Lokmat Sakhi >Fashion > अनन्या पांडेची सव्वा लाखाची ऑर्गेंझा सिल्क साडी! हॉट रेड साडीची नजाकत अशी की......

अनन्या पांडेची सव्वा लाखाची ऑर्गेंझा सिल्क साडी! हॉट रेड साडीची नजाकत अशी की......

Organza saree of actress Panday: साडी लव्हर (saree lover) असाल, तर अभिनेत्री अनन्या पांडेचा हा हॉट रेड साडीतला स्पेशल लूक एकदा बघायलाच हवा.. तिची साडी आणि साडी कॅरी करण्याची तिची पद्धत, दोन्हीही अगदी खास आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 05:15 PM2022-07-25T17:15:17+5:302022-07-25T17:15:38+5:30

Organza saree of actress Panday: साडी लव्हर (saree lover) असाल, तर अभिनेत्री अनन्या पांडेचा हा हॉट रेड साडीतला स्पेशल लूक एकदा बघायलाच हवा.. तिची साडी आणि साडी कॅरी करण्याची तिची पद्धत, दोन्हीही अगदी खास आहे..

Hot red colour organza silk saree of actress Ananya Panday worth Rs. 1,28,000 | अनन्या पांडेची सव्वा लाखाची ऑर्गेंझा सिल्क साडी! हॉट रेड साडीची नजाकत अशी की......

अनन्या पांडेची सव्वा लाखाची ऑर्गेंझा सिल्क साडी! हॉट रेड साडीची नजाकत अशी की......

Highlightsऑर्गेंझा सिल्क हा प्रकार सध्या जबरदस्त हिट होत आहे. त्यामुळे अगदी दिड- दोन हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत या साड्या मिळत आहेत.

बॉलीवूडची हॉट ॲण्ड ब्यूटीफूल आणि तेवढीच नाजूक- साजूक अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे (Ananya Panday). सारा अली खान (Sara Ali Khan), जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) या नव्या पिढीच्या स्टार किड्ससोबत आणखी एका स्टारकन्येचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि ते म्हणजे अनन्या पांडे. एरवी अनन्या बऱ्याचदा वेस्टर्न आऊटफिट्समध्येच दिसून येते. साडी, लेहेंगा यासारखे पारंपरिक कपडे ती खूपच कमी घालते. पण म्हणूनच ती जेव्हा केव्हा आपल्या ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये (traditional saree look of  Ananya Panday) दिसते, तेव्हा तेव्हा तिची चांगलीच चर्चा रंगते. सध्याही असंच झालंय. अनन्याचा लाल रंगाच्या साडीतला एक लूक सध्या चांगलाच व्हायरल झाला असून त्याची जबरदस्त चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.

 

अनन्याचा लायगर (Liger) हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनन्या आणि या चित्रपटातला तिचा को- स्टार विजय देवरकोंडा हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच अनन्या नुकतीच हैद्राबादला गेली होती. तिथल्या कार्यक्रमासाठी तिने ही लाल रंगाची ऑर्गेंझा सिल्क साडी नेसली होती. तिची ही साडी अतिशय देखणी असून साडीची किंमतही तब्बल १ लाख २८ हजार रुपये आहे. सव्वा लाखांपेक्षाही जास्त किमतीच्या या साडीत अनन्या खरोखरंच देखणी दिसत होती. 

 

अनन्याच्या साडीची खासियत (Speciality of Ananya's organza saree)
- अनन्याने जी साडी नेसली होती, ती साडी फॅशन डिझायनर अर्पिता मेहता यांच्या कलेक्शनमधली होती.
- साडी आणि साडीचं ब्लाऊज दोन्हीही ब्राईट रेड रंगातलं होतं. मोनोटोनस लूक असूनही ती अतिशय ग्लॅमरस दिसत होती.

साडी नेसून कमाल सुंदर दिसायचंय, फॉलो करा आलिया भटचे हे ७ साडी ट्रेण्ड!
- एवढंच नाही तर तिच्या साडीवर करण्यात आलेलं मिरर वर्क देखील लाल रंगाच्या धाग्यानेच करण्यात आलेलं आहे.
- संपूर्ण साडीवर थोड्या- थोड्या अंतराने करण्यात आलेलं मिररवर्क आणि थ्रेड वर्क असलेले काठ अशा पद्धतीने ही साडी डिझाईन करण्यात आली आहे. 
- तिच्या साडीवर करण्यात आलेलं हे सगळं वर्क हॅण्ड एम्ब्रॉयडरी या प्रकारातलं असल्याने साडीची किंमत एवढी जास्त असल्याचं सांगितलं जातं. 

 

ऑर्गेंझा सिल्क साडीची खासियत
- ऑर्गेंझा सिल्क हा प्रकार सध्या जबरदस्त हिट होत आहे. त्यामुळे अगदी दिड- दोन हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत या साड्या मिळत आहेत.

वाणी कपूरची ५५ हजारांची स्टायलिश रफल साडी, झालरवाल्या साड्या सध्या एवढ्या का लोकप्रिय आहेत?
-  तलम कपडा आणि त्यामुळे वजनाला अतिशय हलक्या असणं हे या साड्यांचं आणखी एक वैशिष्ट्य
- या साड्यांचा फिल अतिशय रिच असतो. त्यामुळेच साड्यांमध्ये रिच, एलिगण्ट लूक हवा असल्यास अनेक महिलांकडून आणि अगदी बॉलीवूड सेलिब्रिटींकडूनही ऑर्गेंझा साड्यांना पसंती दिली जाते. 

 

Web Title: Hot red colour organza silk saree of actress Ananya Panday worth Rs. 1,28,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.