Join us  

जुन्या ब्लाऊजला द्या नवा डिझायनर लूक! ४ आयडिया- जुनंच ब्लाऊज दिसेल नवं-महागडं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 3:50 PM

Amazing Blouse Hacks: डिझायनर ब्लाऊज घेण्यासाठी अजिबात पैसे खर्च करण्याची गरज नाही, बघा जुन्या ब्लाऊजला डिझायनर लूक देण्याच्या ३ भन्नाट आयडिया...(How to give modern designer look to your old blouse?)

ठळक मुद्देआता डिझायनर ब्लाऊजच्या खरेदीवर किंवा ते शिवण्यावर मुळीच पैसे घालवू नका. त्यापेक्षा तुमच्या जुन्या ब्लाऊजचा मस्त उपयोग करून त्याला स्वस्तात मस्त डिझायनर लूक कसा द्यायचा ते पाहा...

हल्ली कोणत्याही साडीवर प्लेन ब्लाऊज घालण्यापेक्षा त्याला काहीतरी डिझायनर टच देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मग तुमचा लूक अधिकच उठून दिसतो. पण हल्ली साध्या ब्लाऊजची शिलाईच खूप जास्त वाढली आहे. त्यातच जर आपण त्या ब्लाऊजला डिझायनर लूक देण्याचा प्रयत्न केला तर मग त्या ब्लाऊजची शिलाई अगदी एक ते दिड हजाराच्या घरात जाते. शिवाय डिझायनर ब्लाऊज रेडिमेड घ्यायचं म्हटलं तरी त्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. म्हणूनच आता डिझायनर ब्लाऊजच्या खरेदीवर किंवा ते शिवण्यावर मुळीच पैसे घालवू नका (amazing blouse hacks). त्यापेक्षा तुमच्या जुन्या ब्लाऊजचा मस्त उपयोग करून त्याला स्वस्तात मस्त डिझायनर लूक कसा द्यायचा ते पाहा...(How to give modern designer look to your old blouse?)

जुन्या ब्लाऊजला डिझायनर लूक देण्याच्या ४ भन्नाट आयडिया

 

१. तुमच्याकडे एखादं जुनं स्लिव्हलेस ब्लाऊज असेल तर त्याला तुम्ही खूप छान डिझायनर लूक देऊ शकता. त्याची एक सोपी पद्धत म्हणते त्या ब्लाऊजला सध्या ट्रेण्डिंग असणाऱ्या बाह्यांचा एखादा प्रकार जोडून द्या. उदा. सध्या पफ स्लिव्ह्ज हा प्रकार खूप ट्रेण्डिंग आहे. त्यामुळे त्याला एखादा नेटचा कपडा लावून किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्रॉकेड कपडा लावून तुम्ही त्याला वेगळा लूक देऊ शकता.

९० टक्के लोक कॉटन बड्स वापरून चुकीच्या पद्धतीने कान स्वच्छ करतात, डॉक्टर सांगतात असं केल्याने....

२. ब्लाऊजला लेटेस्ट फॅशनच्या बाह्या लावण्यासाठी ते स्लिव्हलेस असावं असं काही नाही. कारण ब्लाऊजच्या बाह्या काढून त्याला नव्या प्रकारच्या बाह्या जोडणं हे सोपं काम आहे. कोणताही टेलर ते सहज करून देऊ शकेल. त्यामुळे तुमच्याकडच्या कोणत्याही ब्लाऊजच्या बाह्या तुम्ही सहज बदलून घेऊ शकता. 

 

३. एखादं प्लेन ब्लाऊज असेल तर त्यावर तुम्ही बाजारात विकत मिळणारे एम्ब्रॉडरी पॅच किंवा एम्ब्रॉयडरी लेस लावून घेऊ शकता. मोत्याची लेस लावूनही ब्लाऊजचा लूक एकदम बदलता येतो. 

 

४. एखादं मागचा गळा मोठा असणारं ब्लाऊज असेल तर तुम्ही त्याला अशा पद्धतीचा नेटच्या कपड्याचा पॅच लावू शकता. यामुळे तुमच्या ब्लाऊजचा लूक पुर्णपणे बदलून जाईल. 

 

टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स