Join us  

साडी नेसताना चापूनचोपून निऱ्या घालण्याची १ झटपट ट्रिक! साडीत दिसाल ट्रॅडिशनल - ट्रेण्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 5:31 PM

How to Drape Perfect Saree Tuck Center Plate Neatly : निऱ्या परफेक्ट असतील तर साडीत आपली फिगरही चांगली दिसते आणि साडी बराच काळ आहे तशीच चापून चोपून राहते.

ठळक मुद्देयामुळे निऱ्या आणि साडी अजिबात हलत नाही आणि परफेक्ट बसते. अनेकींनी त्यांच्या या व्हिडिओला लाईक केले असून काही जणींनी ही उपयुक्त टिप असल्याचे म्हटले आहे.   

एरवी आपण जीन्स, कुर्ते किंवा कधीतरी पंजाबी ड्रेस घालतो. पण सणावाराला मात्र साडी नेसून पारंपरिक आणि ट्रेंडी लूक करण्यालाच पसंती देतो. नवरात्रीच्या ९ दिवसांत तर घरात घट आहेत म्हणून किंवा ऑफीसला जाताना आपण आवर्जून साडी नेसतो. साडी परफेक्ट नेसली गेली तर ठिक नाहीतर आपला लूक फारच बिघडून जातो. साडी नेसताना सगळ्यात महत्त्वाच्या २ गोष्टी असतात, त्या म्हणजे निऱ्या आणि पदर. या दोन्ही गोष्टी परफेक्ट असतील तर आपण साडीमध्येही बराच काळ कम्फर्टेबल राहू शकतो आणि आपला लूकही गबाळा दिसत नाही. निऱ्या परफेक्ट असतील तर साडीत आपली फिगरही चांगली दिसते आणि साडी बराच काळ आहे तशीच चापून चोपून राहते (How to Drape Perfect Saree Tuck Center Plate Neatly). 

(Image : Google)

प्रसिद्ध मेकअप आर्टीस्ट शिखा अग्रवाल साडी नेसताना निऱ्या परफेक्ट याव्यात यासाठी काय करावं याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. इन्स्टाग्रामवर त्यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला असून त्यामध्ये निऱ्या घालताना काय करावे आणि काय टाळावे हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे. त्यामुळे साडी नेसताना आपण थोडी काळजी घेतली तर आपले काम नक्कीच सोपे होऊ शकते. इन्स्टाग्रामवर त्यांचे बरेच फॉलोअर्स असून त्या कायम मेकअपशी निगडीत काही ना काही पोस्ट करत असतात. 

साडी बेसिक गुंडाळून झाली की आपण हातामध्ये आपल्याला हव्या त्या आकाराच्या प्लेटस घेतो आणि निऱ्या घालतो. या निऱ्या घातल्या की आपण त्या सगळ्या मिळून एकत्र करुन आतमध्ये खोचतो. पण शिखा सांगतात, असे करणे योग्य नाही. निऱ्या खोचण्याआधी त्या एकसारख्या करुन त्यांना एक सेफ्टीपिन लावून घ्यायची. त्यानंतर त्या आत खोचायच्या. म्हणजे त्या हलत नाहीत आणि पुढे-मागेही होत नाहीत. पीन लावताना वरची एक प्लेट मोकळी सोडून पीन लावावी. म्हणजे निऱ्या आत खोचल्यावर ती प्लेट आपल्याला हवी तशी अॅडजस्ट करता येते. यामुळे निऱ्या आणि साडी अजिबात हलत नाही आणि परफेक्ट बसते. या लहानशा व्हिडिओच्या माध्यमातून शिखा हे अगदी सहजपणे समजावून सांगत आहेत. अनेकींनी त्यांच्या या व्हिडिओला लाईक केले असून काही जणींनी ही उपयुक्त टिप असल्याचे म्हटले आहे.    

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्स