Lokmat Sakhi >Fashion > हाईट कमी असूनही उंच दिसायचंय? कपडे निवडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, दिसाल उंच-रुबाबदार

हाईट कमी असूनही उंच दिसायचंय? कपडे निवडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, दिसाल उंच-रुबाबदार

How To Look Tall Fashion Tips : उंच दिसण्यासाठी कपडे घालताना छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास त्याची चांगली मदत होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 12:50 PM2023-02-22T12:50:34+5:302023-02-22T14:57:25+5:30

How To Look Tall Fashion Tips : उंच दिसण्यासाठी कपडे घालताना छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास त्याची चांगली मदत होते...

How To Look Tall Fashion Tips : If you want to look taller than you are, remember 5 tips while choosing clothes; You will look tall and responsible | हाईट कमी असूनही उंच दिसायचंय? कपडे निवडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, दिसाल उंच-रुबाबदार

हाईट कमी असूनही उंच दिसायचंय? कपडे निवडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, दिसाल उंच-रुबाबदार

आपली उंची छान असावी आणि आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावं असं अनेकींना वाटतं. उंची ही आपल्या व्यक्तीमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक असते, म्हणूनच उंच व्यक्तींची एक वेगळी छाप पडते. पण उंची ही आपल्याला जन्मत: मिळालेली गोष्ट असल्याने आपल्याला त्यात फार बदल करता येत नाही. मग उंच दिसण्यासाठी आपण कधी हिल्स घालतो तर कधी आणखी काही. पण कपड्यांची परफेक्ट निवड केली तरी उंच दिसण्यास त्याची चांगली मदत होते. आता कपड्यांची निवड आपण उंच दिसावे म्हणून कशी उपयुक्त ठरते असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठीच आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत (How To Look Tall Fashion Tips)...

१. आपण अनेकदा स्कीन टाईट जीन्स वापरतो. अशा जीन्स उंचीलाही शॉर्ट म्हणजेच अँकल लेंथ असतात. त्यामुळे तुम्हाला उंच दिसायचं असेल तर अशी स्कीन टाईट जीन्स घालण्यापेक्षा मोठ्या बॉटमची आणि थोडी जास्त लेंथ असलेली जीन्स तुम्ही कॅरी करा. यात तुम्ही नकळतच उंच दिसाल.

२. कोणत्याही प्रकारची पँट घालताना ती पोटाच्या जास्त वरच्या बाजुला घेतली तर पायांचा भाग उंच दिसतो आणि आपली उंची कमी आहे असे न वाटता आपण उंच असल्याचे दिसते. त्यामुळे कपडे घालताना काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास उंच दिसण्यास मदत होते. 

३. अनेकदा आपण काळे किंवा ब्राऊन असे गडद रंगाचे शूज निवडतो. मात्र त्वचेच्या रंगाहून हा रंग गडद असल्याने आपोआपच आपली उंची कमी असल्याचे पाहणाऱ्याला लगेच लक्षात येते. पण त्याऐवजी आपण आपल्या स्कीनच्या रंगाच्या आसपास जाणारे थोडे न्यूड रंगाचे शूज किंवा सँडल्स घेतले तर आपोआपच आपली उंची जास्त दिसण्यास मदत होते. 


४. तुम्हाला फ्रॉक किंवा शॉर्ट ड्रेस घालायला आवडत असतील तर तुम्ही गुडघ्याइतके ड्रेस निवडता. मात्र ड्रेस उंचीने लहान असेल तर त्यात आपण आणखी बुटके किंवा लहान दिसतो. त्याऐवजी पायापर्यंत घोळदार ड्रेसची निवड केली तर उंची जास्त दिसण्यास मदत होते. मॅक्सी, लॉंग गाऊन, अनारकली अशा ड्रेसची तुम्ही निवड करु शकता. 

५. आपण साधारणपणे पँट गडद रंगाची असेल तर शर्ट फिकट रंगाचा घालतो. म्हणजेच आपण कॉम्बिनेशन करुन कपड्यांची निवड करतो. पण असे करण्यापेक्षा आपण शर्ट आणि पँट किंवा कुर्ता आणि लेगिन्स एकाच रंगाची घालती तर आपली उंची नकळत जास्त दिसते. 
 

Web Title: How To Look Tall Fashion Tips : If you want to look taller than you are, remember 5 tips while choosing clothes; You will look tall and responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.