Join us  

पोटाची ढेरी वाढल्याने नेहमीच्या जीन्सचे बटण लागत नाही ? घ्या १ सोपा उपाय, जीन्स बसेल अगदी परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 8:17 PM

HOW TO BUTTON TIGHT PANTS : आपल्या देखील एखाद्या जुन्या जीन्सचे बटण व्यवस्थित लागत नसेल तर आपण एक सोपा उपाय करून पाहू शकतो....

जीन्स हे एक असे आऊटफिट आहे की जे प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये असतेच. कोणत्याही प्रकारचे शर्ट, टीशर्ट, कुर्ता यांच्याखाली जीन्स चढवली की आपण लगेच तयार. जीन्स हे हल्ली बहुसंख्य लोकांचे अगदी आवडीचे आऊटफिट झाले आहे. ऑफिससाठी फॉर्मल वेअर असो किंवा कॉलेजसाठी कॅज्युअल वेअर यासगळ्यात जीन्स अगदी परफेक्ट लूक आपल्याला देते. यासाठीच की काय सगळेचजण जीन्स घालणे पसंत करतात. सध्या स्टायलिश पॅन्टच्या विविध पॅटर्न बाजारांत उपलब्ध आहेत, परंतु जीन्सला अजूनही तितकीच डिमांड असल्याचे पाहायला मिळते. दर काही महिन्यांनी जीन्सचे ट्रेण्ड बदलत असतात, त्यामुळे जीन्स जुनी, आऊटडेटेड कधीच होत नाही. असे असले तरीही काहीवेळा आपण नवीन ट्रेंडनुसार नवीन जीन्स घेतो व जुनी जीन्स (Jeans Too Tight in the Waist? Fashion Stylist Shares Genius Hack to Wear Them Comfortably) तशीच पडून राहते. अशी एखादी जुनी जीन्स आपण जेव्हा खूप दिवसांनी किंवा वर्षांनी कपाटातून बाहेर काढतो तेव्हा ती कमरेला घट्ट किंवा लूज होते(How To Wear Pants That Are Too Tight-Useful Life Hack).

जुनी जीन्स वापरायला काढल्यावर काहीवेळा त्याचा रंग फिका झालेला असतो, तर काहीवेळा ती आपल्या मापाची राहिलेली नसते. याउलट काहीवेळा आपण किंचित जाड झालेलो असतो त्यामुळे देखील ही जीन्स आपल्याला होत नाही. अशा परिस्थिती टाईट झालेल्या जीन्सचे बटण कसे लावावे हा मोठा प्रश्न असतोच.   अशावेळी जर ती जुनी जीन्स आपल्या अगदी आवडीची असली तर ती घालण्याचा मोह होतोच. जर आपल्या देखील एखाद्या जुन्या जीन्सचे बटण व्यवस्थित लागत नसेल तर आपण एक सोपा उपाय करून पाहू शकतो(How to button jeans pants that are too tight).

जीन्सचे बटण लागत नसल्यास नेमके काय करावे ? 

१. जुन्या जीन्सचे जर बटण लागत नसेल तर आपण घरच्या घरी एक सोपा उपाय करून पाहू शकतो, यासाठी आपल्याला एक काळ्या किंवा जीन्सला मॅचिंग असणाऱ्या रंगाचा रबर बँड लागेल. 

२. सगळ्यात आधी जीन्सच्या बटणाच्या भोवती रबर बँडचे २ ते ३ फेरे गुंडाळून घ्यावेत. 

साडी नेसल्यावर खूप जाड दिसता ? ५ टिप्स, साडी नेसल्यावर दिसाल स्लिम - सुंदर - आकर्षक...

हेव्ही ब्रेस्ट - जाड दंड - ब्लाऊजचे फिटिंग कायम चुकते ? ४ सोप्या टिप्स, शिवा परफेक्ट ब्लाऊज...

३. जीन्सच्या बटणाभोवती रबर बँडचे फेरे गुंडाळण्याने तो रबर बँड व्यवस्थित बटणांभोवती बसेल. त्यानंतर बटणाचा विरुद्ध बाजूस असणाऱ्या काचेतून (फास्यातून) हा रबर बँड घालून बाहेर काढून घ्यावा. 

४. बटणाच्या विरुद्ध बाजूतून बाहेर काढलेला हा रबर बँड खेचून घेऊन पुन्हा त्याच बटणात व्यवस्थित अडकवून घ्यावा. अशाप्रकारे या रबर बँडचा वापर करून आपण जुन्या जीन्सचे न लागणारे बटण देखील अगदी झटपट लावू शकतो.

दीर्घकाळ स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊ शकते का ? एक्स्पर्ट सांगतात खरे कारण...

टॅग्स :फॅशनसोशल व्हायरल