गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी प्रचंड चर्चेत आहे. ती लवकरच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासह लग्नगाठ बांधणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी यांचा शाही विवाह सोहळा जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये पार पडणार असून, त्यांच्या लग्नासंदर्भात अनेक अपडेट्स सोशल मिडीयावर येत आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट वर्तुळात गॉसिप्स सुरू होत्या. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम देण्यात आला आहे.
कियाराने कमी कालावधीत बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. कबीर सिंग या चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या कियाराने, तिच्या अद्भुत परिवर्तनाने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. तिने फगली या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिचा डेब्यू फगली फिल्मतील लूक आणि सध्याचा जुग जुग जियो या चित्रपटातील लुकमध्ये जमीन - आसमानचा फरक आहे. चला तर मग तिच्या या लुकवर नजर टाकूया..
फगली चित्रपटातून ठेवलं सिनेसृष्टीत पाऊल
कियारा तिच्या स्टायलिश लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या बायोपिकमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या चित्रपटापासून ती आपल्या दमदार अभिनयामुळे यशाच्या वाटेवर सतत पुढे जात राहिली. फॅशन आयकॉन म्हणून उदयास आलेली कियारा तिच्या प्रत्येक लुकने लोकांची मने जिंकत आली आहे.
बालपणी कियारा दिसायची गोंडस
सध्या तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावणारी अभिनेत्री बालपणीही खूप गोड आणि प्रेमळ दिसायची. कियारा अनेकदा तिचे बालपणीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसते. चाहते देखील तिच्या या लुकवर फिदा आहेत.
लग्नातील लुकसाठी चाहते आतुर
कियारा एमएस धोनी या चित्रपटादरम्यान खूपच वेगळी दिसत होती. मात्र गेल्या काही वर्षात तिने तिच्या अप्रतिम परिवर्तनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. कियाराने चेहऱ्याच्या फिचरवर कमालीचा वर्क केला. तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचे चाहते आता तिच्या वेडिंग लूक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.