आजकाल रेडिमेड ड्रेस किंवा ब्लाऊज घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. बऱ्याचदा घरी आणल्यावर लक्षात येतं की त्या ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा समोरचा गळा जरा जास्तच मोठा झाला आहे (How to fix deep neck of your blouse or dress?). किंवा कधी कधी टेलरकडे ड्रेस- ब्लाऊज शिवायला दिलं आणि त्यांचं माप हुकलं तरीही अशी अडचण येऊ शकतेच. असे मोठ्या गळ्याचे कपडे घालायला खूपच ऑकवर्ड होतं. मग शेवटी वैतागून आपण ते कपडे ठेवून देतो. असे महागाचे कपडे तसेच ठेवून देण्यापेक्षा हे दोन उपाय करून बघा (Fashion Hacks For Deep Neck).
ब्लाऊज किंवा ड्रेसचा गळा जास्तच मोठा झाल्यास उपाय..हे उपाय इन्स्टाग्रामच्या urban_naree या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.१. पहिला उपायहा उपाय करणे अगदी सोपे आहे. यासाठी तुमचं ब्लाऊज किंवा ड्रेस ज्या रंगाचा आहे, त्याच रंगाचे कापड घ्या. किंवा शिवून घेतलेलं असेल तर उरलेल्या कापडाचा यासाठी उपयोग करा. कॉन्ट्रास्ट रंगाचाही वापर करू शकता.
कोथिंबीर १५ दिवस राहणार एकदम फ्रेश- हिरवीगार, निवडण्याचीही गरज नाही, बघा सोपा उपाय..
त्या कापडाची एक छोटी बेल्टसारखी घडी घाला. या घडीचे एक टोक एका खांद्यावर शिवा. ही पट्टी तिरकी करून छातीजवळ असणाऱ्या भागात तिचे दुसरे टोक शिवून घ्या. म्हणजे गळ्याला एक तिरका बेल्ट जोडल्यासारखे वाटेल. कपड्याऐवजी लेसचा, मणी किंवा मोती यांच्या माळांचाही वापर करू शकता.
२. दुसरा उपायहा उपाय करण्यासाठी थोडेसे पॅचवर्क करावे लागेल. ब्लाऊज किंवा ड्रेस ज्या रंगाचा आहे, त्याच रंगाचे कापड घ्या.
तिळापासून केलेलं सुगंधित उटणं! त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासह ५ जबरदस्त फायदे, बघा कसं करायचं
त्याच्या कॉन्ट्रास्ट रंगाचे कापड निवडले तरी चालेल. हे कापड वापरून गळ्याच्या आतल्या बाजूने एक जोड देऊन घ्या. जोड दिलेल्या भागावर साडीवरचे किंवा ड्रेसवरचे जे डिझाईन आहे, त्याच्याशी मिळते- जुळते पॅचवर्क करून घ्या. आणखी स्टायलिश लूक येईल.