Lokmat Sakhi >Fashion > एकच ब्लाऊज अनेक साड्यांवर घाला बिंधास्त, 3 हटके टिप्स- मिळवा खास डिझायनर लूक

एकच ब्लाऊज अनेक साड्यांवर घाला बिंधास्त, 3 हटके टिप्स- मिळवा खास डिझायनर लूक

How to Style Same Blouse on Different Sarees : फॅशन एक्सपर्ट मृण्मयी अवचट आपल्याला याबद्दलच्या काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 10:23 AM2022-09-22T10:23:57+5:302022-09-22T10:25:01+5:30

How to Style Same Blouse on Different Sarees : फॅशन एक्सपर्ट मृण्मयी अवचट आपल्याला याबद्दलच्या काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहेत

How to Style Same Blouse on Different Sarees : How To Wear A Single Blouse Over Multiple Sarees, 3 Hot Tips - Get That Exclusive Designer Look | एकच ब्लाऊज अनेक साड्यांवर घाला बिंधास्त, 3 हटके टिप्स- मिळवा खास डिझायनर लूक

एकच ब्लाऊज अनेक साड्यांवर घाला बिंधास्त, 3 हटके टिप्स- मिळवा खास डिझायनर लूक

Highlightsखूप जास्त कपडे घेण्यापेक्षा आहेत तेच कपडे योग्य पद्धतीने कसे वापरता येतील याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे.कमीत कमी खर्चातही हटके राहता येते, त्यासाठी काही खास टिप्स...

सणवार आले की आपण आवर्जून साड्या वापरतो. एरवी साडीला फारसा हात न लावणारे आपण नवरात्री-दिवाळी अशा सणांना मात्र पारंपरिक लूक कॅरी करणे पसंत करतो. अशावेळी साड्या खरेदी केल्या की त्याचा फॉलपिको, परकर, त्यावर मॅचिंग ब्लाऊज, दागिने असे साडीचे बरेच बाळंतपण करावे लागते. पण आपण कधीतरीच साडी घालत असलो की मात्र हे सगळे करायचा कंटाळा येतो. इतकेच नाही तर ब्लाऊजची शिलाईही हल्ली खूप झाली असल्याने आपल्याला प्रत्येक साडीवर वेगळं ब्लाऊज शिवणं नको वाटतं. हल्ली ब्लाऊज मिक्स अँड मॅच करुन घालण्याचा ट्रेंड आला असून त्यामध्ये आपण आपला लूक छान हटके करु शकतो. फॅशन एक्सपर्ट मृण्मयी अवचट आपल्याला याबद्दलच्या काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहेत, पाहूया त्या काय सांगतात (How to Style Same Blouse on Different Sarees).

१. तुमच्या आवडीच्या किंवा जास्तीत जास्त साड्यांवर जाणाऱ्या एखाद्या प्लेन ब्लाऊजला तुम्हाला हटके लूक द्यायचा असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या खालच्या बाजूला थोडे हटके मणी किंवा कलरफूल बीडस लावू शकता. यामुळे ब्लाऊज उठून तर दिसेलच पण वेगवेगळ्या साड्यांवर ते अगदी सहज मॅच होईल. यासाठी तुम्ही ब्लाऊजचा रंग ऑफ व्हाईट किंवा काळा असा कॉमन कोणताही घेऊ शकता. 

२. आहे तेच ब्लाऊज थोडं आणखी हटके करायचं असेल तर त्याच्या मागे आपण ज्याठिकाणी लटकन लावतो. त्याठिकाणी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या कापडाच्या तुकड्यांचे काही बंच करुन ते लावू शकतो. त्यामुळे ब्लाऊजचा लूक थोडा ट्रेंडी होऊ शकेल. आपल्याकडे ब्लाऊजपीस, ओढण्या किंवा आणखी कोणत्या कापडातील राहीलेले तुकडे नक्की असतात. त्याचा योग्य तो वापर केल्यास त्यातून छानशी वेगळी फॅशन करता येऊ शकते. 


 

३. अशाप्रकारचा मिक्स अॅंड मॅच केलेला ब्लाऊज आपण फक्त साडीवरच नाही तर प्लाझो, एखादा लॉंग स्कर्ट यांच्यावरही वापरु शकतो. इतकेच नाही तर साधी एखादी पँट आणि वर लॉंग जॅकेटच्या आतही अशाप्रकारचा ब्लाऊज आपला लूक खुलवायला नक्कीच मदत करतो. त्यामुळे खूप जास्त कपडे घेण्यापेक्षा आहेत तेच कपडे योग्य पद्धतीने कसे वापरता येतील याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे.

Web Title: How to Style Same Blouse on Different Sarees : How To Wear A Single Blouse Over Multiple Sarees, 3 Hot Tips - Get That Exclusive Designer Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.