स्त्री असो किंवा पुरुष जीन्स ही सगळ्यांचेच अगदी आवडते आऊटफिट आहे. आपल्या सगळ्यांच्याच कपाटात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या जीन्स असतात. जीन्स हे सगळ्यात कम्फर्टेबल आऊटफिट असून टीशर्ट, शर्ट, कुर्ती अगदी कश्यावरही परफेक्ट मॅच होते. निळी आणि काळी अशा एवढ्या बेसिक जीन्स असल्या तरी पुरेसे असते. जीन्स हा प्रकार असा असतो की तो आपण अगदी कसाही आणि कितीही दिवस वापरु शकतो. आलटून पालटून घातल्या तरी चालून जातात. नेहमीच्या त्याच त्या जीन्स (How to Find the Perfect Jeans: 3 Tips for Buying Jeans That Fit) वापरून कंटाळा आला तरी जीन्स काही खराब होत नाही. त्यामुळे मग शेवटी तिचा कंटाळा येऊ लागतो. पण कितीही कंटाळा आला तरी जीन्स टाकून द्यावी, असं काही वाटत नाही आणि नव्या जीन्सची कपाटात भरती झाल्यामुळे मग ही जुनी जीन्स घालावीशी वाटत नाही. दिवसेंदिवस बदलत्या ट्रेंडप्रमाणे जीन्सचे पॅटर्न देखील बदलत आहे. बाजारात जर कोणत्या नवीन स्टाईलची किंवा ट्रेंडिंग पॅटर्नची जीन्स आली तर ती आपल्या वॉर्डरोबमध्ये हवीच अशी प्रत्येकीची इच्छा असते( 3 Steps to Choosing the Perfect Pair of Jeans Without Trying Them On )
नवीन जीन्स विकत घेताना आपण अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतो. जीन्सचा पॅटर्न, लूक, रंग, कापड, सर्वात महत्वाचं म्हणजे फिटिंग असं सगळं पाहूनच आपण नवीन जीन्स खरेदी करतो. जीन्स व्यवस्थित फिटिंग किंवा योग्य मापाची, परफेक्ट हाईटची मिळाली तर त्यात आपण अजून आकर्षक दिसतो. नवीन जीन्स खरेदी करताना कधी जीन्स आपल्या कंबरेला फिट किंवा लूज होऊ शकते. एवढेच नाही तर काहीवेळा जीन्स घेताना त्याची हाईट देखील चुकते यामुळे ही जीन्स घातल्यावर जास्तच लांब किंवा फार तोकडी वाटते. अशावेळी कंबरेला व आपल्या उंचीला परफेक्ट बसेल अशी जीन्स नेमकी कशी निवडावी याच्या तीन सोप्या टिप्स पाहूयात.
१. कंबरेला योग्य मापात बसेल अशी जीन्स निवडण्यासाठी...
१. आपल्या हाताची मूठ बंद करून हात कोपरापासून उभा सरळ वर धरावा. आपल्या हाताची मूठ ते हाताचा कोपरा जेवढे माप आपल्या हाताचे असते तेवढेच माप आपल्या कंबरेचे असते. त्यामुळे जीन्स खरेदी करताना जीन्सच्या कंबरेची साईज मोजण्यासाठी आपण आपल्या हातांचा वापर करु शकतो. सगळ्यात आधी जीन्स हातात घेऊन त्याच्या कंबरेकडील भाग मोजावा. हा भाग मोजण्यासाठी आपल्या हाताची मूठ बंद करून हात कोपरापासून त्या जीन्सच्या कंबरेच्या भागात घालून पाहावा. जर आपला हात त्या जीन्सच्या कंबरेत योग्य प्रकारे बसत असेल तर ती जीन्स तुमच्या कंबरेला परफेक्ट मापात बसू शकते.
२. कंबरेला योग्य मापात बसेल अशी जीन्स निवडण्याची दुसरी ट्रिक देखील सोपी आणि तितकीच उपयोगी देखील आहे. आपल्या जीन्सच्या कंबरेचे माप परफेक्ट आहे की नाही हे ओळखण्यासाठी जीन्स आपल्या मागच्या बाजूला पाठीवर ठेवावी, त्यानंतर मागून जॅकेट प्रमाणे कंबरेचा भाग आपल्या मानेभोवती गुंडाळून पाहावा. मानेभोवती जीन्सच्या (How to find perfect fitting jeans) कंबरेचा भाग गुंडाळल्यानंतर कंबरेची दोन्ही टोकं अगदी परफेक्ट मानेला फिट बसत असतील तर जीन्स आपल्या कंबरेच्या योग्य मापाची आहे असे समजावे(How To Find The Right Jeans For Your Body Type).
साडी नेसल्यावर खूप जाड दिसता ? ५ टिप्स, साडी नेसल्यावर दिसाल स्लिम - सुंदर - आकर्षक...
बॅकलेस ड्रेस घातला की ब्रेसियची पट्टी दिसते? २ सोप्या टिप्स- दिवाळी पार्टीसाठी करा खास लूक...
२. उंचीला योग्य असेल अशी जीन्स निवडण्यासाठी...
काहीवेळा जीन्स खरेदी करताना आपण त्याच्या हाईटचा विचार करत नाही. अशावेळी अशी जीन्स आपल्या हाईटला फार मोठी किंवा तोकडी होऊ शकते. यासाठी जीन्स घेण्यापूर्वी तिची योग्य हाईट मोजणे गरजेचे असते. आपल्या हाईटनुसार जीन्सची हाईट मोजण्यासाठी आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो. सर्वप्रथम जीन्स उलटी हातात धरून (म्हणजे कमरेकडचा भाग खालच्या बाजूला येईल अशी उलटी हातात धारावी) जीन्सचे दोन्ही पाय दोन्ही हातात धरून आपले दोन्ही हात लांब करावेत. असे केल्याने जर आपली जीन्स आपल्या हाताच्या लांबी एवढीच लांब असेल तर अशी जीन्स आपल्या हाईटला अगदी परफेक्ट बसू शकते, असे समजावे.
अशा प्रकारे आपण या ३ सोप्या ट्रिक्स वापरून आपल्या कंबरेला व उंचीला परफेक्ट बसेल अशी जीन्स अगदी सहजपणे निवडू शकतो.