Lokmat Sakhi >Fashion > आपण विकत घेतो ती साडी खरेच प्युअर सिल्कची आहे की नाही, कसे ओळखाल? ५ टिप्स.. निवड परफेक्ट...

आपण विकत घेतो ती साडी खरेच प्युअर सिल्कची आहे की नाही, कसे ओळखाल? ५ टिप्स.. निवड परफेक्ट...

Know The Difference Between A Real Silk & A Fake Silk : प्युअर सिल्कची साडी नेमकी कशी ओळखावी आणि ती वर्षानुवर्षे कशी टिकून राहील यासाठी काही महत्वाच्या टीप्स समजून घेऊयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 06:24 PM2023-01-19T18:24:15+5:302023-01-19T18:28:27+5:30

Know The Difference Between A Real Silk & A Fake Silk : प्युअर सिल्कची साडी नेमकी कशी ओळखावी आणि ती वर्षानुवर्षे कशी टिकून राहील यासाठी काही महत्वाच्या टीप्स समजून घेऊयात.

How do you know if the saree you buy is really pure silk or not? 5 Tips.. Choice Perfect... | आपण विकत घेतो ती साडी खरेच प्युअर सिल्कची आहे की नाही, कसे ओळखाल? ५ टिप्स.. निवड परफेक्ट...

आपण विकत घेतो ती साडी खरेच प्युअर सिल्कची आहे की नाही, कसे ओळखाल? ५ टिप्स.. निवड परफेक्ट...

साडी म्हटलं की प्रत्येक स्त्रीचा अतिशय आवडता विषय आहे. साड्यांमध्ये नेहमीच ट्रेंड बदलत असतो. कधी भरगच्च भरलेल्या साड्या तर कधी अगदी साध्या साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. आजकाल जास्त प्रमाणात सिल्कच्या साड्यांचा ट्रेंड आहे. यामध्ये प्लेनपासून प्रिंटेड वर्कची फॅशन आहे. सिल्क साडीमध्ये खूप व्हरायटी पाहायला मिळतात. बनारसी सिल्क, सॅटिन सिल्क, कांजीवरम सॉफ्ट सिल्क असे अनेक प्रकार सिल्कच्या साड्यांमध्ये उपलब्ध असतात. 

साड्यांमध्येही सिल्कच्या साड्या या आपल्या सर्वांनाच जास्त प्रिय असतात. या साड्या इतर साड्यांच्या तुलनेत महागही असतात. इतकंच नाही तर याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. सिल्कच्या साड्यांची बाजारामध्ये खूपच मागणी असते. या साड्यांची ठेवण आणि याची कलाकुसर इतकी सुंदर असते की ही साडी प्रत्येकीलाच आपल्या वॉर्डरोबमध्ये असावी असं वाटतं. असं म्हटलं जातं की, सिल्कच्या साड्या खूप जपाव्या लागतात. तसंच या साड्या आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी बऱ्याच महिला त्या साड्या जपूनही ठेवतात. पण बऱ्याचदा प्युअर सिल्कची साडी खरेदी करताना आपली फसवणूक होते. ही फसवणूक होऊ नये म्हणून प्युअर सिल्कची साडी नेमकी कशी ओळखावी आणि ती वर्षानुवर्षे कशी टिकून राहील यासाठी काही महत्वाच्या टीप्स समजून घेऊयात(Know The Difference Between A Real Silk & A Fake Silk).

नक्की प्युअर सिल्कची साडी कशी ओळखावी?
 
१. जर आपण घेतलेली साडी फेक असेल तर... 

१. या साडीच्या कापडातील तीन - चार धागे घेऊन त्यांना माचीसच्या मदतीने आग लावा. 
२. या धाग्यांनी पेट घेतल्यानंतर काही काळाने जर आपण आग विझवली तरी ते धागे जळत राहतात. 
३. प्लॅस्टिकची एखादी वस्तू जाळल्यावर जसा वास येतो तसाच वास हे फेक कापडातील धागे जळताना येतो.    
४. हे फेक धागे जळून झाल्यानंतर त्यांचा गोळा तयार होतो. 
५. फेक सिल्क साडीच्या कापडातील धागे जाळल्यास हे धागे जळून त्याची राख तयार होत नाही. 


iylasilk या इंस्टाग्राम पेजवरून प्युअर सिल्कची साडी आणि फेक सिल्क कसे ओळखावे याबाबत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नक्की काय आहे या व्हिडीओत ते समजून घेऊयात.  


२. जर आपण घेतलेली साडी प्युअर सिल्कची असेल तर... 

१.  या साडीच्या कापडातील तीन - चार धागे घेऊन त्यांना माचीसच्या मदतीने आग लावा.
२. या धाग्यांनी पेट घेतल्यानंतर ते जळताना केस जळल्यावर जसा वास येतो तसाच वास आल्यास तुमची साडी ही प्युअर सिल्कची आहे. 
३. प्युअर सिल्कच्या साड्यांचे धागे जळताना त्यांची आग विझवल्यानंतर ते जळायचे लगेच थांबतात. 
४. प्युअर सिल्कच्या साडीच्या कापडातील धागे जाळल्यास हे धागे जळून त्याची राख तयार होते. 

सिल्कच्या साड्यांची काळजी कशी घ्यावी? 

१. जर आपल्याला सिल्कची साडी जास्त काळ टिकवायची असेल तर या साडीची घडी आपल्याला वेळोवेळी बदलत रहावी लागेल. सिल्कच्या साड्या  जेव्हा तुम्ही घड्या घालून ठेवता तेव्हा तुम्ही त्या सुती अथवा मलमलच्या कपड्यात लपेटून ठेवा. जेणेकरून साडी खराब होणार नाही. 

२. सिल्कची साडी कपाटात ठेवताना ती हँगरवर लटकून ठेऊ नका. यामुळे हँगरचे डाग त्या साडीवर पडण्याची शक्यता असते. असं केल्याने साडी त्या जागी विरळ होण्याची शक्यताही असते. त्यामुळे जास्त काळ सिल्कची साडी टिकवायची असेल तर तुम्ही ती साडी एखाद्या बॉक्समध्येही ठेवू शकता.

३. अनेक वेळा साड्या न धुतल्याने त्यांना दुर्गंधी येते. हा दुर्गंध दूर करण्यासाठी आपण साड्यांना उन्हात वाळवून ठेवू शकता. एक दोन महिन्याने एकदा या साड्यांना नक्कीच उन्हात वाळवून घ्या. त्यामुळे सिल्क साड्यांची जी चमक आहे ती तशीच राहील. 

४. सिल्कच्या साड्यांना घरात इस्त्री करायची असेल तर एक लक्षात घ्या की, इस्त्री करताना अगदी हलक्या हाताने इस्त्री करा. पण पाण्याचा अजिबात उपयोग करू नका. त्यामुळे साडीवर डाग पडून साडीचा रंग उडू शकतो किंवा ती काळी पडू शकते. 

५. सिल्कची साडी कपाटात ठेवताना नेहमी सुती किंवा तलम कापडामध्ये पॅक करून ठेवावी. सिल्कच्या साड्यांमध्ये दमटपणा निर्माण झाला तर त्याचे रंग एकमेकांमध्ये मिसळू शकतात.

Web Title: How do you know if the saree you buy is really pure silk or not? 5 Tips.. Choice Perfect...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन