अभिनेत्री विद्या बालन (actress Vidya Balan) आणि तिचं साडी प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. साडी हा तिचा अतिशय आवडीचा पेहराव. त्यामुळेच तर एखाद्या भव्य ॲवॉर्ड सोहळा असो किंवा मग छोटेखानी कार्यक्रम.. विद्या बऱ्याच वेळा साडीमध्येच दिसते. तिच्या साड्याही अगदी एक से बढकर एक असतात. कांजीवरम साडी असो की एखादी कॉटन साडी. विद्याच्या अंगावर ती एवढी खुलून दिसते की अनेक जणींनाही मग आपल्याकडे अशीच साडी असावी, असा मोह होतो.. पण नेहमीच तिच्या साड्यांच्या किमती आपल्याला परवडेबल असतील, अशा नसतात.
म्हणूनच तर तिची ही लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट बघा आणि साडी आवडली असेल, तुम्ही लिनन साड्यांचे (Handloom linen saree ) चाहते असाल, तर विद्याची ही साडी घेऊन टाका. कारण या साडीची किंमत खरोखरीच आपल्या अनेक मैत्रिणींच्या बजेटमधली असू शकते. विद्याने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती बेबी पिंक आणि पांढऱ्या रंगाच्या एका सुंदर हॅण्डलूम लिनन साडीमध्ये दिसते आहे. या साडीवर पांढऱ्या आणि बेबी पिंक रंगाचे आडवे पट्टे आहेत..
विद्याची ही साडी boveeecom या ब्रॅण्डची असून साडीची किंमत ५,३४२ रुपये आहे. सिंपल आणि तरीही फॅशनेबल, स्टायलिश अशा प्रकारची ही साडी आहे. ऑफिस किंवा एखाद्या छोटेखानी पार्टीसाठी ही साडी तुम्हाला एक परफेक्ट लूक देऊ शकते. प्युअर लिनन प्रकारातली असल्याने ही साडी अतिशय लाईटवेट आहे. साडीचे वजन अवघे ०. ४ किलो आहे.
लिनन साडीबाबत आणखी काही.... (speciality of linen saree)लिनन साडी प्रकार सध्या झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या साड्या अंगावर अतिशय छान दिसतात. हा प्रकार थोडाफार कॉटनकडे झुकणारा असतो. अतिशय लाईटवेट म्हणून लिनन ओळखले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात लिननचे कलेक्शन हमखास ट्रेण्डमध्ये असते. दिवसभर अंगावर राहिली तरी या साडीचे ओझे जाणवत नाही. त्यामुळे ऑफिसवेअरसाठीही लिनन साडी परफेक्ट मानली जाते.