योग्य मापाची, कम्फर्टेबल ब्रेसियर नेमकी कशी निवडायची ? फॅशनच नव्हे तर आरोग्य म्हणून कसा विचार करायचा ?
हा प्रश्न खरंतर अनेक महिलांना पडतो. अगदी बाईपण भारी देवा मधल्या जया आणि साधनलासुध्दा. आठवून बघा सिनेमातला प्रसंग. सगळ्या बहिणी स्पोर्ट ब्रा घ्यायला जातात तर जया आणि साधना अंदाजपंचे ब्रेसियर खरेदी करतात कारण त्यांना आपले नेमके मापही माहिती नसते. आणि संकोच इतका की त्या बोलत नाहीत. असं अनेक महिलांचं होतं. प्रत्येक मुलगी आपल्या कळत्या वयात आल्यापासून ब्रेसियरचा वापर करत असते. असे असले तरीही वर्षानुवर्षे ब्रेसियरचा वापर करूनही काही महिलांना आपल्या ब्रेसियरची परफेक्ट साइज नेमकी काय आहे हे माहीतच नसते. बरेचदा आपण वेगवेगळ्या कापडाच्या, फेशनेबल, विविध रंगांच्या, आकाराच्या ब्रेसियरची खरेदी करतो परंतु त्याचा योग्य कम्फर्ट मिळत नसल्याने पुढे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्यापैकी अनेकींना आपल्या ब्रेसियरचा, ब्रेस्टचा साइज नीट माहित नसतो. तो कसा मोजायचा याबाबतही पुरेशी माहिती नसते. त्यामुळे आपण ब्रेसियरचा रंग, कापड याकडे पाहतो पण त्याचा साइजच व्यवस्थित नसला तर आपल्या स्तनांचा आकार विचित्र दिसतो आणि कालांतराने आपल्याला आरोग्याच्याही काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
ब्रेसियरची साइज मोजण्याची योग्य पद्धत...
१. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या बँडची साइज मोजावी लागेल. बँड साइज म्हणजे तुमच्या बस्टचा तळ जिथे ब्रा बँड केली जाते. बँडची साइज इंच टेपने मोजा.
२. आता बस्टची साइज म्हणजे स्तनाचा भाग मोजा.
३. बँडची साइज ही तुमच्या ब्राची साइज असेल आणि स्तनाचा भाग मोजल्यास तुमच्या कपची साइज समजेल.
तुम्ही पण सुडौल दिसण्यासाठी 'बॉडी शेपवेअरचा' वापर करता? तज्ज्ञ सांगतात....
४. कपची साइज माहिती करुन घेण्यासाठी बस्ट साइजमधून बँडची साइज वजा करा. उदा., जर बँडची साइज ३६ असेल आणि ब्राची साइज ३९ असेल तर ३९-३६ = ३ इंच. ३ म्हणजेच C. तुमच्या ब्राची साइज ३६ सेमी. असेल.(जर काहींचे स्तन मोठे असतील तर त्या D,E,F सारखे आकार निवडता येतील आणि जर कोणाचे स्तन लहान असतील तर त्यांना A,B,C सारखे आकार निवडता येतील.)
५. जर बँड साइजचा (Band Size) नंबर विषम असेल, जसे की ३७, ३९ किंवा ४१, तर नेहमी एक साइज मोठा घ्या आणि ती संख्या बरोबर आहे असे समजा, जसे की ४१ असेल, तर तुम्ही ४२ बँड साइजची ब्रा खरेदी करु शकता.
मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ? आरोग्य आणि हायजिन सांभाळा...
स्वतःसाठी योग्य साईजच्या ब्रेसियरची निवड करताना लक्षात ठेवा इतर गोष्टी...
१. ब्रेसियर चांगल्या ब्रॅण्डची आणि उत्तम दर्जाची असायला हवी. २. ब्रेसियर अशाच ठिकाणी खरेदी करा जिथे तुम्ही ती ट्राय करून विकत घेऊ शकता. ३. अशी ब्रेसियर अजिबात विकत घेऊ नका ज्याच्या कपातून तुमचे स्तन बाहेर येतील.
ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण...