कुर्ती आणि लेगिन्स, किंवा कुर्ती आणि जीन्स, कुर्ती आणि प्लाझो असे कॉम्बिनेशन्स सध्या एकदम ट्रेण्डिंग आहेत. अगदी कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत आणि पार्टीपासून ते पिकनिकपर्यंत कुठेही सहज कुर्ती घातले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते आपण जेव्हा ट्राय करतो, तेव्हा आपलं आपल्याच लक्षात येतं की एखाद्या प्रकारच्या कुर्तीमध्ये आपण खूपच स्मार्ट, आकर्षक दिसतो (Which type of kurti suits you more?). तर दुसऱ्या एखाद्या प्रकारातली कुर्ती आपल्याला अजिबातच सूट होत नाही. त्यात आपण आहोत त्यापेक्षा अधिक जाड दिसतो नाहीतर मग बारीक दिसतो. त्यामुळेच तब्येतीनुसार कुर्त्यांची निवड कशी करायची, याविषयी या काही खास टिप्स. (Selection Of Kurta According To Body Type)
तब्येतीनुसार कशी करायची कुर्त्यांची निवड?
या टिप्स इन्स्टाग्रामच्या urban_naree या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कुर्त्यांचे चार प्रकार सांगितले असून आपल्या तब्येतीनुसार त्यापैकी कोणत्या प्रकारच्या कुर्त्यांची निवड करायची, याची माहितीही देण्यात आली आहे.
१. ए- लाईन कुर्ती
ए लाईन कुर्ती ही खांदे, छाती या भागात फिटिंगला एकदम उत्तम असतात. इंग्रजीमधील A या आकड्याप्रमाणे मात्र कंबरेच्या खाली त्यांचा घेर वाढत जातो.
गळणाऱ्या केसांसाठी हा घ्या स्पेशल डोस.. रोज १ चमचा खा, केसांसोबतच तब्येतही राहील ठणठणीत
त्यामुळे ए- लाईन कुर्ती ही पीअर बॉडी शेप (pear body shape) असणाऱ्या महिलांसाठी एकदम चांगली ठरतात. पीअर बॉडी शेप म्हणजे ज्या महिलांचे खांदे, छाती व्यवस्थित फिटिंगमध्ये असतात. पण कंबरेचा घेर, हिप्स हा भाग जास्त असतो.
२. प्रिन्सेस लाईन कुर्ती
ज्या महिला जाड असतात, अशा महिलांनी प्रिन्सेस लाईन कुर्तींची निवड करावी. कारण या कुर्तींना बऱ्यापैकी घेर असल्याने लठ्ठपणा बऱ्याच प्रकारात झाकला जातो.
साबण, डिशवॉश न वापरताही भांडे होतील चकाचक, बघा भांडी घासण्याच्या ६ खास टिप्स
३. ३ कळ्यांचा कुर्ता
या प्रकारचा कुर्ता सध्या सगळ्यात जास्त ट्रेण्डिंग आहे. अशा प्रकारचा कुर्ता सगळ्याच बॉडी टाईपवर उठून दिसतो. त्यामुळे तुम्ही जाड, बारीक किंवा एकदम परफेक्ट फिगरमध्ये असलात तरी या प्रकारची कुर्ती बिंधास्त घालू शकता.
४. फ्लेअर्ड कुर्ती
अनारकली, अंब्रेला कट या प्रकारातल्या कुर्ती फ्लेअर्ड प्रकारात येतात. या प्रकारच्या कुर्तीही सगळ्याच बाॅडी टाईपवर उठून दिसतात.