Lokmat Sakhi >Fashion > जाड दिसता म्हणून साडी नेसणंच टाळता? साडी निवडताना ६ गोष्टी लक्षात ठेवा, दिसाल स्लिम- उंच 

जाड दिसता म्हणून साडी नेसणंच टाळता? साडी निवडताना ६ गोष्टी लक्षात ठेवा, दिसाल स्लिम- उंच 

How To Look Tall And Thin In Saree?: साडी नेसल्यावर आपण आहोत त्यापेक्षा जरा जास्तीच जाड दिसतो, असं वाटत असेल तर साडी नेसताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (Saree draping tips in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 05:24 PM2024-01-19T17:24:06+5:302024-01-19T17:29:33+5:30

How To Look Tall And Thin In Saree?: साडी नेसल्यावर आपण आहोत त्यापेक्षा जरा जास्तीच जाड दिसतो, असं वाटत असेल तर साडी नेसताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (Saree draping tips in marathi)

How to look tall and thin in saree? Saree draping tips in marathi, How to wear saree perfectly? | जाड दिसता म्हणून साडी नेसणंच टाळता? साडी निवडताना ६ गोष्टी लक्षात ठेवा, दिसाल स्लिम- उंच 

जाड दिसता म्हणून साडी नेसणंच टाळता? साडी निवडताना ६ गोष्टी लक्षात ठेवा, दिसाल स्लिम- उंच 

Highlightsसाडी नेसल्यावर आपण आहोत त्यापेक्षा जरा जास्तच जाड दिसतो, असा समज होऊन साडी नेसणं टाळत असाल तर या काही टिप्स लक्षात ठेवा

एरवी बऱ्याच जणी जीन्स, सलवार कुर्ती अशा कपड्यांत वावरतात. पण सणावाराला मात्र आवर्जून साडीच नेसावी, असं अनेक जणींना वाटतं. सध्या तर हळदी- कुंकू कार्यक्रमांचे दिवस आहेत. रथसप्तमीपर्यंत हळदी- कुंकूची ही रेलचेल चालू असणारच. या कार्यक्रमांना जाताना साडी नेसावी असं वाटत असेल आणि फक्त साडी नेसल्यावर आपण आहोत त्यापेक्षा जरा जास्तच जाड दिसतो, असा समज होऊन साडी नेसणं टाळत असाल तर या काही टिप्स लक्षात ठेवा (How to look tall and thin in saree?). या पद्धतीनुसार जर साडी निवडली (Saree draping tips in marathi) तर तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा अधिक स्लिम आणि उंच दिसाल. (How to wear saree perfectly?)

साडी नेसल्यावर उंच आणि बारीक दिसण्यासाठी टिप्स

 

साडी नेसल्यावर आपण उंच आणि बारीक दिसावं, यासाठी नेमकी कशा पद्धतीने साडीची निवड करावी याविषयीचा एक व्हिडिओ arifayesha_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

वाढत्या काेलेस्ट्रॉलची सतत काळजी वाटते? 'हा' १ मसाला दररोज खा, कोलेस्ट्रॉल नेहमीच राहील कंट्रोलमध्ये

यात सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साडी नेसल्यावर जर उंच आणि स्लिम दिसायचं असेल तर नेहमी डार्क रंगाची साडी नेसा. फिक्या रंगाची साडी नेसणं टाळा. तसेच उंच दिसण्यासाठी नेहमी मोनोटोनस रंगातली म्हणजे एकच रंग असणारी साडी नेसा. ज्या साडीवर खूप रंगांची सरमिसळ आहे, अशी रंगबेरंगी साडी नेसणं टाळा. 

तसेच ज्या महिला जाड आहेत त्यांनी जाड फॅब्रिकच्या साड्या नेसणं टाळावं. त्यांनी शिफॉन, जॉर्जेट अशा पातळ कपड्यातल्या साड्या नेसाव्या.

 

साडी नेसल्यावर कधीही फ्लॅट चपला घालू नका. साडी आणि हाय हिल्स असं कॉम्बिनेशन ठेवलं तर तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा जास्त स्लिम आणि उंच दिसाल.

फक्त ५ मिनिटांत न घासता फ्रिज होईल नव्यासारखं चकाचक, ४ पदार्थांची भन्नाट जादू- बघा सोपा उपाय

ज्या मुली किंवा महिला जाड आहेत, त्यांनी कॉटन पेटिकोट घालणं टाळावं. शेपवेअर घालूनच साडी नेसावी.

जेवढा बारीक प्लेट असणारा आणि लांब पदर घ्याल, तेवढ्या अधिक उंच वाटाल.

जाड आणि बुटक्या असणाऱ्या महिलांनी किंवा मुलींनी मोठ्या बॉर्डरची साडी नेसणं टाळावं. बारीक काठांच्या साडीत आपली उंची जास्त जाणवते.   

 

Web Title: How to look tall and thin in saree? Saree draping tips in marathi, How to wear saree perfectly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.