Lokmat Sakhi >Fashion > साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ४ खास टिप्स, बघा कशी नेसायची साडी....

साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ४ खास टिप्स, बघा कशी नेसायची साडी....

How To Look Slim And Tall In Saree: उंच आणि स्लिम दिसण्यासाठी अगदी योग्य पद्धतीने साडी कशी नेसायची ते पाहा...(4  tips to wear saree attractively and perfectly)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 01:32 PM2023-12-27T13:32:37+5:302023-12-27T13:33:51+5:30

How To Look Slim And Tall In Saree: उंच आणि स्लिम दिसण्यासाठी अगदी योग्य पद्धतीने साडी कशी नेसायची ते पाहा...(4  tips to wear saree attractively and perfectly)

How to look slim and tall in saree, 4  tips to wear saree attractively and perfectly, Saree draping ideas | साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ४ खास टिप्स, बघा कशी नेसायची साडी....

साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ४ खास टिप्स, बघा कशी नेसायची साडी....

Highlightsसाडी नेसताना नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या ते पाहूया...

ज्या मुली उंचीने थोड्या कमी असतात, किंवा ज्या थोड्या लठ्ठ असतात, अशा महिला किंवा तरुणी साडी नेसताना खूपच जास्त कॉन्शस होतात. कारण आधीच त्यांच्या मनात आपण साडी नेसल्यावर कशा दिसू याबाबत शंका असते. पण साडी नेसताना जर काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं तर उंची कमी असूनही किंवा लठ्ठ असूनही तुम्ही साडीमध्ये उंच आणि स्लिम दिसाल (Saree draping ideas). म्हणूनच आता साडी नेसताना नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्या (How to look slim and tall in saree) आणि कोणत्या टाळायच्या ते पाहूया... (4  tips to wear saree attractively and perfectly)

साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी टिप्स

 

साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी नेमकं काय करायचं, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ fashion_fitness_by_dimpy या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

केस नॅचरली स्ट्रेट करण्याचा सोपा उपाय, फक्त २ पदार्थ लावा, केस होतील सिल्की- चमकदार

१. साडी नेसताना लक्षात ठेवण्याची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निऱ्या घातल्यानंतर कंबरेजवळ आपल्या डाव्या बाजुला साडीचा जो काठ असतो तो नेहमी निऱ्यांच्या खाली तिरक्या दिशेने गेलेला असावा. तो गोलाकार घेणं टाळावं.

 

२. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला ठेंगण्या किंवा थोड्या हेल्दी आहेत त्यांनी फ्लोटिंग पदर घेणं टाळावं. शिवाय पदराच्या खूप मोठ्या किंवा पसरट प्लेट घेणं टाळावं. पदराच्या छोट्या छोट्या प्लेट्स घातल्या असतील आणि तो व्यवस्थित पिनअप केला असेल तर उंच आणि स्लिम दिसाल.

कितीही पुसल्या तरी फरशा स्वच्छ दिसत नाही? फक्त १ पदार्थ वापरा- लख्ख चमकतील फरशा

३. पदर नेहमी पोटऱ्यांपर्यंत लांब घेतलेला असावा.

४. पदर घेताना आपल्या हाताच्या उजव्या बाजुला कंबरेवर पदराचा जो घोळ पडतो, तो घोळ मोठा, घेरदार घ्या. यामुळेही अधिक उंच दिसाल. 

Web Title: How to look slim and tall in saree, 4  tips to wear saree attractively and perfectly, Saree draping ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.