(Image Credit- Social Media, You Tube)
उन्हाळ्यात थ्री फोर हॅण्डजचे ब्लाऊज घालणं (Sleeveless blouse design) म्हणजे कठीण काम, अशा स्थितीत साड्यांसोबत स्लीव्हलेस ब्लाउज घालण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. ज्या महिलांचे दंड जाड आहे त्यांना असे ब्लाऊज शोभून दिसत नाहीत, असा काहींचा गैरसमज असतो किंवा स्टायलिय टिप्स माहित नसल्यानं अनेकजणी स्विव्हजलेस ब्लाऊज घालणं टाळतात. त्यापेक्षा स्लीव्हजलेस ब्लाऊजला मस्त ट्विस्ट दिला तर कोणत्याही साडीत तुम्ही उठून दिसाल. (Stylish modern sleeveless blouse design)
जर तुमचे हात गुबगुबीत किंवा जाड असतील तर ब्लाउजच्या दुसऱ्या बाजूकडे लक्ष वेधण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही हेवी वर्क ब्लाउज स्लीव्हलेस बनवू शकता, त्याचप्रमाणे, जर तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या नेकलाइनमध्ये बदल केले तर खूप फरक पडतो. या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही पद्धती सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हीही स्लीव्हलेस ब्लाउज घालू शकाल. (How to make arms slimmer in sleeveless blouse)
1) व्ही नेकलाईन
जर तुम्हाला लोकांचे लक्ष तुमच्या हातांवर जाऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या नेकलाइनच्या डिजाईनवर लक्ष द्या. नेकलाइन बनवताना, खोल व्ही-नेक निवडा. व्ही-नेक डिझाइन तुमच्या कॉलरबोन्सवर जोर देते आणि त्यामुळे हातांकडे फारसं लक्ष जात नाही.
2) हेवी वर्क
स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये आपले जाड हात लपविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे हातांवर हेवी वर्क बनवणं. जर तुम्हाला ब्लाउज फॅब्रिकमध्ये छान काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ड्रेस स्लीव्हलेस करू शकता. सगळ्यांचे आकर्षण ब्लाऊजच्या हेवी वर्कवर असेल. त्यामुळे तुमचे दंड जाड दिसून येणार नाहीत.
3) फ्रिल्सचे ब्लाऊज
फ्रिल्स ही एक स्टाईल आहे. जी खूप आधीपासून ट्रेंडमध्ये आहे. केवळ स्लीव्हजमध्येच नाही, तर स्कर्ट आणि फ्रिल्स असलेले कपडे देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. जर तुम्हाला जाड हातांचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या स्लीव्हजच्या टोकांना फ्रिल्स जोडू शकता. यामुळे तुमचा ब्लाउज सुंदर आणि ट्रेंडी दिसेल आणि तुमचे जाड हात जास्त लक्ष वेधून घेणार नाहीत. फ्रिल्सऐवजी लहान प्लेट्स असलेली रचना ब्लाउजला स्टायलिश लुक देईल.
4) कोल्ड शोल्डर
आता कोल्ड शोल्डर ब्लाउज डिझाइन म्हणजे तुमच्या ब्लाउजमध्ये स्लीव्हज जोडलेले असतील. स्लीव्हलेस बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्लीव्हज अगदी लहान ठेवणे. अशा स्लीव्हजमुळे तुमचे खांदे लठ्ठ दिसणार नाहीत आणि तुम्ही तुमच्या स्टायलिश ब्लाउजला बोल्ड लूक देऊ शकता.
5) ज्वेलरी
जर तुम्हाला स्लीव्हलेस ब्लाउज घालायचा असेल आणि तुमचे हात जाड असतील तर तुम्ही त्यासाठी आणखी एक गोष्ट करू शकता. बांगड्या, नेकलेस यांसारख्या अॅक्सेसरीज तुमचा लूक सुंदर बनवू शकतात. यामुळे तुमच्या बायसेप्सवर लक्ष कमी राहील. मनगट हा तुमच्या हातांचा सर्वात पातळ भाग आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मनगटावर अॅक्सेसरीज घालाल तेव्हा हात बारीक दिसायला मदत होईल.