Lokmat Sakhi >Fashion > सगळ्या कपड्यांवर एकच सॅण्डल- चप्पल घालता? बघा स्मार्ट लूकसाठी कपड्यांनुसार कसे घालावे फुटवेअर

सगळ्या कपड्यांवर एकच सॅण्डल- चप्पल घालता? बघा स्मार्ट लूकसाठी कपड्यांनुसार कसे घालावे फुटवेअर

How to choose correct footwear according to clothes: जीन्स, लेगिंग्ज, सलवार- कुर्ता अशा सगळ्याच प्रकारच्या कपड्यांवर एकच प्रकारचे सॅण्डल, चप्पल किंवा बूट घालत असाल तर हे वाचाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 09:13 AM2024-03-12T09:13:11+5:302024-03-12T09:15:02+5:30

How to choose correct footwear according to clothes: जीन्स, लेगिंग्ज, सलवार- कुर्ता अशा सगळ्याच प्रकारच्या कपड्यांवर एकच प्रकारचे सॅण्डल, चप्पल किंवा बूट घालत असाल तर हे वाचाच...

How to pair pants with footwear? How to choose correct footwear according to our clothes to look more stylish? | सगळ्या कपड्यांवर एकच सॅण्डल- चप्पल घालता? बघा स्मार्ट लूकसाठी कपड्यांनुसार कसे घालावे फुटवेअर

सगळ्या कपड्यांवर एकच सॅण्डल- चप्पल घालता? बघा स्मार्ट लूकसाठी कपड्यांनुसार कसे घालावे फुटवेअर

Highlightsतुमच्या कपड्यांना परफेक्ट मॅच होणारे फुटवेअर तुम्ही निवडले तर नक्कीच तुम्ही अधिक स्मार्ट- स्टायलिश दिसू शकता.

बऱ्याच जणी अशा असतात की त्यांच्याकडे दोन ते तीन प्रकारचे फुटवेअर असतात. त्यापैकी एक घरातले. एक रोज बाहेर वापरायला आणि एक लग्नकार्यात किंवा पार्टीमध्ये घालता येतील असे थोडे फंक्शनल प्रकारातले. पण रोज बाहेर वापरायला तेवढा एकच जोड पुरेसा नाही. आपल्या सभोवती आपण बऱ्याचजणी पाहातो. ज्यांचे कपडे खूप काही वेगळे नसतात. आपल्यासारखेच असतात. पण तरीही त्या खूप स्मार्ट दिसतात (How to pair pants with footwear?). आपल्यापेक्षा स्टायलिश वाटतात (tips for stylish look). याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या कपड्यांनुसार त्यांच्या पायातले चपला- बूटदेखील बदललेले असतात. (How to choose correct footwear according to our clothes)

 

वरवर पाहता चपला- बूट बदलल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात असा काय फरक पडणार असे आपल्याला वाटते. पण तुमच्या कपड्यांना परफेक्ट मॅच होणारे फुटवेअर तुम्ही निवडले तर नक्कीच तुम्ही अधिक स्मार्ट- स्टायलिश दिसू शकता. एकदा हा प्रयोग करून पाहा.

नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी जंगला साडी! साडीचा हा कोणता प्रकार- काय त्याची खासियत?

यासाठी खूप काही महागडी पादत्राणं घ्यावीत असं मुळीच नाही. आपल्या कमी बजेटमध्येही हळूहळू चपलांची चांगली खरेदी करता येते. कपड्यांनुसार फुटवेअरची निवड कशी करायची, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ thepearshapedstylist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

कपड्यांनुसार कशी करायची चपला- बुटांची निवड?

१. जर तुम्ही क्रॉप, स्लिम फिट ॲन्कल लेन्थ जीन्स किंवा जेगिंन्स घातली असेल तर त्यावर हिल्स, स्निकर्स किंवा फ्लॅट शूज छान वाटतात.

२. बॉटम मोठी असणारी ॲन्कल लेन्थ पॅण्ट असेल तर त्यावर शूज किंवा स्निकर्स घालू नका. तुमच्या तळपायाचा थोडा भाग दिसेल अशा पद्धतीचे हाय हिल्स सॅण्डल त्यावर छान दिसतील.

जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण

३. बॉटम मोठ्या असणाऱ्या बॅगी पॅण्ट घातल्या असतील तर त्यावर खूप बल्की शूज किंवा हिल्स घालू नका. त्यावर स्निकर्स छान दिसतील.

४. मोठा बॉटम असणाऱ्या पलाझोसोबत नेहमी नाजूक धाटणीच्या हिल्स असणाऱ्या सॅण्डल घालाव्या. 

 

Web Title: How to pair pants with footwear? How to choose correct footwear according to our clothes to look more stylish?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.