ज्यांची उंची कमी असते, त्यांना या गोष्टीचा खूपच कॉम्प्लेक्स येतो. काही जण तर उगाच उंची कमी असल्याने आत्मविश्वास हरवून बसतात. पण खरंतर रंग- रुप- उंची या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. त्यांचा तुमच्या कामावर, आत्मविश्वासावर परिणाम होऊ देऊ नका. आता उंची वाढवणे तर आपल्या हातात नाही. पण ज्याप्रमाणे मेकअप करून आपण आहोत त्यापेक्षा अधिक छान दिसू शकतो, त्याचप्रमाणे योग्य कपड्यांची निवड केल्यास आपण आहोत त्यापेक्षा थोडं जास्त उंच नक्कीच वाटू शकतो. (3 Styling tips to make you look taller)
उंची कमी असणाऱ्यांनी कसे कपडे घालावेत?हे उपाय इन्स्टाग्रामच्या thepearshapedstylist या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.१. जॅकेट घालणार असाल तर..आता थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे काही जणी आवर्जून जॅकेट घालतात. एरवीही स्टाईल म्हणून जॅकेट घालणं अनेक जणींना आवडतं. जॅकेट खरेदी करताना त्याची उंची किती ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते.
अक्षयकुमार सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट- म्हणाला फिट रहायचं असेल तर जेवणाचं हे १ पथ्य पाळाच...
जॅकेट कधीही तुमच्या हिप- लाईन एवढं घेऊ नका. त्याने उंची कमी वाटते. एकतर हिप- लाईनच्या वर असणारं जॅकेट घ्या किंवा मग लाँग जॅकेट घाला.
२. मोठे प्रिंट नकोउंची कमी असणाऱ्या मुलींनी मोठे प्रिंट किंवा डिझाईन्स असणारे कपडे घालणं टाळावं.
मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा...
त्यात उंची कमी दिसते. शक्यतो ज्यावर अगदी नाजूक डिझाईन आहे, किंवा अगदी बारीक चेक्स आहे असे कपडे निवडावे. प्लेन कपडे घातले तरी चालेल.
३. उभ्या लाईन्सचे कपडे घालाआडवं डिझाईन असणारे किंवा आडवे पट्टे असणारे कपडे ठेंगण्या मुलींनी घालणं टाळावं. त्याऐवजी उभं डिझाईन किंवा उभे पट्टे असणारे कपडे घेण्यास प्राधान्य द्यावं.