माधुरी दीक्षित आणि तिच्या ड्रेसिंग स्टाईल (dressing style of Madhuri Dixit), या नेहमीच चर्चेचा विषय असतात. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या सिझन १० च्या माध्यमातून माधुरी नेहमीच तिच्या चाहत्यांसमोर येत असते. या कार्यक्रमात माधुरीची झलक दिसली की तिचे चाहते सुखावून जातात. आणि खासकरून महिला वर्ग तिच्या नवनविन ड्रेसिंग स्टाईलकडे बघून हरखून जातो. पारंपरिक त्याचप्रमाणे वेस्टर्न, इंडोवेस्टर्न कपडे माधुरी (Green colour Bandhej or Bandhani saree of Madhuri Dixit) मोठ्या खुबीने कॅरी करते. साड्यांमध्ये जेवढी सुंदर दिसते, तेवढ्याच नजाकतीने ती वेस्टर्न गाऊनही घालते. आता सध्या माधुरीच्या एका साडीची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.
गर्द हिरव्या रंगाची बांधणी प्रकारातली साडी माधुरीने नुकतीच नेसली होती. ही साडी तिने ती ज्या पद्धतीने कॅरी केली आहे, ती स्टाईल, खरोखरच तिला अतिशय शोभून दिसते आहे.
केस सारखे चिपचिपीत होतात? सोपा घरगुती उपाय, केस होतील शायनी- सिल्की
बऱ्याचदा बांधणीची साडी नेसल्यानंतर त्यावर कशा पद्धतीचे दागदागिने घालावे, हे अनेकदा लक्षात येत नाही. त्यामुळे बांधणी साडीवर नेमकी कशी फॅशन करावी, हे माधुरीच्या या लूकवरून बरोबर लक्षात येतं. या साडीवर तिने हिरव्या स्टोनने जडवलेल्या बांगड्या, तसेच हिरव्या स्टोनची अंगठी आणि मोठे झुमके घातले आहेत. कानातले मोठेच असल्याने गळ्यात काहीही घातलेलं नाही. कपाळावरची छोटीशी हिरवी टिकली तिचे सौंदर्य आणखी वाढवते आहे..
माधुरीच्या साडीची खासियत...आधीच सांगितल्याप्रमाणे माधुरीची साडी बांधणी प्रकारातली आहे. काही ठिकाणी साडीचा हा प्रकार बांधेजा सिल्क साडी म्हणूनही ओळखली जाते.
माधुरीने नेसलेली साडी Raw Mango या ब्रॅण्डची आहे. पारंपरिक टाय- डाय प्रकारातल्या या साडीला सोनेरी बॉर्डर असून त्यावर गोल्डन वर्क केलेलं आहे. काही ठिकाणी कुंदन वर्कही करण्यात आले आहेत. या साडीची किंमत तब्बल ९५ हजार रुपये आहे, असं या ब्रॅण्डच्या ऑनलाईन साईटवर आहे.