एरवी बहुतांशजणी सलवार सूट, जीन्स असे कपडे घालत असल्या तरी सणासुदीच्या दिवशी किंवा काही लग्नसमारंभाच्या निमित्ताने हमखास साडी नेसतातच. अशी कधीतरीच आपण साडी नेसतो आणि त्यातही साडी नेसल्यावर जाड दिसतो, अशी भावना त्यावेळी अनेकजणींच्या मनात येतेच. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर ब्लाऊजच्या बाबतीतल्या या काही टिप्स फॉलो करून पाहा. कधी कधी आपली ब्लाऊजची निवड चुकते आणि मग त्यामुळे आपले दंड अधिक फुगीर वाटतात (how to choose perfect blouse for getting slim look?). आपण आहोत त्यापेक्षा जास्तच जाड दिसू लागतो. म्हणूनच अधिक स्लिम, आकर्षक आणि स्मार्ट लूक येण्यासाठी ब्लाऊजची निवड कशी करावी याविषयीची ही खास माहिती.. (3 tips to choose blouse to look more young, slim and attractive)
बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजची निवड कशी करावी?
बारीक दिसण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीचं ब्लाऊज घातलं पाहिजे याविषयी माहिती सांगणारा व्हीडिओ Marathi Scoop या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
कॉटन साडीवर घालायला कलमकारी ब्लाऊज शिवायचं? बघा ८ सुंदर पॅटर्न्स- दिसाल एकदम स्टायलिश
१. ब्लाऊजचा गळा
ब्लाऊजचा मोठा गळा प्रत्येकीलाच शोभून दिसतो असं नाही. त्यामुळे स्लिम दिसण्यासाठी ब्लाऊज शिवत असाल तर त्याचा गळा थोडा विचारपुर्वक शिवा. व्हि शेप नेक, बोट नेक किंवा मागच्या बाजुने बंद गळ्याचे ब्लाऊज घातले तर आपण जास्त स्लिम वाटतो. ज्यांची पिअरशेप बॉडी असेल अशांना पुढच्या बाजुने चौकोनी असणारा गळाही शोभून दिसतो. कधीतरी अशा पद्धतीचे ब्लाऊज ट्राय करून पाहा.
२. बाह्या कशा असाव्या?
बाह्यांची उंची आणि त्यावरचं डिझाईन यावरही तुम्ही जाड दिसता की बारीक दिसता हे अवलंबून असतं. फुल स्लिव्ह्ज बाह्यांमध्ये अनेकजणी स्लिम दिसतात.
चेहऱ्यावर बारीक खड्डे दिसतात- पिंपल्सही खूप वाढले? 'हा' घरगुती उपाय करा- चेहरा होईल स्वच्छ
तसेच कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या घातल्यावरही दंडांना व्यवस्थित शेप मिळतो आणि ते जास्त फुगीर दिसत नाहीत. दंड जाड असतील तर मेगा स्लिव्ह्ज, पफ स्लिव्ह्ज असणारे ब्लाऊज घालणं टाळावं.
३. ब्लाऊजचं कापड कसं असावं?
कधी कधी एखादा कपडा फुगतो आणि मग त्यामुळे त्या कपड्यात आपण जास्तच जाड दिसतो. म्हणूनच ब्लाऊज शिवण्यासाठीही फुगणारा कपडा घेऊ नका.
Gardening: कुंडीतले रोपंही देईल किलोभर कांदे- बाल्कनीतल्या कुंडीत कांदे लावण्यासाठी खास टिप्स
ब्लाऊजसाठी नेहमीच सिल्क, शिफॉन, जॉर्जेट, क्रेप हे कपडे घ्यावे. चमकदार कपडा असेल तर अधिक स्लिम लूक येतो.