Join us  

ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी ठरवायची? बघा खास टिप्स, दिसाल आणखी स्मार्ट- आकर्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2024 3:19 PM

How To Match Lipstick To Your Outfits's Colour: ड्रेसच्या रंगानुसार जर लिपस्टिकची शेड निवडली, तर नक्कीच तुम्ही आणखी स्मार्ट आणि आकर्षक दिसाल....

ठळक मुद्देलिपस्टिकमुळे आपलं व्यक्तिमत्त्व खुलतं, यात वादच नाही. पण जर ड्रेसच्या रंगानुसार परफेक्ट शेडची लिपस्टिक निवडली तर मात्र तुम्ही जास्त आकर्षक आणि स्मार्ट दिसू शकता

लिपस्टिक हा आता बहुतांश जणींच्या डेली रुटिनचा भाग आहे. पुर्वी काही खास प्रसंगीच लिपस्टिक लावली जायची. पण आता मात्र कॅज्युअली बाहेर फिरायला जाण्यापासून ते ऑफिस- लग्नकार्य अशा सगळ्याच प्रसंगी लिपस्टिक लावली जाते. लिपस्टिकमुळे आपलं व्यक्तिमत्त्व खुलतं, यात वादच नाही. पण जर ड्रेसच्या रंगानुसार परफेक्ट शेडची लिपस्टिक निवडली तर मात्र तुम्ही जास्त आकर्षक आणि स्मार्ट दिसू शकता (How to choose perfect type of lipstick). म्हणूनच आता बघा की कोणत्या रंगाच्या ड्रेसवर कोणत्या शेडची लिपस्टिक जास्त छान दिसते.... (How to choose lipstick shade according to your outfits)

 

ड्रेसच्या रंगानुसार कशी ठरवायची लिपस्टिकची शेड?

कोणत्या रंगाच्या ड्रेसवर कोणत्या शेडची लिपस्टिक जास्त खुलून दिसते, याविषयीचा व्हिडिओ riraa_in या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

त्यानुसार जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालणार असाल तर त्यावर वाईन, क्लासिक रेड, न्यूड पीच या शेड्सची लिपस्टिक लावा.

महागड्या सिल्कच्या साडीवर पदार्थ सांडून डाग पडला? २ उपाय- साडीवरचा डाग होईल गायब 

लाल रंगाचे कपडे घातल्यावर मरून, क्लासिक रेड आणि चेरी शेडची लिपस्टिक जास्त छान दिसते.

निळसर रंगाचे कपडे असल्यावर न्यूड पीच, सॉफ्ट पिंक आणि कोरल शेड्स छान वाटतात.

गुलाबी रंगाचे कपडे घातले तर त्यावर न्यूड पिंक किंवा रोज पिंक कलर लावा, आणखी सुंदर दिसाल.

 

हिरव्या रंगाचे कपडे घातल्यावर ब्रिक रेड, डिप बेरी, न्यूड पीच हे रंग जास्त शोभून दिसतात.

पिवळ्या रंगाचे कपडे घातल्यानंतर सॉफ्ट पिंक, रेड किंवा पीच कलरची लिपस्टिक ट्राय करून पाहा. 

लहान मुलांमधील लठ्ठपणा वाढविणारे ३ पदार्थ; बघून घ्या तुमची मुलंही 'हे' पदार्थ खातात का....

कोणत्या टाईपची लिपस्टिक कधी लावावी?

१. मॅट फिनिश- ऑफिसवेअर किंवा कॅज्युअल वेअरसाठी मॅट फिनिश लिपस्टिक छान दिसते.

२. ग्लॉसी लिपस्टिक- पार्टी, वेस्टर्न वेअर, पिकनिक मूड आणि रात्रीच्या वेळी अशी लिपस्टिक लावा.

३. ग्लिटरी लिपस्टिक- पार्टी, फंक्शन आणि बोल्ड लूक असेल तर ही लिपस्टिक लावण्यास प्राधान्य द्या. 

 

टॅग्स :फॅशनओठांची काळजीब्यूटी टिप्स