एरवी सलवार कुर्ता, जीन्स, स्कर्ट असे आरामदायी कपडे अनेकजणी वापरत असल्या तरी सणासुदीला, लग्नसराईमध्ये किंवा मग एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून साडी नेसली जाते. आता अशी कधीतरीच आपण साडी नेसणार म्हटल्यावर आपला लूक एकदम खास असायला पाहिजे, असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण नेमकी इथेच गडबड होते आणि साडी नेसताना आपण काही लहानसहान चुका करतो. यामुळे मग साडीमध्ये आपलं आधीच मोठं असणारं पोट जरा जास्तच मोठं दिसू लागतं (how to hide tummy in saree?). एरवी जीन्समध्ये किंवा पंजाबी ड्रेसमध्ये जे पोट आरामात झाकलं जातं, ते पोट साडी नेसल्यावर अगदी लक्षात येईल एवढं मोठं दिसतं (Saree Draping Tips). असं पोट दिसू नये म्हणून साडी नेसताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या ते पाहा...(6 tips to hide belly fat or tummy in saree)
साडी नेसल्यावर पोट दिसू नये म्हणून उपाय
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे साडीची निवड थोडी विचारपुर्वक करावी. ज्या साड्यांचे सूत अगदी मऊ असते, ज्या साड्या खूप फुगत नाही, ज्यांचा कपडा जाड नसतो आणि ज्या साड्या थोड्या सुळसुळ्या असतात अशा साड्या निवडा.
हिवाळ्यात अंगावर पित्त येऊन खूप खाज सुटते? बघा का होतो शीतपित्ताचा त्रास आणि त्यावरचे उपाय
२. साडीचा पदर फ्लोटिंग घ्या. पदराच्या निऱ्या घालून तो पिनअप केल्यास पाेटाचा भाग जास्त दिसतो. त्यामुळे पदराचा वरचा काठ फक्त खांद्यावर पिनअप करा आणि बाकी पदर मोकळाच ठेवा.
३. काही जणी हातावर मोकळा ठेवलेला पदर डाव्या हाताच्या कोपऱ्यावर म्हणजेच पोटाच्या डाव्या बाजुला गोळा करून घेतात. त्यामुळे तो भाग जास्तच फुगीर होतो आणि पोट आहे त्यापेक्षा जास्त दिसतं.
४. ज्या साड्यांचा खालचा काठ मोठा असतो, अशा साड्या नेसणं टाळा.
मार्गशीर्ष गुरुवार पुजेसाठी देवीचे मुखवटे आता मिळतात ऑनलाईनही! २ सुंदर पर्याय-घरबसल्या खरेदीची सोय
५. हायवेस्ट पेटिकोट किंवा शेपवेअर घाला. यामुळे पोटाचा भाग दबल्यासारखा होताे आणि जास्त दिसत नाही.
६. खूप घट्ट, अगदी चापूनचोपून साडी नेसू नका. थोडी सैलसर साडी नेसा. खूप चापूनचोपून साडी नेसल्यास पोट जरा जास्तच फुगल्यासारखे वाटते.