कोणत्याही प्रकारची साडी, घागरा घालायचा असेल तर त्यावर परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज हवाच. जर आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही परफेक्ट असेल तरच त्या संपूर्ण पेहेरावाचा लूक येतो. साडी किंवा घागऱ्यावरील ब्लाऊज हा अंगावर नीट फिटिंगने बसला तरच तो दिसताना व्यवस्थित दिसतो. काहींना ब्लाऊजचे वेगवेगळे नेक पॅटर्न असणारे किंवा स्टायलिश ब्लाऊज घालायला आवडतात. पण काहीवेळा काही स्त्रियांच्या बाबतीत जाड दंड, हेव्ही ब्रेस्ट यांसारख्या गोष्टींमुळे त्यांना हवा तसा ब्लाऊजचा पॅटर्न शिवता येत नाही. हेव्ही ब्रेस्टमुळे काही स्त्रियांना मनपसंत असे ब्लाऊज शिवता न आल्यामुळे हिरमोड होतो(Do's & Don'ts For The Perfect Fitted Blouse).
हेव्ही ब्रेस्ट, जाड दंड यामुळे काहीवेळा ब्लाऊजची फिटिंग ही व्यवस्थित (Best Blouse Tips For Women With Heavy Bust And Broad Shoulders) बसत नाही. असे झाल्यामुळे काहीवेळा ब्लाऊज हा खूप घट्ट किंवा लूज होतो. ब्लाऊजचे पॅटर्न आणि फिटिंग योग्य नसल्यामुळे ब्लाऊजचा पूर्ण लूकच खराब होतो. अशावेळी इतके महागडे ब्लाऊज विकत घेऊनही फिटिंग व्यवस्थित नसल्यामुळे आपली चिडचिड होते. याचबरोबर जर आपण कोणत्या खास प्रसंगी हा ड्रेस घालणार (Blouse Hacks for Fat Arms & Heavy Breast) असू तर तो व्यवस्थित नसल्यामुळे सगळा उत्साहच निघून जातो. अशावेळी ब्लाऊज शिवताना नेमकी कोणती काळजी (How to select right blouse for Fat Arms & Heavy Breast) घ्यावी याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी काही छोट्या टिप्स फॉलो केल्या तर ब्लाऊजचे पॅटर्न, व फिटिंग या दोन्ही गोष्टी अतिशय सोप्यारीतीने परफेक्ट करता येऊ शकतात(How to select right blouse for Fat Arms & Heavy Breast?).
हेव्ही ब्रेस्ट असणाऱ्या महिलांनी ब्लाऊज शिवताना नेमक्या कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात...
१. ब्लाऊज शिवताना योग्य माप द्यावे.
जेव्हा आपण ब्लाऊज शिवायला जाल तेव्हा नेहमी योग्य माप द्यावे. कारण जर मोजमाप करताना त्यात थोडासा जरी बदल झाला तरी आपल्या ब्लाऊजची रचना, आकार व फिटिंग दोन्ही खराब होऊ शकतात. यासाठी, आपली ब्रा फिटिंग योग्य आहे का हे सर्वात आधी तपासावे लागेल. जर का आपण टेलरला मापाचे ब्लाऊज देणार असाल तर ते सुद्धा योग्य फिटिंगचे आणि आपल्याला व्यवस्थित बसेल असेच दयावे. जेणेकरून टेलर योग्य माप घेऊन ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित करु शकेल.
२. योग्य डिजाईन निवडा.
हेव्ही ब्रेस्ट असणाऱ्या स्त्रियांनी ब्लाऊजचे पॅटर्न व डिजाईन निवडताना योग्य ती खबरदारी घ्यावी. शक्यतो स्तनांचा आकार मोठ्या असणाऱ्या महिलांनी स्वतःसाठी व्ही-नेकलाइन किंवा हाय नेकलाइन पॅटर्न असणारे ब्लाऊज शिवावेत. या प्रकारच्या पॅटर्नमुळे काही अंशी प्रमाणांत आपल्या स्तनांचा आकार हा कमी दिसण्यात मदत होते.
दीर्घकाळ स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊ शकते का ? एक्स्पर्ट सांगतात खरे कारण...
३. फॅब्रिक निवडताना आपल्याला सूट होईल असेच फॅब्रिक निवडावे.
हेव्ही ब्रेस्ट असणाऱ्या महिलांनी ब्लाऊजसाठी फॅब्रिकची निवड करताना ती योग्य रीतीने आपल्याला काय शोभून दिसेल याचा विचार करुनच करावी. जर का आपल्या ब्लाऊजच्या कपड्याचे फॅब्रिक योग्य असेल तरच ब्लाऊज योग्य फिटिंगचा शिवता येणे शक्य होते. हेव्ही ब्रेस्ट असणाऱ्या महिलांनी नेहमी हलके व पातळ असणारेच कापड निवडावे. जास्त हेव्ही वर्क किंवा हेव्ही मोत्यांचे, मण्यांचे वर्क असलेले तसेच अतिशय जाडे - भरडे कापड निवडू नये. अशा प्रकारचे ब्लाऊज शिवल्यास त्यात आपण अजूनच हेव्ही दिसण्याची शक्यता असू शकते. जर का आपण पातळ व हलके कापड निवडले तर आपल्या स्तनांचा आकार देखील कमी दिसण्यास मदत होईल.
महागड्या सिक्विन साडीची काळजी घेण्याच्या ६ टिप्स, नाहीतर चमचमती साडी पडेल काळी...
४. शक्यतो ब्लाऊजमध्ये कप्सचा वापर टाळावा.
ज्या स्त्रियांच्या स्तनांचा आकार हा मोठा आहे अशा स्त्रियांनी ब्लाऊजमध्ये कप्सचा वापर करणे टाळावे. काहीवेळा आपण ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न शिवण्यासाठी त्यात कप्सचा वापर करतो. परंतु या कप्सचा वापर केल्याने आपली हेव्ही ब्रेस्ट आणखीनच हेव्ही दिसण्याची भीती असू शकते. त्यामुळे शक्यतो पॅडेड ब्लाऊज शिवणे टाळावे. परंतु यासाठी आपल्याला ब्लाऊजमध्ये फिट बसेल अशी फिटिंगची योग्य ब्रा निवडणे गरजेचे असते.