Join us  

Valentines Day Special : चेहऱ्यावर येईल इश्काची लाली, व्हॅलेण्टाइन्स डेसाठी ४ खास मेकअप टिप्स, दिसाल कमाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 12:05 PM

How To Get Ready For Valentines Day Special : स्पेशल व्यक्तीला भेटायला जाताना तयार होण्यासाठीच्या काही खास टिप्स...

ठळक मुद्देव्हॅलेंटाईन्स डे ला छान दिसण्यासाठी काही सोप्या मेकअप टिप्ससुंदर दिसायचं म्हणजे खूप मेकअप नाही तर चेहऱ्यावरच्या एका स्माईलनेही तुम्ही सुंदर दिसू शकता

व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला भेटून हा खास दिवस सेलिब्रेट करतो. प्रेम ही एका दिवसापुरते नसले तरी प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस तरुणांमध्ये आणि ज्येष्ठांमध्येही उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने हॉटेल्स, बाजारपेठ सजलेली पाहायला मिळते. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत काही क्षण आनंदात घालवण्यासाठी आपण डेट प्लॅन करतो. पण यावेळी जाताना आपण आनंदी, प्रसन्न आणि छानही दिसायला हवे ना. म्हणूनच व्हॅलेंटाईन्स डेला आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला भेटायला जाताना कपड्यांबाबत आणि मेकअप बाबत काही किमान गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या स्पेशल व्यक्तीला भेटायला जाताना तयार होण्यासाठीच्या काही खास टिप्स (How To Get Ready For Valentines Day Special)...

१. कपड्यांची निवड

कपड्यांची निवड करताना शक्यतो फिक्या रंगाचे आणि फ्रेश कपडे घाला. यातही गुलाबी, लाल असे प्रेम दर्शविणाऱ्या रंगांच्या कपड्यांचीही निवड तुम्ही करु शकता. समोरच्याला इंप्रेस करण्यासाठी तुम्ही हटके कपडे घालत असाल तरी त्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ना याचा आधी विचार करा. 

(Image : Google)

२. मेकअप करताना 

व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने तुम्ही डेटवर जात असाल आणि त्या व्यक्तीला नव्यानेच भेटत असाल तर मेकअप करताना तो खूप जास्त हेवी होणार नाही याची काळजी घ्या. कारण खूप मेकअप असेल तर तुमचा ओरीजिनल लूक समोरच्याला समजणार नाही. तसेच डोळ्यांचा मेकअप लाईट ठेवा आणि ओठ किंवा गालांवरचा मेकअप थोडा बोल्ड केला तरी चालेल. 

३. हेअरस्टाईल

हल्ली वेणीची फॅशन परत आली आहे त्यामुळे वेणी किंवा वन साईड पार्टींग अशी वेगळी पण साधीशी हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करु शकता. काहीच करायचे नसेल तर फक्त केस छान धुवा आणि मोकळे सोडा. कपडे कशाप्रकारचे आहेत त्यानुसार तुम्ही हेअरस्टाईल ठरवा. 

(Image : Google)

४. अॅक्सेसरीज 

गळ्यात एखादे छान चेन आणि पेंडंट, कानातही उठून दिसतील असे छानसे टॉप्स किंवा फॅन्सी कानातले घातले तर तुमचा लूक खुलून यायला मदत होईल. हातात घड्याळ आणि छानसे ब्रेसलेट घातले तर तुमचा लूक कम्प्लिट व्हायला नक्कीच मदत होईल. याशिवाय तुम्ही कम्फर्टेबल असाल तर छानशा हिल्सही पेअर करु शकता.   

टॅग्स :फॅशनमेकअप टिप्सव्हॅलेंटाईन्स डे