Join us  

सिल्कच्या साडीवर डाग पडले? घरी साडी धुताना ७ गोष्टी लक्षात ठेवा, डाग गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 9:03 PM

How To Remove dark Stains From Your Silk Saree : सिल्कच्या साड्यांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा.  काही गोष्टींची काळजी घेतली तर हे डाग काहीही न करता निघून जातील.

जेव्हा रॉयल फॅब्रिकबद्दल बोललं जातं तेव्हा सिल्क नंबर वन वर असते. हे एक नॅच्युरल फॅब्रिक आहे जे स्पेशल शाईन, सॉफ्टनेससाठी ओळखले जाते. सिल्कच्या साड्या महागड्या असल्या तरी प्रत्येक ऋतूत घातल्या जातात प्रत्येक प्रसंगी महिला या साड्या कॅरी करू शकतात. तुमच्या आवडत्या साडीवर सॉस,चटणी, लोणचं असे पदार्थ पडले तर त्याचे डाग लागतात. सिल्कच्या साड्यांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा.  काही गोष्टींची काळजी घेतली तर हे डाग काहीही न करता निघून जातील. (How To Remove dark Stains From Your Silk Saree Keep 5 Things In Mind While Washing It Will Become Soft Shiny) 

सिल्कची साडी साफ करताना या गोष्टींची काळजी घ्या

सिल्कच्या साड्यांवर डाग लागल्यानंतर ते लगेच साफ करायला हवे असतात. ज्यामुळे हट्टी डाग निघून जाण्यास मदत होते.

- प्रत्येक डाग काढून टाकण्याची एक पद्धत असते. मसाले, तेलाचे, चहाचे, कॉफीचे डाग काढून टाकण्याची पद्धत वेगवेगळी असते. 

केस विरळ झालेत-वाढ खुंटली? डॉक्टर सांगतात हे ३ पदार्थ खा, १ महिन्यात लांब-दाट होतील केस

- जर सिल्कची साडी माईल्ड डिटर्जेंटनं साफ कराल तर फॅब्रिक सुरक्षित राहील. डिटर्जेंटच्या पाण्यात मिसळा नंतर  डाग लागलेला भाग रगडून घ्या. तुम्ही शॅम्पूचा वापरही करू शकता. 

-गरम पाण्याचा उपयोग केल्यास सिल्क साडीचा रंग खराब होऊ शकतो आणि फायबरर्स नुकसान  पोहोचू शकते. यासाठी नेहमी थंड पाण्यानं  साफ करा. 

-डाग रगडून काढून टाकण्यासाठी साफ कपडा किंवा टॉवेल घ्या आणि डाग हळूहळू दाबा. ज्यामुळे डाग पसरण्यापासून रोखता येतं आणि डाग सहज साफ होतात.

- सिल्कच्या साडीचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही १:१ या प्रमाणात व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण तयार करा. नंतर यावरचे डाग हळूहळू स्वच्छ करा. या टेक्निकनं डाग निघून जाण्यास मदत होईल.

- काही डाग खूपच  हट्टी असतात तुम्ही बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवून डागांवर लावू शकता. नंतर हळूहळू डाग स्वच्छ करा. 

- डाग जास्त हट्टी असतील आणि निघत नसतील तर तुम्ही साडीला प्रोफेशनल ड्राय क्लिनिंगसाठी देऊ शकता. या टिप्सच्या साहाय्यानं तुमची सिल्कची साडी सेफ आणि चांगली राहील.

टॅग्स :फॅशनखरेदी