'साडी' हा प्रत्येक भारतीय महिलेचा आवडता आणि लाडका विषय आहे. आपल्याकडे कितीही कपडे असले तरीही 'साडी' हे एक वेगळंच प्रेम असत. बहुतेकजणींना कपड्यांच्या अनेक प्रकारामध्ये साडी हा प्रकार फारच प्रिय असतो. खरंतर अगदी परफेक्ट, चापून - चोपून साडी नेसणे ही एक कला आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा काही खास कार्यक्रम, सणसमारंभ असेल तर अशावेळी साडी नेसणे महिलांना सगळयात जास्त पसंत असते. साडी हे भारतीय वस्त्र आहे. वेगवेगळ्या रंगांच्या, कापडाच्या साड्या आपल्या वॉर्डरोबमध्ये असणे याहून मोठे सुख नाही. ही लांबलचक साडी एका विशिष्ट पद्धतीने ड्रेप केली जाते. त्यामुळे येणारा ग्रेस हा महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवत असतो(How to handle open pallu).
साडी नेसणे हा अनेक महिलांना कठीण विषय वाटतो. तर नेहमीची सवय असणाऱ्या महिलांना साडी नेसणे अतिशय सोपे आहे असं वाटतं. काहीजणींना साडी तर नेसता येते पण पदर सांभाळताना (Perfect Open Pallu Saree Draping) फारच गडबड गोंधळ उडतो. कोणत्याही खास सणावाराला साडी नेसली की शक्यतो आपण साडीचा पदर पिनअप न करता तो हातांवर सोडतो. काहीवेळा आपल्या साडीच्या पदरावर इतके छान वर्क किंवा डिझाईन्स असतात, थोडक्यात भरजरी पदर (How to drape an open pallu saree) असेल तर असा पदार्थ हातांवर सोडण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पदर हातावर मोकळा सोडला तर तो फारच सुंदर दिसतो तसेच यामुळे लूकही भारी येतो. पण हा मोकळा सोडलेला पदर सावरताना आपल्याला तारेवरची कसरत करावी लागते. याचबरोबर हा मोकळा सोडलेला पदर सावरत काम करणे म्हणजे आणखीनच कठीण काम असते. यासाठी जर आपल्याला पदर हातांवर सोडायचा असेल आणि तो सावरताना त्रास होत असेल तर आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो(The easiest way to handle an open pallu).
पदर हातांवर सोडायचा असेल पण तो सावरता येत नसेल तर...
आपण काहीवेळा साडीचा पदर पिनअप न करता तो हातांवर सोडतो, पण पदर हातांवर सोडल्यावर तो सांभाळणे कठीण जाते. अशावेळी आपण एका सोप्या ट्रिक्सचा वापर करु शकतो. या ट्रिकचा वापर केल्याने आपण हातांवर पदर तर सोडू शकतो त्याचप्रमाणे तो सांभाळण्याचे टेंन्शनच देखील राहणार नाही.
मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...
दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...
यासाठी पदर लावताना सर्वातआधी, पदर नेहमीप्रमाणे खांद्यावर लावून घ्यावा. पदर खांद्यावर लावल्यानंतर बाकीचा उरलेला पदर हातावर सोडावा. आता आपल्या पोटाजवळील पदराचा भाग घेऊन तो आपल्या परकरमध्ये हलकेच खोचून घ्यावा. त्यानंतर ढोपराजवळ खाली सोडलेल्या पदराच्या भागाच्या वरच्या बाजूने आडव्या प्लेट्स करून त्या वर खेचून घ्याव्यात. आता या आडव्या एकावर एक काढून घेतलेल्या प्लेट्स एकत्रित करून ब्लाऊजच्या कोपऱ्यात पिनअप करून घ्याव्यात. आता प्लेट्स पिनअप करून घेतल्यानंतर उरलेला पदर हातांवर सोडून घ्यावा. अशाप्रकारे आपण पदर हातांवर सोडू तर शकतोच शिवाय तो सांभाळत बसण्याची झंझटच उरणार नाही.