Join us  

नेलआर्टसाठी हजारो रुपये कशाला घालवता? तुमच्याकडच्या नेलपेंटने घरीच ‘असे’ करा सुंदर मार्बल नेल आर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2024 3:22 PM

How To Do Water Marble Nail Art At Home: नेलआर्ट म्हणजेच नखांवर सुंदर डिझाईन काढून देण्यासाठी पार्लरमध्ये शेकडो रुपये घेतले जातात. म्हणूनच ही एक सोपी ट्रिक पाहून घ्या. ..(simple tricks and remedies to do best water nail art at home)

ठळक मुद्देअगदी सोप्या पद्धतीने नखांवर सुंदर मार्बल नेलआर्ट घरच्याघरी कसं करायचं ते पाहा..

काही वर्षांपुर्वी असं असायचं की नखांवर नुसतं नेलपेंट लावलं तरी समाधान व्हायचं. कारण त्यामुळे नखांना अतिशय खास लूक यायचा. पण आताच्या तरुण पिढीचं नुसतं नेलपेंट लावून मुळीच धकत नाही. काही खास प्रसंगी त्यांना आपल्या नखांवर सुंदर असं डिझाईन हवं असते. अगदी ड्रेसला मॅचिंग असं डिझाईन नेलपेंटच्या माध्यमातून नखांवर काढून घेण्याचा ट्रेण्डही आहेच. पण अशा पद्धतीचं नेलआर्ट करायचं असेल तर त्यासाठी कमीतकमी ५०० रुपये तरी मोजावेच लागतात (How To Do Water Marble Nail Art At Home). आता काही दिवसांसाठी नखांवर राहणाऱ्या नेलआर्टसाठी एवढे पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर एका अगदी सोप्या पद्धतीने नखांवर सुंदर मार्बल नेलआर्ट घरच्याघरी कसं करायचं ते पाहा.. (simple tricks and remedies to do best water nail art at home)

 

मार्बल नेलआर्ट करण्याची पद्धत

नखांवर मार्बल नेलआर्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडच्या ३ ते ४ नेलपेंट वापरायच्या आहेत. या नेलपेंट मॅट शेडपेक्षा शिमरी शेडच्या असतील तर अधिक चांगले.

नॉन स्टिक भांडी चुकीच्या पद्धतीने वापरल्यास टेफ्लॉन फ्लू होण्याचा धोका! बघा या आजाराची लक्षणं

त्यानंतर एक छोटी वाटी, साधं पाणी, टुथपिक, नेल रिमुव्हर आणि २ ते ३ इयर बड्स हे साहित्य तुम्हाला त्यासाठी लागणार आहे.

सगळ्यात आधी तर तुम्ही ज्या नेलपेंट मार्बल नेलआर्टसाठी वापरणार आहात त्यापैकी जो शेड सगळ्यात लाईट आहे असा शेड तुमच्या नखांवर लावून घ्या. किंवा ट्रान्सफरंट शेडची नेलपेंट लावली तरी चालमेल.

 

आता वाटीमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यात एका नेलपेंटचा मोठा थेंब टाका. तो थेंब पाण्यावर पसरेल. नाही पसरला तर वाटीला थोडं हलवा म्हणजे नेलपेंट पसरली जाईल.

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा थोडासा बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

त्यानंतर त्यावर एकानंतर एक वेगवेगळ्या नेलपेंटचे थेंब टाका. नंतर टुथपिकने त्यावर हवं तसं चित्र काढा. नेलपेंट लगेच सुकते. त्यामुळे मधल्या भागाकडून कोपऱ्यापर्यंत या पद्धतीने टुथपिक फिरवा.

आता तुमच नख त्या पाण्यात बुडवा आणि अर्ध्या मिनिटासाठी तसंच पाण्यात राहू द्या. एकावेळी एक ते दोन नखांवरच नेलआर्ट करा. आता नख पाण्यात बुडालेलं असतानाच टुथपिक वापरून आजुबाजुची नेलपेंट काढून टाका. नखं पाण्यातून बाहेर काढा आणि नखाव्यतिरिक्त अन्य त्वचेवर लागलेली नेलपेंट काढून टाका. अशा पद्धतीने सगळ्या नखांवर सुंदर नेलआर्ट करता येतं. 

 

टॅग्स :फॅशनकलाब्यूटी टिप्स