पेर या फळाच्या आकारावरुन या बांध्याला नाव ‘पियर शेप’ असे नाव ठेवण्यात आले आहे. पेर या फळाचा आकार वरुन लहान आणि खालून मोठा असतो. काही जणांच्या शरीराचा आकारही अगदी तसाच असतो. खांदा,कंबर हा भाग बारीक असून कंबरेपासून खालील आकार हा मोठा असतो. मांड्या जाड आणि नितंब हे मोठे असतात. अशा आकाराला ‘पियर शेप' असे म्हणतात.
प्रत्येकाच्या शरीराचा बांधा वेगळा असते. अशावेळी आपण आपल्या शरीराची माहिती करुन घेत कपडे घालणे गरजेचे असते. काही जण काही नवा ट्रेंड आला की, तो लगेच फॉलो करायला जातात. परंतु नवीन काही ट्राय करण्याआधी तुम्ही तुमच्या शरीरयष्टीनुसार कपड्यांची निवड करणे आवश्यक असते. जर तुम्ही तुमच्या बांध्यानुसार कपड्याची निवड केली तर तुम्ही नेहमीच सुंदर आणि परफेक्ट दिसाल. ‘पियर शेप' बॉडी असणाऱ्या महिलांनी कोणत्या कपड्यांची निवड करायची हे समजून घेऊयात(How To Dress For A Pear Body Shape).
पियर शेप बॉडी नक्की कशी असते ?
१. जर आपल्या कमरेखालचा भाग व मांड्या हे आपल्या खांद्यांपेक्षा जास्त रुंद असतील तर आपली बॉडी ही पियर शेप आकारांतील आहे, असे समजावे.
२. मांड्या आणि कमरेखालच्या भागांत चरबीचे प्रमाण जास्त असेल तर आपली बॉडी पियर शेपमध्ये आहे असे समजावे.
३. जर आपली कंबर रुंद असेल आणि तुमच्या पायाचा आकार लहान असेल तर तुमच्या शरीराला पियर शेप बॉडी म्हटले जाईल.
४. तुमची कंबर खूप रुंद असली तरी तुमचे शरीर पियर शेप आकारासारखे दिसेल.
५. शरीरातील पोट आणि खांदा यांचा भाग बारीक आणि कंबरेच्या खाली असलेली बॉडी अपक्षेपेक्षा मोठी असते. त्यामुळे याला पियर शेप असे म्हटलं जातं.
पियर शेप बॉडी असणाऱ्या व्यक्तींना कोणते रंग शोभून दिसतील ?
जर आपली कंबर, नितंब किंवा मांड्या फारच जाड असतील तर आपण गडद रंगाचे बॉटम्स निवडावे. गडद रंग परिधान केल्याने आपला खालचा पियर बॉडी शेप व्यवस्थित मापात दिसण्यास मदत होईल. जर आपली अप्पर बॉडी देखील लोअर बॉडीप्रमाणेच तितकीच जाड असेल तरीदेखील आपण गडद रंगांचेच कपडे परिधान करावे. पियर शेप बॉडी असणाऱ्या व्यक्तींनी शेपमध्ये दिसण्यासाठी कायम गडद रंगांचेच कपडे घालण्याचा पर्याय निवडावा. गडद आणि ब्राईट रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्या शरीरांतील अतिरिक्त फॅट्स किंवा जाडेपणा लपविण्यास मदत होते.
पियर शेप बॉडी असलेल्या महिलांनी कपड्यांचे फॅब्रिक कसे निवडावे ?
पियर शेप बॉडी असलेल्या महिलांनी जास्त व्हॉल्यूम असलेल्या फॅब्रिक्सऐवजी फिटिंग म्हणजेच अंगाला फिट बसणाऱ्या फॅब्रिक्सची निवड करावी. पियर शेप बॉडी असलेल्या व्यक्तींनी नायलॉन, क्रेप, रायलॉन, फ्लेयर यांसारख्या फॅब्रिकपासून तयार झालेले कपडे परिधान करावे. याउलट बटर कॉटन, पेपर सिल्क, ऑर्गेंजा यांसारख्या फॅब्रिक्सचे कपडे घालणे पियर शेप बॉडी असलेल्या महिलांनी शक्यतो टाळावे. पियर शेप बॉडी असलेल्यांनी पफी स्लीव्स घालण्यावर जास्त भर द्यावा. जर आपल्या शरीरांत फॅट्सचे प्रमाण अधिक असून त्यामुळे आपण फारच जाड दिसत असाल तर रॅप टॉप, रॅप कुर्ती असे कपड्यांचे प्रकार निवडावेत. या बॉडीशेपमध्ये येणाऱ्या तरुणींनी फिगरला बॅलेन्स करण्यासाठी खांद्यांना हाईलाईट करावे. यासाठी त्यांनी स्कार्फ, शॉल किंवा रंगीबेरंगी नेकपीसचा वापर करावा लागेल.
पियर शेप बॉडी असणाऱ्या व्यक्तींनी कपड्यांची निवड करतांना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी...
१. जास्तीत जास्त फ्लेअर्ड ड्रेस तुम्ही वापरले तर तुमचा बांधा उठून दिसेल.२. आपला वरील भाग निमुळता असल्यामुळे आपण शोल्डर किंवा ट्युब ड्रेसेस घालण्यास काहीच हरकत नाही.३. तुम्हाला वरुन जितकी स्टाईल करणे शक्य असेल तितकी तुम्ही करु शकता. ४. पँटची निवड करताना तुम्हाला गडद रंगाच्या पँट निवडायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही थोडे बारीक दिसाल. त्यामुळे तुम्ही गडद रंगाच्या पँटची नेहमी निवड करा. ५. जर तुमचा बांधा असा असेल पण तुमची उंची कमी असेल तरी देखील तुम्ही लांब कपडे निवडू शकता. ६. गाऊन हा प्रकार निवडताना तुम्हाला तो फार पायघोळ निवडायचा नाही. त्यामुळे तुमची उंची कमी दिसू शकते. ७. ज्वेलरीची निवड करताना तुम्ही गळ्यालगत असलेल्या ज्वेलरीची निवड करा.