Lokmat Sakhi >Fashion > ड्रेस किंवा ब्लाऊजच्या गळ्याच्या डिझाइननुसार करा कानातल्यांची परफेक्ट निवड, ६ टिप्स- दिसाल सुंदर

ड्रेस किंवा ब्लाऊजच्या गळ्याच्या डिझाइननुसार करा कानातल्यांची परफेक्ट निवड, ६ टिप्स- दिसाल सुंदर

Earrings Selection As Per Your Dressing: तुमचा लूक परफेक्ट जमून येण्यासाठी कानातल्याची अचूक निवड खूप महत्त्वाची ठरते. त्यासाठीच बघा या काही सोप्या टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 01:07 PM2022-11-21T13:07:43+5:302022-11-22T16:50:32+5:30

Earrings Selection As Per Your Dressing: तुमचा लूक परफेक्ट जमून येण्यासाठी कानातल्याची अचूक निवड खूप महत्त्वाची ठरते. त्यासाठीच बघा या काही सोप्या टिप्स..

How to select Earrings according to your Necklines of blouse or dress, How to choose perfect earrings? | ड्रेस किंवा ब्लाऊजच्या गळ्याच्या डिझाइननुसार करा कानातल्यांची परफेक्ट निवड, ६ टिप्स- दिसाल सुंदर

ड्रेस किंवा ब्लाऊजच्या गळ्याच्या डिझाइननुसार करा कानातल्यांची परफेक्ट निवड, ६ टिप्स- दिसाल सुंदर

Highlightsगळ्याच्या डिझाईन्सनुसार परफेक्ट सुट होणारे कानातले कसे निवडायचे, त्यासाठी बघा या काही खास टिप्स. 

जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी आपण तयार होतो, तेव्हा सगळ्यात शेवटी आपण आपल्या कानातल्यांकडे लक्ष देताे. काही जणींचा अपवाद सोडला तर बहुतेक मैत्रिणी तयार झाल्यानंतर साडीवर- ड्रेसवर जे कानातलं थोडंफार मॅच होत आहे ते उचलतात आणि घालतात. कधी ही निवड जमून येते तर कधी अगदीच चुकीची ठरते (How to do perfect selection of earrings?). त्यामुळे चेहऱ्याचा आकार, मेकअप आणि तुमच्या ड्रेसचा किंवा ब्लाऊजचा गळा कशा पॅटर्नचा आहे, त्यानुसार कानातल्याची निवड होणं गरजेचं असतं. म्हणूनच गळ्याच्या डिझाईन्सनुसार परफेक्ट सुट होणारे कानातले कसे निवडायचे (choice of earrings as per neckline), त्यासाठी बघा या काही खास टिप्स. 

 

गळ्याच्या पॅटर्ननुसार कशी करायची कानातल्यांची निवड?
या विषयीची माहिती इन्स्टाग्रामच्या blouse_saree_trends या पेजवर देण्यात आली आहे.
१. बोट नेक
ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा गळा बोट नेक प्रकारात मोडणारा असेल तर त्यावर लांब झुमके घालू नयेत. मध्यम लांबीचे मोठे कानातले त्यावर छान दिसतील.

२. राउंड नेक
बऱ्याचदा ब्लाउजचा गळा किंवा अनारकली पॅटर्नमध्ये मोडणाऱ्या फंक्शनल ड्रेसचा गळा मोठा आणि गोलाकार असतो. अशा ड्रेसवर तुम्ही मोठे झुमके किंवा लांब कानातले घालू शकता.

 

३. हॉल्टर नेक
हॉल्टर नेक किंवा स्टॅण्ड कॉलर नेक असेल तर त्यावर कोणतेही लोंबते कानातले घालणं टाळा. अशा गळ्याच्या कपड्यांवर आकाराने मोठे असलेले स्टड्स घालणं अधिक शोभून दिसेल. 

४. चौकोनी गळा
चौकोनी गळा असेल तर त्यावर हूप्स प्रकारात मोडणारे म्हणजेच मोठे, गोलाकार बांगडीसारखे वाटणारे कानातले घाला. लूक अगदी परफेक्ट दिसेल.

५. ज्वेल नेक
ज्वेल नेक म्हणजेच अगदी बंद गळा. सध्या अशा पद्धतीच्या ब्लाउजची चांगलीच फॅशन आहे. खासकरून पार्टीवेअर- डिझायनर साड्यांसाठी असा गळा निवडला जातो. अशा गळ्यावर मोठे स्टड्स छान दिसतात.

६. व्ही नेक- अशा गळ्याच्या कपड्यांवर मोठे झुमके घालण्यास प्राधान्य द्या. 

 

 

Web Title: How to select Earrings according to your Necklines of blouse or dress, How to choose perfect earrings?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.