Join us  

ड्रेस मोठा झाला, सैल होतोय? अल्टर न करताच करा परफेक्ट मापाचा एका मिनिटात, बघा झटपट भन्नाट आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 5:04 PM

How to Make an Oversized Dress Fit Perfectly: एखादा ड्रेस सैल झाला असेल तर तो फिटिंगचा करण्यासाठी शिवत बसू नका.. फक्त ही एक सोपी आयडिया करा

ठळक मुद्देअनारकली ड्रेस किंवा लाँग पार्टीवेअर गाऊन फिटिंगचा करण्यासाठी तुम्ही हा उपाय करून बघू शकता.

कधी कधी आपल्या शरीराचं माप बदलतं आणि मग एखादा जुना ड्रेस पुन्हा नव्याने वापरायला काढला की तो सैलसर होऊन जातो. किंवा कार्यक्रमासाठी किंवा समारंभासाठी घालायला म्हणून आपण आपल्या एखाद्या मैत्रिणीचा, बहिणीचा आपल्याला आवडलेला ड्रेस हौशीने घेऊन येतो. पण तो नेमका आपल्याला सैल होऊन जातो. दुसऱ्यांचा ड्रेस शिवून आपल्या मापाचा करायलाही नकोसं वाटतं (Bangle hacks for loose dress). म्हणूनच असा एखादा ड्रेस तात्पुरत्या वेळासाठी तुमच्या परफेक्ट मापाचा कसा करायचा (How to Make an Oversized Dress Fit Perfectly) याची ही एक मस्त आयडिया..

सैल झालेला ड्रेस परफेक्ट फिटिंगचा करण्यासाठी उपाय१. हा उपाय इन्स्टाग्रामच्या salma_tips2tricks या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

२. यासाठी आपल्याला फक्त एक बांगडी आणि एक रबरबॅण्ड याचा वापर करायचा आहे.

बघा परदेशी पाहुणा करतोय कशा मऊसूत- लुसलुशीत इडल्या आणि चटकदार सांबार.. व्हिडिओ व्हायरल

३. अनारकली ड्रेस किंवा लाँग पार्टीवेअर गाऊन फिटिंगचा करण्यासाठी तुम्ही हा उपाय करून बघू शकता. पण बाजूने कट असलेल्या पंजाबी ड्रेसचा कुर्ता मापाचा करण्यासाठी हा उपाय उपयुक्त नाही.

 

४. उपाय एकदम सोपा आहे. जो ड्रेस तुम्हाला तुमच्या मापाचा करायचा आहे त्याच्या पुढून किंवा मागून मधोमध आतल्या बाजुने एक बांगडी अडकवा आणि त्या बांगडीला वरच्या बाजुने एक रबरबॅण्ड लावून पक्के करा. 

गार्डनिंगसाठी खूप वेळ नाही? ९ रोपं लावा, खूप काळजी न घेताही नेहमीच राहतील हिरवीगार- फ्रेश

५. रबरबॅण्ड नसल्यास ड्रेसला मॅचिंग होणारी एखादी लेसही तुम्ही वापरू शकता.

६. ड्रेस खूपच जास्त सैल असल्यास पुढच्या बाजुने एक आणि मागच्या बाजुने एक अशा दोन बांगड्यांचा वापर केला तरी चालेल. 

 

टॅग्स :फॅशनहोम रेमेडी