अवलंबून असते. जर आपल्या सलवार सुटच्या कपड्यावर मोठे व आडवे प्रिंट असेल तर त्यात आपण अधिकच उंचीने कमी दिसाल. याउलट जर आपण लहान व उभी प्रिंट निवडाल तर आपण अधिक उंच व आकर्षक दिसण्यात मदत होते. 

"हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...

३. कुर्त्याच्या उंचीकडे विशेष लक्ष द्या :- सलवार - सूट शिवताना किंवा विकत घेताना त्यातील कुर्त्याच्या उंचीकडे विशेष लक्ष द्यावे. आजकाल फ्लोअर लेन्थ, नी लेन्थ पर्यंतचे कुर्ते फारच ट्रेंडमध्ये आहेत आणि ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात यात शंका नाही. परंतु जर आपली उंची कमी असेल तर असे लांब सूट निवडण्याची चूक करू नका कारण यामुळे आपली उंची आणखीनच कमी दिसेल. याउलट जर आपल्याला सलवार - सूटमध्ये उंच दिसायचे असेल तर ढोपरा पर्यंत किंवा ढोपरायच्या किंचित खालपर्यंत उंची असणारे कुर्ते निवडा, यामुळे आपली उंची अधिक दिसण्यास मदत होईल. जर आपल्या मांड्या जाड असतील तर कधीही शॉर्ट कुर्ते घेऊ नका, यामुळे आपण अधिक जाड व कमी उंचीच्या दिसाल. 

माथापट्टी डोक्यावरुन सतत घरसते, भरजरी-स्टायलिश लूकचा पचका होतो? १ सोपी ट्रिक-माथापट्टी बसेल मस्त फिट...

४. चुडीदार - पायजमा निवडताना :- सलवार सूटमध्ये जितका कुर्ता महत्वाचा असतो तितकाच त्याच्या खालचा पायजमा किंवा चुडीदार यांची योग्य निवड करणे आवश्यक असते. जर आपण कुर्तीसोबत सिगार पॅण्ट, चुडीदार, लेगिंग्स घालणार असाल तर ते नेहमी अ‍ॅकल लेंथ म्हणजेच पायाच्या घोट्यापर्यंत असावे. कुर्त्याखाली कोणत्याही प्रकारचा बॉटम घालताना तो फुल्ल लेंथचा निवडण्याऐवजी अ‍ॅकल लेंथ म्हणजेच पायाच्या घोट्यापर्यंतचा असावा, यामुळे आपण अधिक उंच दिसण्यास मदत होते.

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्स