Join us  

परफेक्ट मापाची जिन्स निवडण्यासाठी घ्या २ ट्रिक्स, कंबरेत ढगळी - उंचीला कमी महागडी जिन्स घेण्याचा पश्चाताप टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 9:43 PM

2 Steps to Choosing the Perfect Pair of Jeans Without Trying Them On : कंबरेत कधी सैल होते तर कधी घट्ट, कधी फिटिंग बिघडतं, जिन्स परफेक्ट निवडण्याची शिकून घ्या ट्रिक...

जीन्स म्हणजे प्रत्येकीच्याच कपाटातला सगळ्यात आवडता आऊटफिट मानला जातो. निळी आणि काळी अशा एवढ्या बेसिक जीन्स असल्या तरी पुरेसे आहे. कित्येक टॉप्सवर, कुर्तींवर या जीन्स (How to Find the Perfect Jeans: 2 Tips for Buying Jeans That Fit) आलटून पालटून घातल्या तरी चालून जातात. वापरून वापरून कंटाळा आला तरी जीन्स काही खराब होत नाही. त्यामुळे मग शेवटी तिचा कंटाळा येऊ लागतो. पण कितीही कंटाळा आला तरी जीन्स टाकून द्यावी, असं काही वाटत नाही आणि नव्या जीन्सची कपाटात भरती झाल्यामुळे मग ही जुनी जीन्स घालावीशी वाटत नाही. दिवसेंदिवस बदलत्या ट्रेंडप्रमाणे जीन्सचे पॅटर्न देखील बदलत आहे. बाजारात जर कोणत्या नवीन स्टाईलची किंवा ट्रेंडिंग पॅटर्नची जीन्स आली तर ती आपल्या वॉर्डरोबमध्ये हवीच अशी प्रत्येकीची इच्छा असते(How do I get perfect fit jeans?).

जीन्स विकत (2 Tips to Buy Perfect Jeans, Every Time) घेताना आपण काही गोष्टींची खबरदारी घेतो. जीन्सचा पॅटर्न, लूक, रंग, कापड, सर्वात महत्वाचं म्हणजे फिटिंग. जीन्स (How To Find The Right Jeans For Your Body Type) व्यवस्थित फिटिंग किंवा योग्य मापाची, परफेक्ट हाईटची मिळाली तर त्यात आपण अजून आकर्षक दिसतो. काहीवेळा जीन्स खरेदी करताना आपण काही बारीक - सारीक गोष्टींकडे लक्ष देत नाही. यामुळे अशी जीन्स आपल्याला कधी कंबरेला फिट किंवा लूज होऊ शकते. एवढेच नाही तर काहीवेळा जीन्स घेताना त्याची हाईट देखील चुकते यामुळे ही जीन्स घातल्यावर जास्तच लांब किंवा फार तोकडी वाटते. अशावेळी कंबरेला व आपल्या उंचीला परफेक्ट बसेल अशी जीन्स नेमकी कशी निवडावी याच्या दोन सोप्या टिप्स पाहूयात(How to find perfect fitting jeans).

कंबरेला योग्य मापात बसेल अशी जीन्स निवडण्यासाठी... 

आपल्या हाताची मूठ बंद करून हात कोपरापासून उभा सरळ वर धरावा. आपल्या हाताची मूठ ते हाताचा कोपरा जेवढे माप आपल्या हाताचे असते तेवढेच माप आपल्या कंबरेचे असते. त्यामुळे जीन्स खरेदी करताना जीन्सच्या कंबरेची साईज मोजण्यासाठी आपण आपल्या हातांचा वापर करु शकतो. सगळ्यात आधी जीन्स हातात घेऊन त्याच्या कंबरेकडील भाग मोजावा. हा भाग मोजण्यासाठी आपल्या हाताची मूठ बंद करून हात कोपरापासून त्या जीन्सच्या कंबरेच्या भागात घालून पाहावा. जर आपला हात त्या जीन्सच्या कंबरेत योग्य प्रकारे बसत असेल तर ती जीन्स तुमच्या कंबरेला परफेक्ट मापात बसू शकते. 

साडी नेसल्यावर खूप जाड दिसता ? ५ टिप्स, साडी नेसल्यावर दिसाल स्लिम - सुंदर - आकर्षक...

हेव्ही ब्रेस्ट - जाड दंड - ब्लाऊजचे फिटिंग कायम चुकते ? ४ सोप्या टिप्स, शिवा परफेक्ट ब्लाऊज...

उंचीला योग्य असेल अशी जीन्स निवडण्यासाठी... 

काहीवेळा जीन्स खरेदी करताना आपण त्याच्या हाईटचा विचार करत नाही. अशावेळी अशी जीन्स आपल्या हाईटला फार मोठी किंवा तोकडी होऊ शकते. यासाठी जीन्स घेण्यापूर्वी तिची योग्य हाईट मोजणे गरजेचे असते. आपल्या हाईटनुसार जीन्सची हाईट मोजण्यासाठी आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो. सर्वप्रथम जीन्स उलटी हातात धरून (म्हणजे कमरेकडचा भाग खालच्या बाजूला येईल अशी उलटी हातात धारावी) जीन्सचे दोन्ही पाय दोन्ही हातात धरून आपले दोन्ही हात लांब करावेत. असे केल्याने जर आपली जीन्स आपल्या हाताच्या लांबी एवढीच लांब असेल तर अशी जीन्स आपल्या हाईटला अगदी परफेक्ट बसू शकते, असे समजावे. 

दीर्घकाळ स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊ शकते का ? एक्स्पर्ट सांगतात खरे कारण...

अशा प्रकारे आपण या २ सोप्या ट्रिक्स वापरून आपल्या कंबरेला व उंचीला परफेक्ट बसेल अशी जीन्स अगदी सहजपणे निवडू शकतो.

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्सखरेदी