Lokmat Sakhi >Fashion > सणसमारंभासाठी साडीवर परफेक्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊस कसं निवडायचं? ३ टिप्स- तुमचीच साडी दिसेल चारचौघींत वेगळी- सुंदर

सणसमारंभासाठी साडीवर परफेक्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊस कसं निवडायचं? ३ टिप्स- तुमचीच साडी दिसेल चारचौघींत वेगळी- सुंदर

How to Choose Perfect Contrast Blouse for Plane Saree: साडी आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट करायचंय, पण नेमकं कसं करावं, ते सुचत नसेल तर या बघा काही टिप्स....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 02:39 PM2023-09-20T14:39:30+5:302023-09-20T14:40:16+5:30

How to Choose Perfect Contrast Blouse for Plane Saree: साडी आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट करायचंय, पण नेमकं कसं करावं, ते सुचत नसेल तर या बघा काही टिप्स....

How to choose perfect contrast blouse for plane saree, Saree draping tips,  Perfect colour combinations for saree and blouse  | सणसमारंभासाठी साडीवर परफेक्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊस कसं निवडायचं? ३ टिप्स- तुमचीच साडी दिसेल चारचौघींत वेगळी- सुंदर

सणसमारंभासाठी साडीवर परफेक्ट कॉन्ट्रास्ट ब्लाऊस कसं निवडायचं? ३ टिप्स- तुमचीच साडी दिसेल चारचौघींत वेगळी- सुंदर

Highlightsसाडी नेसतो आणि त्यावर आपलं एखादं कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालतो. पण असं केल्यावर अनेकदा आपल्याला जसा अपेक्षित लूक पाहिजे असतो, तसा मिळतच नाही.

गौरी, गणपती, त्यानंतर नवरात्री, दसरा आणि दिवाळी अशी एकानंतर एक सणांची मालिकाच आता सुरू होणार आहे. त्यानंतर लग्नसराईही असतेच. यानिमित्ताने मग बऱ्याचदा साड्या नेसणं होतं. हल्ली साडीवर त्याच साडीचं मॅचिंग ब्लाऊजच पाहिजे, असं काही नसतं. त्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या आईची, बहिणीची, मैत्रिणीची साडी नेसतो आणि त्यावर आपलं एखादं कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालतो. पण असं केल्यावर अनेकदा आपल्याला जसा अपेक्षित लूक पाहिजे असतो, तसा मिळतच नाही. आपलं रंगांचं कॉम्बिनेशन पार फेल जातं. म्हणूनच हे काही कलर कॉम्बिनेशन्स लक्षात घ्या (Perfect colour combinations for saree and blouse). यानुसार तुम्ही कोणत्या रंगाच्या साडीवर कोणतं कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालायचं ते ठरवू शकाल. (How to choose perfect contrast blouse for plane saree)

 

साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसं निवडायचं?
१. यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची साडीला ज्या रंगाचे काठ असतील, त्या रंगाचं ब्लाऊज त्यावर छानच दिसणार. पण जर साडीला काठ नसतील, त्यावर एखादं डिझाईन असेल तर त्या डिझाईनच्या रंगाचं ब्लाऊज घाला.

गणपती- गौरीसाठी करा तांबूल, घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास पदार्थ, छानसा तांबूल वाढवेल रंगत

जर डिझाईन पांढरा, गोल्डन किंवा चंदेरी रंगाचं असेल तर मात्र साडीच्या रंगानुसार एखादा कॉन्ट्रास्ट रंग आपल्याला निवडावा लागेल.

 

२. आता त्यासाठी सगळ्यात आधी वर दिलेले कलर व्हील बघा. तुमची साडी ज्या रंगाची आहे, तो रंग त्या व्हीलमध्ये शोधा. त्या रंगाच्या आजूबाजूचे जे दोन रंग आहेत, त्या रंगापैकी एखादा रंग तुम्ही ब्लाऊजसाठी निवडू शकता.

निर्माल्यातली जास्वंदाची फुलं सुकली म्हणून फेकू नका, केसांसाठी वापरा.. केस होतील मजबूत- लांबसडक

प्रत्येकवेळी पिवळं- हिरवं, लाल- हिरवं असं कॉम्बिनेशनच चालून जाईल, असं नाही. त्यामुळे साडीचा रंग ठरविण्यासाठी वरील कलर व्हील फॉलो करा. 

 

३. एकाच रंगाचे दोन टाेनही कॉम्बिनेशनमध्ये छान दिसतात.

ड्रॅगनफ्रुट खाण्याचे ५ फायदे, सुपरफुड म्हणतात या फळाला ते काही उगीच नाही, चवीलाही गोड

उदाहरणार्थ जर तुमची साडी गुलाबी रंगातल्या एकदम लाईट शेडची असेल तर त्यावर गुलाबी रंगातल्या एकदम डार्क शेडचं ब्लाऊज शोभून दिसेल. ब्लाऊजची निवड करताना साडीचं टेक्स्चर जसं आहे, तसंच ब्लाऊजही असायला हवं. 

 

 

Web Title: How to choose perfect contrast blouse for plane saree, Saree draping tips,  Perfect colour combinations for saree and blouse 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.