साडी नेसल्यावर फ्लोटिंग पदर घ्यायला म्हणजेच डाव्या हातावर मोकळा पदर घ्यायला अनेक जणींना खूप आवडतं. छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर खांद्यावर पिनअप करण्यापेक्षा जर तो फ्लोटिंग पद्धतीने घेतला तर त्याचा लुक निश्चितच अधिक छान येतो. पण तसा मोकळा पदर सांभाळणे कठीण जात असल्याने अनेक जणींना इच्छा असूनही तसा पदर घेता येत नाही. किंवा तसा पदर घेतला तरी तो नीट सांभाळता येत नाही (How to take floating pallu perfectly?). खूप अवघडून गेल्यासारखे आणि दोन्ही हात पदर सांभाळण्यातच बांधून गेल्यासारखे वाटते. म्हणूनच फ्लोटिंग पदर अगदी व्यवस्थित चापून- चोपून बसेल, अशा पद्धतीने कसा घ्यायचा यासाठी ही एक छानशी ट्रिक बघा. (1 Smart trick for saree draping with flowing pallu)
ही छानशी ट्रिक इन्स्टाग्रामच्याjagisha.upadhyay या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यात दाखवलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही फ्लोटिंग पदर घेतला तर तो सांभाळणे मुळीच कठीण जाणार नाही.
बाजरीची भाकरी थापतानाच मोडते- तुकडे पडतात? ३ टिप्स- भाकरी होईल छान- फुगेल टम्म
अवघडल्यासारखेही होणार नाही. अगदी सरसर कामे करू शकाल किंवा कम्फर्टेबली सगळीकडे वावरू शकाल. शिवाय यामध्ये साडीच्या पदराचा खालचा काठही व्यवस्थित दिसून येईल, त्यामुळे साडीचे सौंदर्यही आणखी खुलण्यास मदत होईल आणि तुम्हीही अगदी स्मार्ट दिसाल.
फ्लोटिंग पदर हातावर वारंवार सटकू नये म्हणून उपाय
१. सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे साडी नेसून घ्या आणि पदराचा वरचा काठ खांद्यावर व्यवस्थित पिनअप करून घ्या.
मुलांची उंची वाढत नाही म्हणून चिंता वाटतेय? ५ योगासनं दररोज करायला लावा, उंची वाढायला होईल मदत
२. आता हातावर जो पदराचा खालचा काठ आहे, त्याच्या २ ते ३ निऱ्या घाला आणि त्या पिनअप करून टाका. अगदी तेवढ्याच निऱ्या घाला त्यापेक्षा जास्त नको.
३. आता जिथे पिन लावली आहे तो भाग हातावर अलगद उलटा टाकावा आहे. म्हणजे काठ खालच्या बाजुने येईल असा दुमडून घ्यावा. आता मागचा पदर ओढून पुढे घेतला की पदर अगदी व्यवस्थित सांभाळला जाईल.