Join us  

गुढी पाडव्याला नऊवारी नेसायची आहे? पाहा ३ पद्धती, झटपट नेसा परफेक्ट नऊवारी साडी; युनिक स्टायलिंग टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 11:10 AM

Gudi Padwa 2023 : आजकाल साडी स्टिच करून घेण्याचं प्रमाण वाढलंय. जर तुम्हाला घरी कोणीही साडी नेसवून देणारं नसेल तर तुम्ही हवीतशी साडी शिवून घेऊ शकता.

हिंदू नवीन वर्षांचा पहिला सण म्हणजे  गुढी पाडवा. (Gudi Padwa 2023)  महाराष्ट्रभरातील स्त्रीया या दिवशी पारंपारीक वेशभूषेत हा सण साजरा करतात. शोभा यात्रेत सहभागी होताना किंवा गुढी उभारताना आपण छान, सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं.  महाराष्ट्रीयन स्त्रियांचा पारंपारीक पोशाख म्हणजे नऊवारी. (How to drap perfect nauvari saree) आजकाल बायका आपल्या मनाप्रमाणे हवीतशी नववारी साडी शिवून घेतात. ब्राम्हणी, मस्तानी, पेशवाई असे अनेक नऊवारीचे साडीचे प्रकार शिवून मिळतात. (Gudi Padwa special how to wear nauvari saree)

पण नेसलेल्या नऊवारीसाडीप्रमाणे पारंपारीक लूक या शिवलेल्या साड्यांचा येत नाही. नऊवारी साडी नेसण्याची सवय नसल्यानं अनेकदा साडीचा फुगा होतो आणि बायका आहेत त्यापेक्षा जास्त जाड दिसतात. नऊवारी साडी नेसण्याच्या काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर कमी वेळात तुम्हाला डिसेंट लूक मिळेल.

कोणतीही साडी असेल तर ती व्यवस्थित नेसली गेली नाही पूर्ण लूकच बिघडतो. साडी नेसण्याची परफेक्ट पद्धत माहिती असेल. ऐनवेळी घाई होत नाही. साडी खोचण्यापासून ते पदरलावण्यापर्यंत या स्टेप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.  कमीत कमी वेळात तुम्ही घरातल्या इतर व्यक्तींच्या मदतीनं साडी नेसू शकता. 

आजकाल साडी स्टिच करून घेण्याचं प्रमाण वाढलंय. जर तुम्हाला घरी कोणीही साडी नेसवून देणारं नसेल तर तुम्ही हवीतशी साडी शिवून घेऊ शकता. पण परफेफ्ट नववारी नेसता येत असेल तर तुम्ही कधीही, कुठेही सण समारंभाला ही साडी नेसू शकता. 

टॅग्स :साडी नेसणेगुढीपाडवास्टायलिंग टिप्स