मानसी सुरेश शिंदे, औरंगाबाद
बाजारात अनेक ट्रेण्डी फॅशनेबल कपडे येतात. पण त्यातले सगळेच कपडे आपल्या अंगावर शोभून दिसतील असं नाही. कारण आपली अंगकाठी कशी आहे, त्यावर बऱ्याचदा आपल्याला कोणते कपडे छान दिसतील, हे अवलंबून असते. खाली काही उदाहरणे दिली आहेत (How to choose clothes according to body shape?). त्यात तुम्ही कोणत्या प्रकारात येता ते ठरवा (How to identify your body shape) आणि त्यानुसार कपडे घालून बघा.
१. अवरग्लास शेप या शरीर रचनेमध्ये कमरेच्या वरचा व खालचा भाग रुंद असतो आणि कमरेचा भाग अरुंद असतो. ३६- २४- २६ हे माप शरीर रचनेमध्ये आदर्श मानल जात. छाती आणि नितंबाचे योग्य प्रमाण असल्यामुळे ही शरीरयष्टी अनेकांना परफेक्ट वाटते.
शिल्पा शेट्टीची रेसिपी 'ABS OF STEEL'; म्हणजे नेमकं काय? फिटनेससाठी आता हे काय भलतेच..
अशी शरीरयष्टी असेल तर फिट आणि स्ट्रक्चरल टॉप शोभून दिसतात. Wrap, किहोल, पेपलम अशा टॉपमध्येही तुम्ही छान दिसेल. जीन्स घेताना हाई वेस्टेड, वाईड लेग, स्किनी या प्रकारच्या जीन्स निवडा.जंपसूट देखील छान दिसेल.
२. पिअर शेप या शरीर रचनेमध्ये कमरेच्या वरचा भाग लहान असतो आणि खालचा भाग मोठा असतो. मांड्या जाड आणि नितंब मोठे असतात. अशा प्रकारच्या शरीर रचनेला पियर बोडी टाइप म्हणतात. अशा महिलांनी फिकट आणि प्रिंटेड पद्धतीचे कपडे, स्क्वेअर नेक, बोट नेक टॉप घालावेत. स्ट्रेट, स्लिम, बुटकट, हाई वेस्ट जीन्स तसेच ए लाईन आणि ऑफ शोल्डर ड्रेसही अशा बॉडी शेपला छान दिसतात.
३. उलटा त्रिकोणया प्रकारामध्ये छातीचा भाग मोठा असतो. खांदे, हात जास्त जाड असतात. तर नितंबाकडील भाग तुलनेत कमी असतो.
सॅण्डविचसाठी केलेली हिरवी चटणी लगेच काळी पडते? १ सिक्रेट पदार्थ टाका, चटणी राहील हिरवीगारअशा महिलांनी टॉप्स घेताना पेपलम स्कूप नेक, व्ही नेक असणारे तसेच ए लाईन, मिडी ड्रेसेस घ्यावेत. सध्या क्रॉप टॉप्स- जीन्स ट्रेण्ड मधे आहेत. त्याप्रमाणे क्रॉप वाइड लेग, बॉयफ्रेंड जीन्स, स्ट्रेट लेग जीन्स तुमच्या शरीर प्रकाराला उठून दिसेल.
४. आयाताकृतीसामान्यपणे पुरुषांमध्ये हा प्रकार जास्त आढळून येतो आणि त्यांच्यासाठी हा प्रकार आदर्श मानला जातो. यामध्ये खांदे, छाती आणि नितंब बऱ्यापैकी एक समान असतात. व्ही नेक किंवा डिटेल कॉलर आसणारे टॉप्स व बेल्टेड, पफ स्लिव्ज असणारे ड्रेस आयताकृती शरीररचनेच्या सौंदर्यात भर पाडतात. हाई वेस्टेड, वाईड लेग, स्लिम स्ट्रेट जीन्सही छान दिसतील.
५. गोलाकार शरीरकाहींच्या शरीराचा आकार गोलाकार असतो. खांद्यापासून ते अगदी नितंबपर्यंतचा आकार गोलाकार असतो. डोलमन, व्ही नेक, पेपलम प्रकारचे टॉप्स, एम्पायर वेस्ट, ऑफ शोल्डर ड्रेसेस तसेच स्ट्रेट ऑर स्लिम, बुटकट, स्किनी प्रकारच्या जीन्स तुम्हाला छान दिसतील.