हल्ली फोटो काढणं हे पूर्वीसारखं अवघड राहिलं नाही. त्यासाठी वेगळा कॅमेरा असायलाच हवा अशीही गरज नसते. प्रत्येकाच्या हातात असणाऱ्या स्मार्टफोनमुळे हे फोटो काढणे सोपे झाले आहे. पूर्वी काही खास प्रसंग असेल तरच फोटो काढले जायचे. पण आजकाल आपण अगदी वीकेंडला कुठे गेलो, मित्रमंडळींना भेटलो किंवा अगदी नवीन कपडे घातले तरी फोटो काढतो. विशेष म्हणजे आपण हे फोटो नुसते काढत नाही. तर सोशल मीडियावर अपलोड करतो (How To Take Perfect Pictures).
इन्स्टाग्राम, फोसबुक, व्हॉटसअॅप यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून आपण लोकांशी कनेक्टेड असतो. हा कनेक्ट वाढावा आणि आपल्या आयुष्यात काय चाललं आहे हे समोरच्याला सहज समजावं यासाठी आपण सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करतो. आता आपण खूप आनंदाने फोटो काढतो खरे पण ते फोटो चांगले आले तर ठिक नाहीतर आपला सगळा मूड ऑफ होतो. फोटो चांगले येण्यासाठी आपल्याला फोटोचा चांगला सेन्स असणे गरजेचे असते. इतकेच नाही तर फोटोसाठी चांगली पोझही देता यायला हवी.
बारीक दिसण्यासाठी फोटो काढताना काही गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात. प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासाठी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. फोटोमध्ये बारीक दिसावं यासाठी उभं राहताना, बसताना कशा पोझ घ्यायला हव्यात हे शिल्पा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला यामध्ये सांगतात. आपण साधारणपणे कशी पोझ देतो आणि कशी द्यायला हवी याची तुलना त्या आपल्या या व्हिडिओमध्ये करुन दाखवतात. त्यामुळे तुमचेही फोटो छान बारीक यावेत यासाठी हा व्हिडिओ आवर्जून पाहा.