Join us  

आपलं बांगडीचं माप कोणतं, कसं ओळखाल? २ सोपे उपाय-घरबसल्या घ्या हाताचं माप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 6:49 PM

How to measure bangle size at Home : Bangles size measurement at home which will help you order bangles online too : How can we measure bangle size : अगदी २ मिनिटांतच सहजपणे आपल्या बांगडीची अचूक साईज समजून घेण्यासाठी करा झटपट उपाय...

सणवार म्हटलं की आपण अगदी हौसेने दागिने घालतो. या दागिन्यांमध्ये आपण हाताचे सौंदर्य खुलून यावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या घालतोच. सध्या आर्टिफिशियल ज्वेलरी फारच ट्रेंडिंग मध्ये आहेत. यासाठी प्रत्येक आऊटफिटवर मॅचिंग अशी बांगड्यांची खरेदी आपण नक्कीच करतो. बांगड्यांची खरेदी करायला गेल्यावर बांगड्या विकत घेण्याआधी आपल्याला साईज विचारली जाते. परंतु आपल्यापैकी अनेकजणींना आपल्या बांगड्यांची अचूक साईज माहितच नसते(Bangles size measurement at home which will help you order bangles online too).

अशावेळी आपण वेगवेगळ्या मापाच्या बांगड्या सतत हातात काढ - घाल करून प्रत्येक बांगडी हातात बसते का म्हणून ट्राय करून पाहतो. याचसोबत, आजकाल आपण ऑनलाईन (How To Measure Your Bangle Size At Home) देखील शॉपिंग करतो. अशावेळी ऑनलाईन खरेदी करताना आपण बांगडी प्रत्यक्ष हातात घालून तर पाहू शकत नाही. अशा परिस्थितीत, आपण काही झटपट ट्रिक्स वापरुन अगदी २ मिनिटांतच सहजपणे आपल्या बांगडीची अचूक साईज समजून घेऊ शकतो. बांगडीची अचूक साईज ओळखण्यासाठी करुन पहाव्यात अशा सोप्या ट्रिक्स(How can we measure bangle size).

बांगडीची अचूक साईज कशी ओळखावी ? 

१. सगळ्यात आधी आपल्या हाताची बोट फोल्ड करून मूठ करून घ्यावी. मूठ बंद केल्यानंतर, हाताच्या सपाट पृष्ठ भागावर पाहिले बोट म्हणजेच तर्जनी आणि शेवटचे बोट करंगळी या दोन्ही ठिकाणी पेनाने खूण करून घ्यावी. आता एक पट्टी घेऊन या पट्टीच्या मदतीने पाहिले बोट आणि शेवटचे बोट या दोघांमधील अंतर सेंटीमीटरमध्ये मोजून घ्यावे. हे मोजलेले अंतर तुम्हाला योग्य साईजची बांगडी घेण्यास मदत करतील.   

ब्लाऊज-पंजाबी ड्रेसच्या गळ्याला लावा लटकन, रंगबिरंगी-नाजूक लटकनचे पाहा मनमोहक डिझाइन्स! ड्रेस कमाल सुंदर...

मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...

२. आता एक पांढरा कोरा कागद घेऊन त्या कागदाची एक उभी पट्टी कापून घ्या. आता हाताची मूठ बंद करताना या पट्टीचे एक टोक आपला अंगठा आणि तळहातात यांच्या साहाय्याने पकडून मग मूठ बंद करून घ्यायची आहे. मूठ बंद केल्यानंतर ही कागदाची पट्टी आपल्या आपल्या हाताच्या पंज्यावर गोलाकार पद्धतीने फिरवून घ्यावी. त्यानंतर ही पट्टी थोडी घट्ट आवळून जिथे अंगठ्यात कागदी पट्टीचे एक टोक पकडले आहे तिथे आणून मार्करने खूण करून घ्यावी. त्यानंतर ही पट्टी हातातून सोडवून घेऊन एक मेजर टेप किंवा पट्टी घेऊन त्याच्यावर ही कागदी पट्टी ठेवून या पट्टीवरील दोन खुणांमधील अंतर सेंटीमीटरमध्ये मोजून घ्यावे.  

पदर मोकळा सोडावासा वाटतो पण सांभाळता येत नाही? १ भन्नाट ट्रिक, भरजरी पदर दिसेल सुंदर...

जेव्हा तुम्ही ऑनलाईन बांगडीची खरेदी करता तेव्हा या शॉपिंग साईट्सवर एक साईज चार्ट दिलेला असतो. या साईज चार्टमध्ये बांगड्यांची साईज आणि हातांचे माप नोंदवलेले असते. त्यानुसार वरील दोन ट्रिक वापरून आपल्या हाताचे माप सेंटिमीटरमध्ये मोजून पाहावे. ते माप जितके येईल ते माप त्या हातांच्या साईज चार्टमध्ये बघावे व त्यानंतर बरोबर त्याच्या समोरील बांगडीची साईज असणाऱ्या चार्टमध्ये पाहावे. तिथे जितकी साईज दिली असेल ती नेमकी तुमच्या हाताची साईज असेल. उदाहरण :- वरील दोन्ही ट्रिक वापरुन तुम्ही हाताची साईज मोजली आणि जर ती १८ सेंटीमीटर इतकी आली. तर त्या साईज चार्टमध्ये पाहिले असता १८ सेंटिमीटरच्या समोरची बांगडी साईज म्हणजे २.४ अशी येते. याचाच अर्थ तुमच्या बांगडीची साईज ही २.४ इतकी आहे. अशा पद्धतीने आपण वरील सोप्या दोन ट्रिक्स वापरुन अगदी सहजपणे आपल्या बांगडीची साईज मिळवू शकतो.

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

टॅग्स :फॅशन