गपंचमीचा सण आता अवघ्या काही दिवसांवरच आला आहे. रंगपंचमी या सणाच्या दिवशी सगळीकडे फार उत्साहाचे आणि आनंद, जल्लोषाचे वातावरण असते. रंगपंचमी (Holi 2025) दिवशी एकमेकांना रंग (Tips For Making White Suit For Holi Celebration 2025 ) लावून हा सण साजरा केला जातो. या रंगपंचमीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. या दिवशी बहुतेक सर्वचजण पांढऱ्या रंगाचे कपडे घालून रंगपंचमी खेळतात. विशेषतः महिला या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. शुभ्र पांढऱ्या रंगाचे कपडे घालून होळी खेळण्यात मज्जा काही औरच असते(How do you make a white dress not see through on Holi).
या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर जेव्हा रंगीबेरंगी रंग उडवून रंगपंचमी खेळली जाते, तेव्हा खरा या सणाचा आनंद घेता येतो. परंतु पांढरे कपडे घालून रंगपंचमी खेळताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर उडालेले रंग काढणे म्हणजे सगळ्यात कठीण काम असते. इतकेच नव्हे तर काहीवेळा आपण ओले रंग किंवा पाण्याने रंगपंचमी खेळतो तेव्हा ते पांढरे कपडे भिजून पारदर्शक होऊ लागतात. याचबरोबर अशा पारदर्शक कपड्यातून काहीवेळा आपले इनरवेअर दिसण्याची शक्यता असते. यासाठी रंगपंचमी खेळताना जर पांढरे कपडे घालत असाल तर विशेषतः महिलांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबद्दल अधिक माहिती पाहूयात.
रंगपंचमी निमित्त पांढरे कपडे घालताना कोणती काळजी घ्यावी ?
१. उत्तम दर्जाच्या फॅब्रिक्सची निवड करा :- रंगपंचमी निमित्त जर तुम्ही पांढरे कपडे घालणार असाल तर त्या कपड्याचे फॅब्रिक उत्तम दर्जाचे असावे. जेणेकरुन रंगपंचमी खेळताना आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. शक्यतो, कॉटन किंवा लेनेन सारख्या कपड्यांचाच वापर करावा. शक्यतो नायलॉग, सॅटिन यांसारखे अंगाला चिकटणाऱ्या फॅब्रिक्सपासून तयार करण्यात आलेले कपडे घालणे टाळावे. कारण अशा कपड्यांवर पाणी पडल्यावर ते पारदर्शक होतात तसेच अंगाला चिकटून बसतात यामुळे आपल्याला चारचौघात अवघडल्या सारखे होते.
वजन कमी करण्यासाठी भाज्या खाताय पण कोणत्या? ‘या’ ६ भाज्या वाढवतात तुमचं वजन भरभर...
२. योग्य इनरवेअर्सची निवड करावी :- कोणत्याही प्रकारचे पांढरे कपडे हे थोड्याफार प्रमाणांत पारदर्शक असतातच. यासाठी पांढऱ्या कपड्याच्या आत नेहमी इनरवेअर घालावी. जेणेकरून त्या कपड्यांचा पारदर्शकपणा कमी होण्यास मदत होते. याचबरोबर, पांढऱ्या कपड्यात नेहमी पांढरी किंवा कोणत्याही लाईट - न्यूड शेड्सची इनरवेअर घालावी. जर तुम्ही गडद रंगांच्या इनरवेअर्स घातल्या तर त्या पांढऱ्या कपड्यातून दिसण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे तर रंगपंचमी खेळताना कपड्यांवर पाणी सांडल्याने ते भिजून पारदर्शक होतात. अशावेळी आतील इनरवेअर जर गडद रंगांची असली तर ती पांढऱ्या कपड्यातून दिसू शकते. यासाठी योग्य रंगाच्या इनरवेअर्सची निवड करून ती पांढऱ्या कपड्यांच्या आत घालावी.
स्किन टोननुसार योग्य रंगांच्या कपड्यांची निवड कशी कराल ? ४ टिप्स, निवडा परफेक्ट कलरचे ड्रेस...
३. कपड्यांचा जास्तीचा एक जोड सोबत ठेवावा :- रंगपंचमी खेळायला जाताना जास्तीच्या कपड्यांचा एक जोड कायम सोबत ठेवावा. जर आपले पांढरे कपडे जास्तीच रंगांमुळे खराब झाले तर अशावेळी आपण कपडे बदलू शकतो यासाठी कपड्यांचा एक जोड जास्तीचा ठेवावा.
४. एखादे जॅकेट सोबत ठेवा :- होळी खेळायला जाताना आपल्यासोबत एक जॅकेट सोबत ठेवा. जेणेकरुन आपले पांढरे कपडे भिजून पारदर्शक झालेच तर आपण त्यावर जॅकेट घालून स्वतःला पुन्हा कम्फर्टेबल करु शकतो.
पारंपरिक खणाचा मॉडर्न ट्रेंड! खणाच्या दागिन्यांचा सुंदर साज, शोभून दिसतील असे 'खण'खणीत दागिने...
५. कपड्यांचे फॅब्रिक जाड असावे :- रंगपंचमी साठीच्या कपड्यांची निवड करताना कपड्याचे फॅब्रिक थोडे जाडसर असावे, अशाच कपड्यांची निवड करावी. जेणेकरून जाड कापड अंगाला पटकन चिकटत नाही.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा ...
१. चप्पल किंवा स्लीपर्स घालून रंगपंचमी खेळू नका कारण ते घसरण्याची शक्यता असते. यासाठी, फ्लॅट सॅंडल, स्नीकर किंवा रबरी सोल असणाऱ्या चप्पला घालाव्यात. यामुळे आपण पाण्यावरून घसरत नाहीत.
२. जास्त हेव्ही किंवा नाजूक दागिने घालू नका, केमिक्लसयुक्त रंगांमुळे तुमचे दागिने खराब होऊ शकतो.
३. त्वचेची देखील योग्य काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. रंगपंचमी खेळायला जाण्यापूर्वी केस, त्वचेला तेल लावून जावे.