Join us  

How to be Stylish? - एकदम स्टायलिश दिसायचं आहे? फक्त १० गोष्टी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 6:25 PM

Fashion Tips: आपल्या काही मैत्रिणी खूपच स्टायलिश दिसतात.. नेमकं काय करतात ते कळत नसतं, पण तरीही त्यांचा एकंदरीतच वावर अतिशय आकर्षक (stylish attractive look) असतो.. कसं बरं साधतं त्यांना हे सगळं?

ठळक मुद्देतुमच्या रोजच्या राहणीमानात हे १० छोटेसे बदल केले तरी तुमचा लूक पुर्णपणे बदलू शकतो आणि तुम्ही एकदम स्टाईलिश दिसू शकता...

स्टायलिश दिसण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागत असेल, खूप वेळ द्यावा लागत असेल.... असं जर काही तुमच्या मनात असेल तर ते काढून टाका.. कारण स्टाईलिश दिसण्याचा (how to look stylish) आणि या सगळ्या गोष्टींचा खूप काही संबंध आहे, असं नसतं. आता महागड्या आणि ब्रॅण्डेड गोष्टी वापरल्याने अर्थातच तुमचा लूक, पर्सनॅलिटी बदलते. पण अगदी बजेटमधल्या गोष्टी वापरून देखील कमाल स्टाईल करता येते. त्यासाठी फक्त थोड्याफार फॅशन सेन्सची गरज असते.. तुमच्या रोजच्या राहणीमानात हे १० छोटेसे बदल केले तरी तुमचा लूक पुर्णपणे बदलू शकतो आणि तुम्ही एकदम स्टाईलिश दिसू शकता... करून बघा. (10 tips to give you stylish look)

 

१. तुमची शरीरयष्टी कशी आहे, त्यानुसार कपड्यांची निवड करा.. कपडे नेहमी व्यवस्थित फिटिंगचेच असावेत. खूप सैल किंवा खूप तंग कपडे तुमचा लूक बिघडवतात. फिटिंगचे कपडे अंगावर असतील तर एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळतो.२. सध्या कोणता फॅशन ट्रेण्ड चालू आहे, ते जाणून घ्या आणि त्यानुसार कपड्यांचं सिलेक्शन करा. एखादी लेटेस्ट फॅशन लगेचच तुमच्या अंगावर दिसली, तर आजूबाजुच्या लोकांचाही तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.३. टॅन, काळा, पांढरा, डेनिम, ग्रे हे रंग Muted colors म्हणून ओळखले जातात. तसेच लाल, निळ्या, पर्पल, गोल्डन, हिरव्या रंगाच्या विविध शेड Good accent colors मानले जातात. कपड्यांसाठी नेहमी अशा पद्धतीचे कपडे निवडा. कारण कपड्यांचे हे रंग कधीच आऊटडेटेड होत नाहीत. भडक रंग टाळा. त्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटी नकारात्मक वाटू लागते.

४. बारीक प्रिंट, छोटी नक्षी असणारे सोबर रंगाचे कपडे नेहमीच ट्रेण्डी वाटतात. मोठेमोठे डिझाईन असणारे भडक, डार्क रंगाचे कपडे हे फक्त आऊटिंग, पिकनिक यासाठीच ठेवा.५. अंगावरचे कपडे आणि ॲक्सेसरीज नेहमीच मर्यादित ठेवा. यामुळे तुम्हाला डिसेंट लूक मिळतो. स्टोल, जॅकेट, हॅट, बांगड्या, गळ्यातली चेन हे सगळं एकाचवेळी घालाल तर ते विचित्र दिसेल. जेवढ्या कमी ॲक्सेसरीज तेवढा अधिक स्टायलिश लूक. ६. कधीही बाहेर जाताना मंद सुगंध असणारा परफ्यूम लावायला विसरू नका. कपडे खूप महागडे नसतील तरी चालेल, पण परफ्यूम मात्र उंची हवा.७. तुमचं घड्याळ, चष्मा, गॉगल, कानातले, गळ्यातलं, पर्स, क्लचर यासगळ्या गोष्टी तुमचा लूक ठरवत असतात. त्यामुळे या वस्तूंची निवडही काळजीपुर्वक करा. या सगळ्या वस्तू माईल्ड हव्या. त्यात भडकपणा किंवा झकपक रंग टाळा.

८. स्टायलिश दिसायचं असेल तर केसांवर लक्ष द्यावंच लागेल. पांढरे, तेलकट केस तुमचा सगळा लूक बिघडवतात. स्टाईलिश दिसण्यासाठी उगीच सवय नसताना किंवा केस व्यवस्थित सेट नसताना मोकळे सोडू नका. जी हेअरस्टाईल तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, तिच निवडा. केस नेहमी कलर केलेले आणि सिल्की असावेत.९. स्टाईलिश दिसण्यासाठी खूप मेकअप करण्याची मुळीच गरज नसते. लिमिटेड पण योग्य मेकअप असेल तरच तुम्ही अधिक आकर्षक दिसाल.१०. आत्मविश्वास... तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल तर ही एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तुमच्या वागण्या- बोलण्यातून, चालण्यातून, उठण्या- बसण्यातून तुमचा आत्मविश्वास दिसू द्या. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर एक वेगळीच छाप पडेल हे नक्की.

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्स