हाय हिल्स घालून कायमची पायदुखी, टाचादुखी मागे लागू शकते. हाय हिल्स घालण्याचं आणि ते घालून चालण्याचं एक तंत्र आहे. त्यातल्या काही गोष्टी जर माहिती करुन घेतल्या तर हिल्स घालून चालणं तर सोपं होईलच, पाय दुखणे, पाठ दुखणे असे आजारही मागे लागणार नाहीत. नाहीतर पाठदुखण्यासह पाठदुखण्याचाही आजार मागे लागेल. ऐन तारुण्यात हे परवडणारे नाही(Hacks for a comfortable high heels experience).
हिल्स घातली की काय काळजी घ्याल?
१. पायाच्या दुमडणाऱ्या बोटांना टेप लावून जर तुम्ही हाय हिल्स घातले तर तुमचा त्रास कमी होऊ शकतो. कारण डबल टेपमुळे तुमची बोटे आणि तळवे शूजला चिकटून राहतात. ज्यामुळे तुमच्या पायाला शू बाईट अथवा जखमा होत नाहीत. शिवाय पायाच्या बोटांना होणाऱ्या वेदनाही यामुळे जाणवत नाहीत.
लठ्ठपणा, ओघळलेले स्तन यामुळे फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत? ४ टिप्स, करा योग्य कपड्यांची निवड...
२. हाय हिल्सच्या फेटवेअरमध्ये इनसोल्स घातल्यामुळे तुमच्या पायांना जास्त त्रास होत नाही. बऱ्याच शॉपमध्ये सिलिकॉनचे इनसोल्स मिळतात. ज्यामुळे तळव्यांना मऊपण मिळतो आणि पाय दुखत नाहीत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जेलचे थंडगार इनसोल्सही यासाठी वापरू शकता.
हाय हिल्स घालायचे पण पडण्याची भीती वाटते? ५ गोष्टी करा, चाला बिंधास्त...
३. पायात हिल्स घातल्यावर पाय दुखू लागल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला बाहेर गेल्यावर हिल्स काढून ठेवण्याचा मोह होतो. मात्र अशा वेळी हिल्स काढू नका कारण असं केल्यामुळे आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो. कारण हिल्स सारखं काढणं आणि घालणं यामुळे पायात सूज येऊ शकते.
४. पायात शूज घालण्यापूर्वी तळव्यांना हायड्रेटिंग क्रिमने मसाज करावा. ज्यामुळे शूज पायाला घासले जाणार नाहीत आणि वेदना कमी होतील.
"हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...
५. जर तुमच्या पायाला खूप घाम येत असेल आणि त्यामुळे हाय हिल्स घालणं तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर शूज घालण्यापूर्वी पायावर थोडी टाल्कम पावडर लावा.
६. नवीन फूटवेअर जर तुम्हाला एखाद्या दिवशी पहिल्यांदाच भरपूर वेळ घालायचे असतील तर घरीच एक आठवडाभर ते घालण्याची सवय लावा.
७. जरी तुमच्या पायाला वेदना हो असतील तरी हिल्स घालून एकाच ठिकाणी थांबू नका. अशा वेळी थोडं थोडं चालत राहणं जास्त फायद्याचं ठरू शकतं.