Lokmat Sakhi >Fashion > लठ्ठपणा, ओघळलेले स्तन यामुळे फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत? ४ टिप्स, करा योग्य कपड्यांची निवड

लठ्ठपणा, ओघळलेले स्तन यामुळे फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत? ४ टिप्स, करा योग्य कपड्यांची निवड

Dressing Tips For Heavy Bust : आपण जाडजूड आहोत आपल्या मापाचे फॅशनेबल कपडेच मिळत नाही हा गैरसमज, मिळवा तुमचा आत्मविश्वास परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2023 03:04 PM2023-03-09T15:04:28+5:302023-03-09T15:05:44+5:30

Dressing Tips For Heavy Bust : आपण जाडजूड आहोत आपल्या मापाचे फॅशनेबल कपडेच मिळत नाही हा गैरसमज, मिळवा तुमचा आत्मविश्वास परत

How To Dress If You Have a Big Bust | लठ्ठपणा, ओघळलेले स्तन यामुळे फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत? ४ टिप्स, करा योग्य कपड्यांची निवड

लठ्ठपणा, ओघळलेले स्तन यामुळे फॅशनेबल कपडे घालता येत नाहीत? ४ टिप्स, करा योग्य कपड्यांची निवड

अनेक महिला या बिग बस्टच्या समस्येने त्रस्त असतात. बिग बस्ट असल्याकारणाने आपल्या मनासारखे कपडे आपल्याला घातला येत नाहीत, अशी बऱ्याच महिलांची तक्रार असते. स्तनांचा आकार तुलनेनं जास्त असल्याकारणाने काही महिलांना ओशाळल्यासारखे वाटते. बिग बस्ट असणाऱ्या महिला नेहमी अशा कपड्यांच्या शोधात असतात, ज्यात त्यांच्या स्तनांचा आकार लहान दिसेल.

आपण बऱ्याचदा पाहिले असेल एखादे आऊटफिट काहींना शोभून दिसतात तर काहींना अजिबात सूट होत नाहीत. प्रत्येकाची फिगर आणि स्टायलिंग ही वेगळी असते. जर आपण आपली फिगर व बॉडी शेप समजून घेऊन एखादे आउटफिट व्यवस्थित कॅरी केले तर आपण साध्या पोशाखातही अप्रतिम दिसू शकता. त्यामुळे आपला बॉडी टाईप व आपली फिगर समजून घेऊन योग्य त्या कपड्यांची निवड करावी. बिग बस्ट असणाऱ्या महिलांनी कपडे परिधान करताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी(Dressing Tips For Heavy Bust). 


नक्की काय काळजी घेऊ शकतो?  

१. योग्य लॉन्जरीची निवड करावी :- जेव्हा आपण स्टायलिंग किंवा फॅशनचा विचार करतो तेव्हा आपण अंडरगारमेंट्सचा जास्त विचार करत नाही. योग्य अंडरगारमेंट्सची निवड न केल्यानेसुद्धा आपला लूक खराब दिसतो. स्टायलिंग व फॅशनचा विचार करताना सर्वप्रथम अंडरगारमेंट्सचा देखील विचार केला पाहिजे. ब्रेसीयर किंवा इतर अंडरगारमेंट्सची निवड करताना योग्य अंडरगारमेंट्सची निवड करावी. खूप जास्त टाईट किंवा खूप लूज ब्रेसीयर घातल्यास देखील आपल्या स्तनांचा आकार जास्त दिसतो. यामुळे ब्रेसीयरची खरेदी करताना आपल्या शरीरावर योग्य मापात फिट बसेल अशाच लॉन्जरीची निवड करावी. बिग बस्ट असणाऱ्या महिलांसाठी सिमलेस ब्रेसीयर हा एक उत्तम पर्याय आहे. या प्रकारांतील ब्रा टॉप आणि टीजमधून दिसत नाहीत. यामुळे आपले बिग बस्ट लगेच दिसून येत नाहीत. 

२. शेपवेअरचा वापर करावा :- बिग बस्ट असणाऱ्या महिलांनी शेपवेअरला आपल्या वॉर्डरोबचा एक महत्वाचा हिस्साच बनवले पाहिजे. शेपवेअर या नावावरुनच आपल्याला समजले असेल की, बॉडीला योग्य शेपमध्ये दिसण्यासाठी आपण याचा वापर करतो. बिग बस्ट असणाऱ्या महिलांनी कॅमिसोल व शेपवियरचा वापर केल्यास, स्तनांचा आकार लहान दिसण्यांत मदत होईल. विविध साईज आणि शेपमध्ये असणारे शेपवेअर आपल्याला बाजारांत सहज उपलब्ध होतील. कॅमिसोल व शेपवियर आपल्या ड्रेसच्या आत परिधान केल्यास आपल्याला एक परफेक्ट लूक येईल. 

३. योग्य पद्धतीची नेकलाईन निवडा :- आपल्या शरीराच्या आकारमानानुसार, आपल्यावर कोणत्या प्रकारचे नेकलाईन सूट होतील याचा विचार करावा. बिग बस्ट असणाऱ्या महिलांनी शक्यतो व्ही - नेकलाईन असणारे ड्रेसेस परिधान करावे. व्ही - नेकलाईन सोबतच स्कूप नेकलाईन असणारे ड्रेस देखील बिग बस्ट असणाऱ्या महिलांना शोभून दिसतात. बिग बस्ट असणाऱ्या महिलांवर पोलो, काउल, क्रीम आणि स्क्वेयर नेकलाईन उठून दिसत नाहीत. 

४. रॅप ड्रेस व अंगरखा कुर्त्याचा वापर :- बिग बस्ट असणाऱ्या महिलांनी शक्यतो रॅप ड्रेस किंवा अंगरखा कुर्त्याचा वापर करावा. या प्रकारांतील कपडे आपल्याला केवळ स्मार्ट लूकच देणार नाहीत तर बिग बस्ट लपविण्यात देखील याची मदत होऊ शकते. रॅप ड्रेस व अंगरखा कुर्ता आपल्या बिग बस्टला व्यवस्थित बॅलेन्स करतील. रॅप ड्रेस व अंगरखा कुर्ता आपल्या ब्रेस्ट एरियाला डिवाइड करतील जेणेकरुन, स्तनांचा मोठा आकार लपविण्यास मदत होईल. यामुळे आपले हेव्ही बिग बस्ट दिसून येणार नाहीत. यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये, रॅप ड्रेस व अंगरखा कुर्त्याच्या पॅटर्नचा समावेश करावा.

Web Title: How To Dress If You Have a Big Bust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन